शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

एआय आयटीच्या मुळावर येतंय का? अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात!

By मनोज गडनीस | Updated: June 15, 2025 08:32 IST

तंत्रज्ञान क्षेत्राने आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय हे तंत्रज्ञान जन्माला घातले आहे, ते आयटी इंजिनीअरच्या नोकऱ्या खाताना दिसत आहे.

मनोज गडनीस , विशेष प्रतिनिधी: भारतीय घरांमध्ये मुलांना डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हायचे आहे, हे मनावर बिंबवले जाते. मात्र, त्यातही जर इंजिनीअरिंग करायचे असेल, तर ते कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच करायचे हे सूत्र पालकांनी आखून दिलेले असते. याचे कारण म्हणजे संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले म्हणजे हमखास नोकरी, उत्तम पगार, परदेशात काम करण्याची संधी हे समीकरण गेल्या अडीच दशकांपासून रुजले आहे. विशेष म्हणजे, गेल्या अडीच दशकांत अन्य शाखेतील अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देखील संगणक शास्त्राचे अद्ययावत शिक्षण घेऊन त्या क्षेत्रात नोकरी स्वीकारल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. पण, आता थोडा तांत्रिक विरोधाभास असा निर्माण झालाय की, ज्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय हे तंत्रज्ञान जन्माला घातले आहे, ते आयटी इंजिनीअरच्या नोकऱ्या खाताना दिसत आहे. आयटी उद्योगाची सध्या काय परिस्थिती आहे, एआयमुळे त्याला कसा फटका बसत आहे, याची ही आकडेवारी.

- प्रत्येक वर्षी भारतामधील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांतून १० लाख ५० हजार विद्यार्थी संगणक शास्रातील विविध प्रकारचे शिक्षण घेतात. - गेल्या ३० वर्षांत वर्षाकाठी किमान २० टक्के दराने उद्योगात वाढ झाली आहे.- देशाच्या जीडीपीमध्ये आयटी उद्योगाचे ८ टक्के योगदान - २०२४ पर्यंत आयटी उद्योगात कार्यरत भारतीयांची संख्या ५० लाख ८० हजार. 

आयटी उद्योगात वयाच्या पस्तीशीमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या - बंगळुरू या एका शहरात १५०० आयटी कंपन्या आहेत, तर हैदराबाद, पुणे, मुंबई येथील आयटी कंपन्यांची संख्याही लक्षणीय.- आयटी क्षेत्रातील स्टार्ट अप कंपन्यांचीच संख्या एक लाखाहून अधिक.- २०२३ मध्ये भारतीय आयटी कंपन्यांनी तब्बल २०० अब्ज अमेरिकी डॉलरची उलाढाल निर्यातीच्या माध्यमातून केली. - आयटी उद्योगातील एका बड्या कंपनीच्या सर्वेक्षणानुसार सॉफ्टवेअरचे बेसिक कोडींग, डेटा एन्ट्री, सॉफ्टेवअर टेस्टिंग या कामांसाठी असलेल्या नोकऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांत ३० टक्के कपात.

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईjobनोकरी