शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आंतरराष्ट्रीय योग दिवस: आरोग्य आणि आत्मिक समृद्धीसाठी एक पाऊल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:36 IST

International Yoga Day: यंदा २१ जून रोजी अकरावा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जाईल. भारताची ही अमूल्य देणगी समग्र जीवनशैलीचा जागतिक उत्सव ठरली आहे.

- प्रतापराव जाधव (केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ‘आयुष’, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री) 

मागील महिन्यात ग्रामीण महाराष्ट्राचा दौरा करत असताना एका ज्येष्ठ शेतकऱ्याशी भेट झाली. अनेक वर्षं पाठदुखीच्या त्रासानं हैराण झाल्यावर योगाभ्यासामुळे त्यांचे जीवन पूर्ण बदलून गेले होते. ते मला म्हणाले, “मंत्रीसाहेब, पूर्वी आपल्या गावात गुपित असलेली ही गोष्ट आता जगासाठी औषध झाली आहे.”- त्यांच्या डोळ्यांतील तेजाने मला योग दिनाच्या महत्त्वाची  जाणीव करून दिली.

यंदा २१ जून २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विशाखापट्टणम येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. २०१४ मध्ये पंतप्रधानांनी ही संकल्पना संयुक्त राष्ट्रांसमोर मांडली आणि आज ती जगभरातील कोट्यवधी लोकांनी आत्मसात केलेली एक जागतिक चळवळ बनली आहे. भारताने दिलेली ही अमूल्य देणगी आज आरोग्य, समरसता आणि समग्र जीवनशैलीचा उत्सव ठरली आहे.

योग दिनाच्या दशकपूर्तीचे औचित्य साधत, ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ हा १०० दिवसांचा उपक्रम आखण्यात आला आहे. १० वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसह देशभरात आणि जगभरात योगाभ्यासाच्या महत्त्वाचा प्रसार केला जाईल. 

हे १० वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असे- १. योग संगम : संपूर्ण देशात १ लाख ठिकाणी एकाच वेळी सामूहिक योगाभ्यास. हिमालयातील बर्फाच्छादित गावांपासून ते समुद्रकिनाऱ्यावरील मच्छीमार वसाहतींपर्यंत लाखो नागरिक एकत्र योगासने करतील. हे आरोग्य, ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत प्रतीक असेल!२. योग बंधन : जपानसारख्या देशांत भाषा न समजतासुद्धा लोकांना एकत्र आणणारी शक्ती आहे योगाभ्यास. १० भागीदार देशांसोबत योग प्रतिनिधींचे परस्पर आदान-प्रदान करून जागतिक मैत्रीस बळ दिले जाईल.३. योग पार्क :  शहरी आणि ग्रामीण भागातील १,००० सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी योग आणि आरोग्याच्या दृष्टीने समर्पित ‘योग उद्यानां’ची उभारणी. ४. योग समावेश :  १० विशेष गटांसाठी अनुकूल योगाभ्यासाचा अभ्यासक्रम- मधुमेही, उच्चदाबाचे रुग्ण, महिला, गरोदर स्त्रिया, वृद्ध, मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती क्षेत्रातील नागरिक यांना योग्य मार्गदर्शन.५. योग प्रभाव :  गेल्या १० वर्षांतील प्रगतीचे संशोधन आणि आकडेवारीसह दस्तावेजीकरण.  दिल्लीतील एका शिक्षिकेला योगाभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत सुधारणा दिसली,  चेन्नईतील एका उद्योजकाचा रक्तदाब योगाभ्यासामुळे नियंत्रित झाला... अशा अनुभव कथांचे संकलन.६. योग कनेक्ट : हायब्रिड स्वरूपात जागतिक परिषद – योगतज्ज्ञ, धोरणकर्ते, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रभावशाली व्यक्तींना एकत्र आणणारा चर्चा-मंच.७. हरित योग : निसर्गाशी एकरूपता साधत पर्यावरणपूरक कृतींसोबत योगाभ्यास ८. योग अनप्लग्ड : तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन नवकल्पनाशील स्वरूपे – पारंपरिक योगाभ्यास आणि आधुनिक संगीत व नृत्य यांचे मिश्रण ९. योग महाकुंभ : मागील १० प्रमुख योग दिवस साजरा केलेल्या शहरांमध्ये आठवडाभर चालणारे महोत्सव - सामुदायिक सहभागातून योगाचा उत्सव.१०. योग संयोग : योग व आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमिओपथी, निसर्गोपचार, सोवा रिग्पा यांसारख्या पद्धतींचा आधुनिक आरोग्य व्यवस्थेशी संयोग - वैज्ञानिक आधारासह प्रस्तुती.माझा स्वतःचा योगप्रवास मला नेहमी आठवतो. कॉलेजमध्ये आजोबांच्या आग्रहामुळे योगासने सुरू केली होती; पण आज माझी प्रत्येक सकाळ सूर्यनमस्काराशिवाय पूर्णच होत नाही. मानसिक संतुलन आणि दिवसभरासाठीची ऊर्जा त्यातून मिळते.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या दशकपूर्तीनिमित्त, मी प्रत्येक भारतीयाला आवाहन करतो - तुम्ही अनुभवी योगसाधक असाल किंवा तुम्हाला एकाही आसनाचा अनुभव नसेल तरी या उत्सवात सहभागी व्हा. स्वतः अनुभव घ्या - कारण या प्राचीन पद्धतीत आधुनिक आरोग्याची खरी गुरुकिल्ली दडलेली आहे.

आज भारत योगाभ्यासाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीसाठी समग्र आरोग्याचा मार्ग दाखवीत आहे. ही भारताची विश्वाला दिलेली देणगी होय, जी अक्षय राहील.  २१ जून रोजी पंतप्रधान मोदी हजारो लोकांसमवेत योगासने करतात, तेव्हा आपला आरोग्यप्रति असलेला राष्ट्रीय संकल्प दृढ होतो.

योगाभ्यास म्हणजे फक्त आसने किंवा शारीरिक व्यायाम नाही - तो आपल्या आरोग्याचा, मनःशांतीचा आणि आत्मिक समृद्धीचा मार्ग आहे. या दशकपूर्तीच्या ऐतिहासिकप्रसंगी प्रत्येक घरात, प्रत्येक मनात योगाभ्यास रुजवायचा संकल्प करूया. आपल्या भागात आयोजित होणाऱ्या योग संगमात सहभागी व्हा. आपल्या कुटुंबाला, शेजाऱ्यांना, मित्रमंडळींना सोबत घेण्याचा संकल्प करा. सोशल मीडियावर #YogaForOneEarthOneHealth या हॅशटॅगने आपला अनुभव शेअर करा.ही केवळ एक चळवळ नाही, ही भारताच्या आत्म्याची जागतिक अभिव्यक्ती आहे. या योग प्रवासात तुमचं स्थान निश्चित आहे; त्यासाठी फक्त एक पाऊल पुढे टाका.

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनPrataprao Jadhavप्रतावराव जाधव