शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

शिक्षण संस्थांमध्ये धर्मविचार शिरणे असंवैधानिक नव्हे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:01 IST

सरकारी निधीतून चालणाऱ्या शिक्षण संस्थेत एकाच धर्माचे शिक्षण देण्याच्या विरोधात राज्यघटनेत स्पष्ट तरतूद असूनही पंधरा वर्षांपासून तेच चालू आहे.

डॉ. सुखदेव थोरात

माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग

छत्रपती संभाजीनगर येथे महाविद्यालयीन परिसरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला आक्षेप घेतल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या या कृतीने महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. तो प्रश्न म्हणजे काही वर्षापासून शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिरू पाहणारे एका विशिष्ट धर्माचे शिक्षण !

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २८ (१) मध्ये म्हटले आहे की, 'राज्याच्या निधीतून संपूर्णपणे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत एका विशिष्ट धर्माचे शिक्षण दिले जाणार नाही.' अनुच्छेद २८(१) विषयी संविधान सभेत स्पष्टीकरण देताना डॉ. आंबेडकरांनी सांगितले होते की, या अनुच्छेदाद्वारे धर्माविषयी एका स्वतंत्र विभागात तुलनात्मक अभ्यास करण्यास मुभा असेल, परंतु एका धर्माची विचारसरणी व उपदेश करण्यास परवानगी असणार नाही. तसेच, शैक्षणिक परिसरात एका धर्माची पूजा किंवा धार्मिक विधी पार पाडण्यासही प्रतिबंधित करण्यात येईल. इतकी स्पष्ट तरतूद असूनही गेल्या पंधरा वर्षांपासून एकाच (हिंदू) धर्माची शिकवणूक वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे.

यासंदर्भातील काही उदाहरणे देता येतील. विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारा २०२३ मध्ये शाळा आणि महाविद्यालयांसाठी तयार केलेली पाठ्यक्रम रूपरेषा 'भारतीय ज्ञान प्रणाली' संज्ञेच्या आधारावर तयार करण्यात आली. 'भारतीय ज्ञान प्रणाली' मध्ये भारतात निर्माण झालेल्या सर्व ज्ञानांचा समावेश केला असल्याचे सांगितले गेले. मात्र, प्रत्यक्ष अभ्यासक्रमात हिंदू धार्मिक विचारसरणीचा समावेश करण्यात आला आणि बौद्ध, जैन व शीख धर्म, इतर परंपरा वगळण्यात आल्या. या पाठ्यक्रमात भारतीय तत्त्वज्ञानातील नऊ दर्शने किंवा विचारप्रवाह समाविष्ट आहेत, ज्यामध्ये वेद, पुराण, उपनिषद, भगवद्गीता आणि विविध स्मृती, विशेषतः मनुस्मृती यांचा आधार घेतला आहे. याशिवाय अलीकडेच यूजीसीने सामाजिक शास्त्रे आणि विज्ञानातील पदवी अभ्यासक्रमांसाठी ११ विषयांची पाठ्चक्रम रूपरेषा जाहीर केली, तीही याच साहित्यावर आधारित आहे. यूजीसीने २०२३ द्वारे तयार केलेल्या 'मूल्य प्रवाह' नावाच्या नैतिक शिक्षण अभ्यासक्रमात भगवद्‌गीतेच्या कर्मतत्त्वाचा आणि आदी शंकराचार्याचा संदर्भ दिला आहे. तसेच, 'ईशोपनिषद' याचा संदर्भही दिला आहे, ज्यामध्ये सांगितले आहे की, 'या जगात अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी ईश्वरनिर्मित आहेत. ही सत्यता शाश्वत आणि अपरिवर्तनीय आहे आणि वेदांमध्ये अंतर्भूत आहे, ज्यावर टीका करता येत नाही.'

शालेय अभ्यासक्रमामध्ये NCERT ने २०२३ मध्ये पाठ्चक्रम रूपरेषा तयार केली. या पाठ्यक्रमातील 'नैतिक शिक्षण' अभ्यासक्रमात असे सांगितले आहे की, 'मूल्ये म्हणजे योग्य काय व अयोग्य काय याचे शिक्षण. मूल्य शिक्षणाचा उद्देश म्हणजे योग्य कार्य करण्याची क्षमता आणि चारित्र्य निर्माण करणे'. या अभ्यासक्रमात धार्मिक मूल्यसंस्कार करण्यासाठी केवळ भगवद्‌गीता, वेद, विविध विविध स्मृतींमधील मूल्यांचाच संदर्भ दिला आहे. शिक्षण क्षेत्रात आणखी एक बाब आहे जिथे, धार्मिक शिक्षणाबाबत सरकारचे धोरण संविधानाशी सुसंगत नसल्याचे दिसते. वास्तविक पाहता संविधानाने संस्कृत, पाली, प्राकृत, तमिळ, तेलुगू यांसारख्या शास्त्रीय भाषांचा प्रचार करण्यासाठी शिक्षणसंस्था स्थापन करण्यास परवानगी दिली आहे Mumni Msin आणि त्यांना आर्थिक पाठबळदेखील देण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे २०१९ मध्ये १८ संस्कृत विद्यापीठे आणि १,११९ संस्कृत संलग्न महाविद्यालये आहेत. महत्त्वाचे म्हणजे, जरी ही सर्व संस्कृत भाषा विद्यापीठे/महाविद्यालये असली, तरी त्यामध्ये एका धर्माचीच विचारधारा शिकवली जाते.

काही काळापासून अंमलात असलेली ही सरकारी धोरणे संविधानाच्या अनुच्छेद २८(१) शी सुसंगत नाहीत. तसेच संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेशीही सुसंगत नाही. त्याचबरोबर ही धोरणे अनुच्छेद १५ (१) शीही सुसंगत नाहीत. फक्त एका धर्माचे शिक्षण आणि उपदेश मर्यादित ठेवणे आणि अल्पसंख्याक धर्माना वगळणे म्हणजे अल्पसंख्याक धर्माबाबत होणारा भेदभाव आहे. तसेच, हे धोरण सर्वांना धर्माच्या स्वातंत्र्याची हमी देणाऱ्या अनुच्छेद २५ चे उल्लंघन करते. यासोबतच असे दिसते की, हे अनुच्छेद ७० (१) 'नागरिकांची कर्तव्ये' आणि अनुच्छेद ३६ 'राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व' यांच्याशी देखील हे सारे विसंगत आहे. यासंदर्भात सरकारने व विरोधी पक्षांनी चाचपणी करणे आवश्यक आहे. एकधर्मीय शिक्षण संविधानाचे उल्लंघन करते किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. वंचित बहुजन आघाडी ने संविधानाच्या बाजूने भूमिका घेतली आहे आता सरकार कुणाची पाठराखण करते, ते पाहायचे !

thorat1949@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Is Imposing Religious Ideology in Educational Institutions Unconstitutional?

Web Summary : Dr. Thorat questions the inclusion of Hindu religious teachings in educational curricula, deeming it potentially unconstitutional and discriminatory towards minority religions. He urges scrutiny of government policies promoting a single religion within education, citing violations of secular principles.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ