शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2020 : विराट आणि रोहितमधून विस्तव जात नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 06:27 IST

IPL 2020 : भले त्याने धावा नसतील केल्या. भले मिडऑफच्या सेफ जागेवर त्याने क्षेत्ररक्षण केलं असेल. पण संशयाचं धुकं  गडद झालं. त्यातून निर्माण झालेला महत्त्वाचा प्रश्न असा की, विराट आणि रोहितमधून विस्तव जात नाही का? गेल्या वर्ल्डकपपासून त्यावर चर्चा आहे. 

- द्वारकानाथ संझगिरी(चित्रपट-क्रीडा समालोचक)

फार काहीही न करता सध्या रोहित शर्मा हा बातमीतला माणूस आहे.  तो अनफिट होऊन मुंबई संघाबाहेर  बसला. त्याला राष्ट्रीय निवड समितीने ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी वगळलं. उपकर्णधारपदाची त्याची वस्र काढून बँगलोरच्या कन्नूर लोकेश राहुलवर चढवली.  रोहित अनफिट आहे हे कळतंच होतं. पण त्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? - वगैरे कळवायची तसदी नियामक मंडळाने घेतलीच नाही. त्यामुळे मग संशयाचं धुकं पसरलं. तो संशय वाढला कारण अनफिट रोहित शर्मा पुन्हा आयपीएलमध्ये खेळला. 

भले त्याने धावा नसतील केल्या. भले मिडऑफच्या सेफ जागेवर त्याने क्षेत्ररक्षण केलं असेल. पण संशयाचं धुकं  गडद झालं. त्यातून निर्माण झालेला महत्त्वाचा प्रश्न असा की, विराट आणि रोहितमधून विस्तव जात नाही का? गेल्या वर्ल्डकपपासून त्यावर चर्चा आहे. मंडळाने त्याला वगळण्याची नीट कारणं दिली नाहीत. संघाबाहेर कुणी सोम्या-गोम्या जात नव्हता, विश्वचषक २०१९ मध्ये पाच शतकं ठोकणारा फलंदाज जात होता. ज्याला  जग वनडेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज  मानतं, त्याच्या फॅन्सना, क्रिकेट रसिकांना त्याला  नेमकं का वगळलं हे  कळण्याचा हक्क आहे की नाही? सुनील गावस्करने बाॅम्ब ठोकल्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला. मग मंडळाला काही गोष्टी स्पष्ट कराव्या लागल्या.  म्हणजे प्रश्न विचारले गेले नसते तर रोहित नावाची ‘ब्याद’ तिथून थेट भारतात पाठवायचा विचार होता का? असा संशय येऊ शकतो. आता मंडळाने म्हटलंय की रोहितच्या फिटनेसकडे लक्ष ठेवणार. म्हणजे त्याला ऑस्ट्रेलियाला घेऊन जायलाच हवं, कारण तो बायो बबलमध्ये आहे. 

टॉपवर असलेल्या एकाच संघाच्या दोन खेळाडूंमध्ये काहीना काही तरी स्पर्धा असतेच. विराट - रोहित हे तसे पॉपिंग क्रिजचे राजपुत्र आहेत. एक टी-ट्वेन्टी, वनडेचा राजा आहे. दुसरा तिन्ही फॉरमॅटचा बादशहा आहे. संघात  विराट किंवा रोहितपैकी एकाला घायचं असेल तर मी विराटला घेईन.  पैसे देऊन बॅटिंग पहायची असेल तर मी रोहितला पाहीन. टायमिंग, फटक्यातली सहजता, शैली यात रोहित विराटपेक्षा वर आहे. पण फलंदाजी इथेच संपत नाही. त्यात सातत्य, टेम्परामेंट, बचाव अशा आणखी कितीतरी गोष्टी  अंतर्भूत असतात. त्या विराटला रोहितपेक्षा वरच्या मजल्यावर घेऊन जातात. म्हणून विराट कर्णधार झाला आणि रोहित झाला नाही. रोहितने फिटनेस ही गोष्ट विराट इतकी कधीच गंभीरपणे घेतली नाही. कोविडनंतर विराटला मैदानावर पाहताना कोविड  ‘मानवल्या’सारखं वाटलं नाही. तो तसाच होता जसा तो सहा महिन्यांपूर्वी होता. रोहितला कोविडनंतरची शांतता  ‘मानवलेली’ वाटली.रोहितची फलंदाजी ही आळसावलेली फलंदाजी असते. आणि म्हणूनच ती   पहायला मला प्रचंड  आवडते.  ज्याचं वर्णन इंग्लिशमध्ये

 ‘रिलैक्सड सिल्कीनेस’ असं होऊ शकतं. पण क्षेत्ररक्षण करताना रोहित विराटप्रमाणे मैदानावर ‘लाइव वायर’ वाटत नाही. त्याचा शॉक फलंदाजाला बसत नाही. रोहित सध्या त्याच्या करिअरच्या टॉपवर आहे. विशेषत: वनडेमधल्या वर्ल्डकपनंतर ! किमान चार वर्ष आधी रोहितने आपली कसोटी क्रिकेटमधली जागा भक्कम करायला हवी होती. तो ती तशी करू शकला नाही,  कारण कसोटी क्रिकेटमध्ये लागणारा पेशन्स आणि बचाव हा त्याच्याकडे नसावा, असं वाटतं. कसोटी क्रिकेटमध्ये पाय रोवून फलंदाजी करावीच लागते. आणि ती करण्याची कुवत अजून त्याने दाखवलेली नाही. दोन खेळाडूमधली  स्पर्धा ही  कुरूप रूप घेऊ शकते.  तुम्ही ठरवलंत की ज्या माणसाबरोबर माझी स्पर्धा आहे त्या माणसापेक्षा जास्त चांगला मी परफॉर्मन्स देईन, तर ती स्पर्धा सशक्त असू शकते. ती जेव्हा सशक्त स्पर्धा होईल त्यावेळी हे दोघेही एकाच स्तरावरचे पॉपिंग क्रिजचे राजपुत्र असतील. रोहितने विराटच्या मजल्यावर रहायला जायचा प्रयत्न करावा. त्याला शक्य आहे. पण वर जायचा जिना सोपा नाही.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीRohit Sharmaरोहित शर्माIPL 2020IPL 2020