शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कोरोनाने घेतली आयपीएलची विकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 02:11 IST

कोरोनामुळे अडखळलेल्या अर्थचक्राला मंद का होईना, वेग देण्याचे काम आयपीएलमुळे होत होते. लाखो क्रिकेटप्रेमी घरी थांबू लागले हाही फायदाच होता.

ठळक मुद्देआयपीएलसारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या स्पर्धेचे नियोजन एका रात्रीत होत नसते. हे नियोजन झाले तेव्हा केंद्रातले, राज्यातले सरकार आणि बव्हंशी जनतादेखील कोरोनाचे संकट संपत आल्याच्या भ्रमात होती.

सृकृत करंदीकर

चौदाव्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) ची अखेर झालीच. अनिश्चित कालावधीसाठी ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) घ्यावा लागला. ही स्पर्धा ज्या सहा शहरांमध्ये खेळली जात होती, त्या सर्वच शहरांत कोरोनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. मैदानाच्या चोहोबाजूने कोरोना दबा धरून बसलेला आहे, मैदानाच्या अवतीभोवती लोक मरत आहेत, ऑक्सिजनसाठी तडफडताहेत, अंत्यसंस्कारासाठी रांगा लावत आहेत, त्याचवेळी मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी चालू असल्याचे विदारक चित्र दिसू लागले. या पार्श्वभूमीवर क्रिकेटचा शौक महत्त्वाचा आहे का? रात्रीच्या उजेडात क्रिकेटचा श्रीमंती थाट हवा कशाला? असे सवाल विचारले जाऊ लागले. आयपीएल भरवणारे, क्रिकेट खेळणारे आणि पाहणारे हे सगळे जणू अमानवी, क्रूर असल्याचे भासवले जाऊ लागले. 

वास्तविक ही चर्चा केवळ भावनिक आहे. कोरोना विषाणूमुळे अडखळलेल्या अर्थचक्राला मंद का होईना, पण वेग देण्याचे काम आयपीएल क्रिकेटमुळे होत होते. रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना सामने खेळले जात असल्याने कोरोना साथ पसरण्याचा धोका संपला होता. दररोज संध्याकाळी रंगणाऱ्या थराराचा आनंद लुटण्यासाठी का होईना लाखो क्रिकेटप्रेमी घरी थांबू लागले हाही एक अप्रत्यक्ष फायदाच होता. आयपीएल खेळणाऱ्या प्रत्येक संघाला ‘बायो-बबल’चे नियम अनिवार्य केल्याने तर चार रोजगार वाढलेच, पण कमी झाले नाहीत. एकूणात काय तर आयपीएल क्रिकेटमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे काही कुठे दिसले नाही. आठ देशांमधले खेळाडू एकत्र करत, ‘बायो-बबल’चे नियम पाळत सामने खेळवणे ही कोरोना संकटकाळात फार कठीण कामगिरी होती. खेळाडूंच्या मानसिकतेचीही कसोटी यात पाहिली गेली. नातेवाईक, मित्रपरिवाराला कोरोनाचा धोका असताना क्रिकेटच्या मैदानावर उतरणारा प्रत्येक खेळाडू सर्वोच्च कामगिरीसाठी घाम गाळत होता. दुसऱ्या बाजूला कोणतेही व्यवहार्य, तर्कशुद्ध कारण न देता आयपीएलच्या नावाने खडे फोडले जात होते. तरीही बीसीसीआयने नेटाने स्पर्धा चालू ठेवली. फक्त क्रिकेटच कशाला पुण्यासारख्या शहरात आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धाही कोरोनाच्या काळातच खेळल्या गेल्या. पण, क्रिकेटएवढे ग्लॅमर त्याला नसल्याने बहुधा त्यावर कोणी टीका केली नाही. शेवटी कोरोनानेच आयपीएल थांबवली. खेळाडूंनाच कोरोनाने गाठल्याने बीसीसीआयपुढचे पर्याय संपले.   

आयपीएलसारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या स्पर्धेचे नियोजन एका रात्रीत होत नसते. हे नियोजन झाले तेव्हा केंद्रातले, राज्यातले सरकार आणि बव्हंशी जनतादेखील कोरोनाचे संकट संपत आल्याच्या भ्रमात होती. याला बीसीसीआयदेखील अपवाद नव्हती, तरी बीसीसीआयने सहाच शहरांत सामने खेळवण्याचा सुज्ञपणा दाखवला. स्पर्धेतील संघांसाठी काटेकोर नियमावली केली. चेन्नई, मुंबईत पहिल्या टप्प्यातले सामने झाले. सध्या दुसऱ्या टप्प्यातले सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळले जात होते. तिसऱ्या टप्प्यातले सामने येत्या आठवड्यात बंगळुरू आणि कोलकात्यात होणार होते. रंगतदार होत गेलेली आयपीएल अंतिम टप्प्याकडे जात असतानाच कोरोनाने ‘बायो-बबल’ फोडल्याचे स्पष्ट झाले. यात फार काही अघटीत घडले असे नाही. कोरोना संसर्गाची तीव्रता लक्षात घेता हे कधी ना कधी घडू शकते, अशी धास्ती होती. नेमके तेच घडले. उद्योगधंदे बंद पडल्याने, पगार कमी झाल्याने, नोकऱ्यांवर टांगती तलवार आल्याने आर्थिक-सामाजिक विवंचनेत अनेकजण आहेत. त्यातच कोरोना कधी कोणाला, गाठेल याचा नेम नसल्याचा ताण वेगळाच. पण म्हणून कोणी जगणे थांबवते काय़? संवदेनशीलता कायम ठेवून आहे ते जगणे आनंदी करत पुढे चालण्याचे तारतम्य दाखवावे लागते. क्रिकेट काय किंवा अन्य कला, क्रीडाप्रकार.. कोरोनाकाळात यातून मिळेल तितके बळ घ्यावे. सकारात्मक ऊर्जा घ्यावी. ‘मरे येक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे,’ हे शाश्वत सत्य तर आहेच की. उन्माद टाळून, आनंद वाटत राहिले तरच सध्याचे दिवस सोपे होतील. क्रिकेटच्या माध्यमातून हे घडत होते. ते थांबले.

(लेखक लोकमत पुणे येथे सहसंपादक आहेत)

टॅग्स :IPLआयपीएल २०२१corona virusकोरोना वायरस बातम्या