शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

मालद्यातील दंगलीमागील जमातवादी समीकरणं

By admin | Updated: January 14, 2016 04:08 IST

संंरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा बोलले आहेत. तेही लष्कराच्या एका समारंभात. ‘जे आम्हाला वेदना देतात, त्यांना त्याच प्रकारच्या वेदना भोगायला लावल्या जातील’, असा पर्रीकर

- प्रकाश बाळ(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)संंरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा बोलले आहेत. तेही लष्कराच्या एका समारंभात. ‘जे आम्हाला वेदना देतात, त्यांना त्याच प्रकारच्या वेदना भोगायला लावल्या जातील’, असा पर्रीकर यांच्या वक्तव्याचा आशय आहे. अर्थातच पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांचे असे उद्गार पाकला उद्देशून आहेत, हे वेगळं सांगायला नकोच.अशा तऱ्हेनं ‘जशास तसं’ उत्तर दिल्यानं दहशतवादाला खरोखरच पायबंद बसेल काय? ‘नाही’ असंच या प्रश्नाचं उत्तर आहे....कारण पाकमधून येणारे जे दहशतवादी आहेत, ते ज्या विचारांवर पोसले गेले आहेत, त्याचा पाया ‘भारत हा हिंदूंचा देश आहे व तेथे मुस्लिमांवर अन्याय होत आहेत’, हाच आहे. भारतात सतत आढळत असलेली हिंदू-मुस्लीम तेढ दहशतवादाच्या या वैचारिक पायाला खतपाणी घालणारीच ठरत आली आहे. किंबहुना भारतात जर हिंदू-मुस्लीम सलोख्यानं नांदू लागले, तर पाकची गरजच काय होती, असा प्रश्न निर्माण होतो. तो पाकच्या अस्तित्वाशीच जाऊन भिडतो. नेमके हेच व्हायला पाकला नको आहे. म्हणूनच ‘हिंदू’ भारतात मुस्लीम असुरक्षित व अस्वस्थ आहेत, हे जगाला सतत दाखवून देण्यात पाकला रस आहे....आणि आपल्या देशातील सत्तेच्या राजकारणात ‘हिंदू-मुस्लीम तेढ’ हा एकगठ्ठा मतं मिळवायचा सोपा मार्ग मानला गेल्यानं, ज्या ज्या राज्यात निवडणुका येऊ घातलेल्या असतात, तेथे दोन्ही समाजात ताणतणाव वाढवत नेण्याचे डावपेच खेळले जात आले आहेत. अशा या डावपेचांचं ताजं उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील कालियाचाक येथे झालेला हिंसाचार.उत्तर प्रदेशातील हिंदू महासभेच्या एका नेत्यानं प्रेषित महंमदांबद्दल अत्यंत अनुचित असे उद्गार डिसेंबर महिन्यात काढले होते. मात्र हे निमित्त करून ‘अंजुमन अहले सुन्नत ऊल जमात’ या संघटनेनं पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचाक या ठिकाणी मोठी निदर्शनं करण्याचा घाट घातला. हे जे ठिकाण आहे, ते बनावट नोटा बनवण्याचं ंिकवा बांगलादेशातून तेथे घेऊन येण्याचं भारतातील सर्वात मोठं केंद्र मानलं जातं. या व इतर बेकायदेशीर कृत्यात गुंतलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांचं साम्राज्य या भागात आहे. सीमेपलीकडून बांगला देशातून बेकायदा येणारे स्थलांतरित, आणण्यात येणारा माल यावर सीमा सुरक्षा दलाची करडी नजर असते. तरीही तस्करी होत असतेच. त्यामुळं सीमा सुरक्षा दलाची कारवाई ही या संघटित टोळ्यांवर सततची टांगती तलवार असते. अशा या पार्श्वभूमीवर कालियाचाक येथे एक महिना आधी झालेल्या घटनेबद्दल निदर्शनं करण्याचा घाट घालण्यामागं गुन्हेगारी टोळ्या व ती संघटना यांच्यात संगनमत झालं होतं, हे उघड आहे. हजारो मुस्लीम ‘इस्लाम खतरे में’च्या नावाखाली जमा केले गेले. पद्धतशीरपणं हिंसाचार घडवून आणण्यात आला. प्रमुख लक्ष्य होतं, ते सीमा सुरक्षा दल आणि नंतर स्थानिक पोलीस. मोठी जाळपोळ झाली. कोट्यवधीची मालमत्ता बेचिराख करण्यात आली. अनेक जण जखमी झाले.मात्र ही ‘हिंदू-मुस्लीम’ दंगल नव्हती. तशी ती असल्याचं भासवण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. या भागात काही ठिकाणी भाजपाचं बऱ्यापैकी बस्तान आहे. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले भाजपा नेते तपन सिकदर हे याच भागातील. त्यामुळं या प्रकरणाला ‘जमातवादी’ रंग देण्यात भाजपाला रस असल्यास नवल नाही. ‘धार्मिक ध्रुवीकरणा’ची संधी भाजपाला या दंगलीच्या निमित्तानं साधायची आहे. मात्र ममता बॅनर्जी व त्यांची तृणमूल काँगे्रस यांनाही असंच ‘धार्मिक ध्रुवीकरण’ मुस्लीम मतं पडण्यासाठी हवं आहे.भारतातील अशा दंगलीचं एक गणित असतं. इस्लामसंबंधीच्या काही मुद्यावरून मुस्लीम समाजात असंतोष निर्माण झाला, त्याचं परिवर्तन हिंसाचारात झालं आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असतानाही शासनयंत्रणेनं मवाळ भूमिका घेतली, त्याचवेळी कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारच्या विरोधात ओरड केली, तर ‘आमच्या बाजूनं हे सरकार उभं राहतं, तेव्हा कट्टर हिंदू संघटना कशा काय आक्षेप घेतात, आपण आता सरकारच्या पाठीशी असायला हवं’, अशी भावना मुस्लीम समाजात प्रबळ बनते. हे एकगठ्ठा मतांचं राजकारण असतं. मुंबईत २०१२ साली हेच घडलं होतं. आता ममता बॅनर्जी तेच करीत आहेत. कालियाचाक येथील हिंसाचार हाताळताना त्यांनी जी मवाळ भूमिका घेतली आहे, त्यामागं हे कारण आहे.मात्र हा विस्तवाशी खेळ आहे; कारण आता खरी ‘हिंदू-मुस्लीम’ दंगल घडवून आणण्याचं निमित्तच संघ परिवाराला मिळणार आहे. संघ परिवाराची कार्यपद्धती बघता एखाद्या मंदिराचा विध्वंस मुद्दामच केला जाऊ शकतो अथवा एखाद्या धार्मिक नेत्याचा खूनही केला जाऊ शकतो. त्यावरून सहज दंगल पेटेल आणि मग ती खऱ्या अर्थानं ‘हिंदू-मुस्लिम’ दंगल असेल. त्यातून होणारं ध्रुवीकरण हे ‘हिंदू एकगठ्ठा मतां’चं असेल. अशी दंगल जर ममता बॅनर्जी यांना झटक्यात आवरता आली नाही, तर त्या ‘एकगठ्ठा मुस्लीम मतं’ही गमावून बसतील; कारण अशी दंगल घडते व मुस्लीम होरपळला जातो, तेव्हा मग तो ज्या भागात असतो, तेथे अशा दंगलीचा किती परिणाम झाला, या अंगानं विचार करून, प्राप्त परिस्थितीत कोणत्या उमेदवाराला मत देणं सोईचं, हे ठरवत असतो. थोडक्यात मुस्लीम मतं विविध प्रकारे विभागली जातात. उलट हिंदू मतं एकगठ्ठा राहिल्यानं त्याचा फायदा भाजपाला होतो.प्रचार व आरोप-प्रत्यारोप या पलीकडं जाऊन मालद्यातील दंगल या चौकटीत बघणं आवश्यक आहे. हे असं जे एकगठ्ठा मतांचं राजकारण आहे, ते जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत ‘हिंदू-मुस्लीम तेढ’ पाकच्या फायद्याचीच ठरत राहणार आहे. मग पर्रीकर कितीही ‘जशास तसं’ उत्तर देवोत!