शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बारामती वाड्यावरचं बौद्धिक

By राजा माने | Updated: December 25, 2017 02:35 IST

रेशीमबागच्या बौद्धिकाला इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर आमचा यमके (एम.के. अर्थात मनकवडे) ला देखील प्रवेश मिळाला नव्हता... त्यात आता बारामती वाड्यावरचं बौद्धिक त्याच्या नशिबी रिपोर्टिंगसाठी आलं!

रेशीमबागच्या बौद्धिकाला इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर आमचा यमके (एम.के. अर्थात मनकवडे) ला देखील प्रवेश मिळाला नव्हता... त्यात आता बारामती वाड्यावरचं बौद्धिक त्याच्या नशिबी रिपोर्टिंगसाठी आलं! या बौद्धिकाला पवारसाहेबांनी मराठीभूमीतील निवडक प्रस्थापितांनाच निमंत्रण धाडलेलं होतं... यमकेनं थेट पवारसाहेबांनाच गळ घालून प्रवेश मिळविला. ‘रिझल्ट ओरिएंटेड’ रिपोर्टिंग इंद्र दरबारी पोहोचविण्याच्या अटींवर साहेबांनी त्याला बौद्धिकाला प्रवेश दिला. बौद्धिक सभास्थानी अजितदादांपासून जितेंद्रभाऊपर्यंतचा नेहमीचा यशस्वी एकही चेहरा दिसत नव्हता. उपस्थित समस्त प्रस्थापितांचे बौद्धिक घेण्यासाठी पूजनीय अडवाणी, राळेगणचे अण्णा, खान्देशचे नाथाभाऊ आणि सुरेशदादा, विदर्भातून पटोल्यांचे नाना यासारखी दिग्गज मंडळी येणार असल्याचे निमंत्रितांना सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात बौद्धिकाची प्रार्थना झाली आणि स्टेजवर फक्त पवारसाहेबच अवतरले! हे पाहून उपस्थित प्रस्थापित विचलित झाले व कुजबूज करू लागले. साहेबांनी माईकचा ताबा घेतला आणि बोलते झाले...पवारसाहेब : प्रस्थापित मित्रांनो, देशाच्या आणि राज्याच्या भविष्याबद्दल मंथन व्हावे या उद्देशाने तुम्हाला या ठिकाणी बोलावले आहे. (भविष्य हा शब्द ऐकताच पुण्यातून आलेला एक गट चवताळून उठला आणि त्यातील हर्षवर्धन बोलू लागले...)हर्षवर्धन : साहेब, आपल्या पुण्याचे खा. काकडे महाराज भविष्यवाले असताना भविष्याची चर्चा आपण कशाला करायची?पवारसाहेब : हर्षवर्धन भाऊ, त्यांच्या भविष्याचा फायदा नरेंद्रभाऊ आणि देवेंद्रपंतांना होईल. पण, पुण्याचे म्हणून तुम्ही-आम्ही काकडे महाराजांना हात दाखवूनच घेऊ!हा संवाद चालू असतानाच नाथाभाऊंची एन्ट्री झाली. त्यांच्यासोबतच्या पाच-सहा जणांनी ‘प्रस्थापित नाथाभाऊंचा विजय असो’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. एवढ्यात निमंत्रण नसताना घुसलेले आ. नितेशही घोषणा देऊ लागले, ‘कुंपणावरील ढेगू-पाटील विखेंचा विजय असो’, ही घोषणाबाजी सुरू असतानाच रावतांच्या संजयची नवजुद्दीन सिद्धीकीसह एन्ट्री झाली. हे चाललेले असतानाच छगनरावांचा विशेष निरोप आल्याने आजचे बौद्धिक उद्यावर ढकलल्याची घोषणा पवारसाहेबांनी केली.