शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान अखेर जिंकला, पण संथ खेळीमुळे खड्ड्यात राहिला; १४ षटकांत जिंकायचं होतं, पण... 
2
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
3
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
4
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
5
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
6
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
7
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
8
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
9
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
10
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
11
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
12
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
13
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
14
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
15
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
16
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
17
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
18
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
19
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
20
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

इटलीच्या पंतप्रधानांचं बॉयफ्रेंडपासून ब्रेकअप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 7:40 AM

या नात्यांविषयीच समाजात साशंकता वाटू लागली आहे. 

‘रिलेशनशिप’मध्ये नात्यात राहणं आणि ते टिकवणं ही तशी फार मोठी गोष्ट. अलीकडे रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांचं प्रमाण वाढत असलं तरी या रिलेशनशिप ब्रेक होण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. रिलेशनिशपमध्ये असताना आपल्याकडे घडलेले थराररक आणि जीवघेणे प्रकारही नवे नाहीत. त्यामुळे या नात्यांविषयीच समाजात साशंकता वाटू लागली आहे. 

अलीकडचेच ताजे उदाहरण म्हणजे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी. इटलीच्या त्या पहिल्याच महिला पंतप्रधान. २०२२मध्ये निवडणुका जिंकून त्यांनी इतिहास रचला होता. सध्या त्यांचं वय ४७ वर्षे आहे. २००८मध्ये वयाच्या ३१व्या वर्षी इटलीच्या सर्वात युवा मंत्री बनतानाही त्यांनी इतिहास घडवला होता. 

त्यांची धडाडी खूपच मोठी आहे. एक बिनधास्त आणि धाडसी नेत्या म्हणून जगाला त्यांचा परिचय आहे. आत्ता पुन्हा एकदा त्या चर्चेत येण्याचं कारण म्हणजे आपल्या बॉयफ्रेंडपासून त्यांचं विभक्त होणं. 

गेली दहा वर्षे त्या रिलेशनशिपमध्ये होत्या. या रिलेशनमधून त्यांना सात वर्षांची एक मुलगीही आहे. एका नामांकित न्यूज चॅनेलचा अँकर असलेल्या पत्रकार अँड्रिया जिआमब्रुनोसोबत गेली अनेक वर्षे त्या रिलेशनशिपमध्ये आहेत. पण हे नातंच त्यांना आता फार डोईजड होऊ लागलंय. मुळात गेल्या काही काळापासून आपल्या या बॉयफ्रेंडशी त्यांचं जमत नव्हतंच, तरीही त्यांनी हे नातं टिकविण्याचा प्रयत्न केला. पण पाणी डोक्यावरून वाहायला लागल्यावर त्यांनी नातं तोडलं नाही, तरी एकमेकांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. पण बॉयफ्रेंडचे ‘कारनामे’ अधिकच वाढल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे या जोडीदारापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. 

अँड्रिया जिआमब्रुनोमुळे त्यांचं राजकीय अस्तित्वही पणाला लागलं होतं आणि रोज त्यांना त्यामुळे विविध कटकटींना सामोरं जावं लागत होतं. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागत होती. जॉर्जिया यांना विरोधी पक्षांनीही घेरल्यामुळे सर्व बाजूंनी त्यांची कोंडी झाली होती. शेवटी गेल्या महिन्यात जॉर्जिया यांना जाहीरपणे सांगावं लागलं होतं, ‘माझ्या बॉयफ्रेंडच्या वर्तनाचा संबंध माझ्या कामगिरीशी जोडला जाऊ नये. जिआमब्रुनोच्या मतांवरून माझी परीक्षाही केली जाऊ नये. त्याच्या कृत्यांना मी ‘जबाबदार’ कशी? त्यामुळे भविष्यातही त्याच्या वर्तणुकीबद्दल आपण उत्तरं देणार नाही,’ असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. 

जिआमब्रुनोनं नुकत्याच केलेल्या अश्लील टिप्पणीमुळे तो चर्चेत आला होता. जिआमब्रुनो हा एक शो होस्ट करतो. याच शोच्या काही ऑफ एअर क्लिप नुकत्याच व्हायरल झाल्या. त्यातील एका क्लिपमध्ये आपल्या महिला सहकाऱ्याशी अश्लील वर्तन आणि अश्लील संभाषण करताना तो आढळून आला. या संभाषणात तो तिच्याशी लगट करताना तर दिसतोच, पण तो तिला म्हणतो, ‘तू जर माझ्याशी शारीरिक संबंध ठेवलेस तर मी तुला इतक्या उंचीवर नेऊन ठेवीन की, तू त्याची कधी स्वप्नातही कल्पना केलेली नसेल.’ त्याआधी काही दिवसांपूर्वीच एका महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणीही जिआमब्रुनोनं केलेली टीका वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्यात त्यानं म्हटलं होतं, ‘तुम्ही जर डान्स करण्यासाठी पबमध्ये जात असाल, तर तिथे गेल्यावर मद्यप्राशन करण्याचा तु्म्हाला पूर्ण अधिकार आहे. तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला काहीच अडचण येण्याची शक्यता नाही, पण तिथे जाऊन जर तुम्ही अति मद्यप्राशन केलं आणि तुमचं भान हरपलं तर मात्र तुम्हाला नको त्या प्रसंगाला सामोरं जावं लागू शकतं.’ 

जिआमब्रुनोचं असं वागणं, त्याची शेरेबाजी आणि महिलांबाबतचं त्याचं वर्तन यामुळे अलीकडे मोठं वादळ उठलं. त्यामुळे तो स्वत: तर वादाच्या भोवऱ्यात सापडलाच, पण पंतप्रधान जॉर्जिया यांनाही अडचणीत टाकलं. त्यामुळे अनेकांनी जॉर्जिया यांना टीकेचं लक्ष्य केलं. अर्थात जिआमब्रुनोची ही जुनी सवय आहे. याआधीही बऱ्याचदा त्यानं स्वत:हून वाद ओढवून घेतला. त्यामुळे जॉर्जिया यांनी ट्विटरवरूनच जाहीरपणे या नात्याला आता पूर्णविराम देत असल्याचं घाेषित केलं. पंतप्रधानपदी असताना अशी जाहीर घोषणा करणाऱ्या जॉर्जिया या जगातील पहिल्याच महिला पंतप्रधान आहेत.

जॉर्जिया यांनीही ओढवून घेतलेत वाद! 

बॉयफ्रेंडमुळे पंतप्रधान जॉर्जिया अडचणीत आल्या असल्या, तरी त्यांनी स्वत:ही अनेकदा वाद ओढवून घेतले आहेत. गेल्यावर्षी निवडणुकीआधी पंतप्रधानपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या जॉर्जिया यांनी थेट एका बलात्काराचाच व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं, ‘अशा कृत्यांचा मी कठोरपणे बंदोबस्त करेन!’ विरोधकांनी यावर प्रखर टीका करताना, मते मिळविण्यासाठीचा हा अत्यंत घृणास्पद प्रकार असल्याचं म्हटलं होतं ! 

 

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीItalyइटली