शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जन्ता रांगेत हाय.. राजकारणबी लय रंगात हाय !

By सचिन जवळकोटे | Updated: May 13, 2021 11:36 IST

भूतलावर प्रत्येक गोष्टीसाठी रांगा लागल्यात म्हटल्यावर इंद्र देवांनी नारद मुनींना खाली धाडले. मुनी बघतात, तर काय...

सचिन जवळकोटेइंद्रांच्या कानावर कलकलाट पडला. डिस्टर्ब होऊन त्यांनी विचारताच नारद म्हणाले, ‘भूतलावर प्रत्येक गोष्टीसाठी प्रचंड रांगा लागल्यात. हॉस्पिटलसमोर बेडसाठी, मेडिकलसमोर रेमडेसिविरसाठी, सिव्हिलसमोर लसीसाठी तर झुणका-भाकर केंद्रासमोर शिवभोजन थाळीसाठी रांग. हे सारं कमी पडलं की काय म्हणून स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी प्रेतांची रांग.. अन‌् आता या साऱ्या रांगा पोहोचल्यात आपल्या दरबाराच्या प्रवेशद्वारापर्यंत.’ लांबलचक रांगांचं वर्णन करून नारद दमले असले तरी हे सर्व ऐकून दरबाराचा श्वास अडकला. ‘मुनी तत्काळ निघा. या रांगांचा जनक कोण, याचा तत्काळ शोध घ्या.’ - इंद्रांनी फर्मावताच नारदांनी ‘विनामास्क’ दंड नको म्हणून अगोदर वीणा बाजूला ठेवली, ‘मास्क’ तोंडाला लावला, मगच ते पोहोचले पंढरीच्या चंद्रभागातीरी. राजकीय नेते आपापल्या आलिशान गाडीत फिरत होते. ‘मैंने नगद बेचा’वाल्या दुकानदारासारखं रुबाबात; मात्र हॉस्पिटलसमोरच्या रांगेतल्या लोकांची अवस्था ‘मैंने उधार बेचा’वाल्या दुकानदारासारखी केविलवाणी. अस्वस्थ मुनी पुण्यात पोहोचले. पेठेतल्या पाटीवर चक्क लिहिलेलं, ‘कृपया कोणीही आम्हाला तिसऱ्या लाटेची भीती दाखवू नये. लॉकडाऊनच्या सुट्टीत आम्ही बीचवर जाऊन असंख्य लाटा झेलून आलोत.’ एवढा उत्तुंग आत्मविश्वास पाहून तोंडावर अजून एक मास्क चढवत मुनी समोरच्या पोलीस ठाण्यात गेले. लगेच दोन कॉन्स्टेबल एकमेकांशी कुजबुजले, ‘नवीन ड्रेसमध्ये आपले सीपीसाहेब तर नाहीत ना हे? ’ ‘एवढी विचित्र परिस्थिती असूनही पुण्यात टोटल लॉकडाऊन का नाही?’-  मुनींच्या या प्रश्नावर समोरचा म्हणाला, ‘तो डिसिजन आमचे सीएम बारामतीतून घेतील.’ गोंधळून मुनींनी पुन्हा विचारलं, ‘पण सीएम तर मुंबईतच ऑनलाईन असतात ना..’ - तेव्हा दुसरा गालातल्या गालात हसून म्हणाला, ‘पुण्याचे सीएम फक्त एकच, आमचे अजितदादा.’   घाम पुसत मुनी मुंबईत पोहोचले. तिथं लसीकरणाच्या रांगेत एक गर्भवती तरुणी उभी. मुनींनी तिला सल्ला दिला, ‘या काळात लस घेऊ नये.’ तेव्हा ती शांतपणे उत्तरली, ‘मी माझ्यासाठी नव्हे तर पोटातल्या बाळासाठी आलेय. आत्ताच त्याची नोंदणी करून ठेवली तरच मोठेपणी लस मिळेल ना त्याला’. तेवढ्यात मागून खोकलल्याचा आवाज. एक वयोवृद्ध आजोबा वाकलेल्या अवस्थेत रांगेत उभे. मुनींनी काही विचारण्याच्या अगोदर त्यांनीच सांगितलं, ‘मी तरुणपणीच बुकिंग करून ठेवलं होतं, आज मिळेल बहुधा.’ पुढं याच गर्दीत जाकीटवाले ‘संजयराव’ भेटले, ‘जी चूक ट्रम्पनी केली तीच बायडेनही करताहेत. याविरोधात सर्वांना एकत्र आणण्यासाठी मी पुतीन अन‌् जिनपिंगनाही भेटणार’. - मुनींच्या कपाळावरच्या आठ्या ओळखून शेजारचा शिवसैनिक कुजबुजला, ‘तुम्ही टेन्शन घिऊ नगा. राैतांना अशी सवयच हाय. त्ये कुणावरबी कवाबी बोलू शकत्यात.’  चौकातल्या एका ‘घड्याळ’वाल्या कार्यकर्त्याला विचारलं, थोरले काका कुठं भेटतील?- तेव्हा तो लगेच हातातल्या मोबाईलवर ट्विटर ओपन करून आव्हाडभाऊंचं अकाउंट हुडकू लागला. ‘आमचे साहेब कधी कुठं नेमकं काय करत असतात, हे बारीक-सारीक केवळ जितेंद्ररावांच्या ट्विटरवरून समजतं.. पण आज नवीन काही दिसेना..’ तेव्हा गालातल्या गालात हसत मुनी म्हणाले, ‘मग सुप्रियाताईंचा गाडीतून लाईव्ह वगैरे सुरू आहे का बघा...’  मंत्रालयाजवळचा एक पेंटर ॲडव्हान्समध्ये नवीन बोर्ड तयार करून ठेवत होता, ‘मराठी-गुजराती भाई भाई..’ त्याला विचारताच त्यानं हातातल्या पेपरची हेडलाईन दाखवली, ‘पीएमकडून कौतुक. सीएमकडून आभार..’ बाजूलाच कोपऱ्यात देवेंद्र नागपूरकर टेन्शनमध्ये येऊन दादा बारामतीकरांना विचारत होते, ‘दादाऽऽ माझं भविष्यातलं सीएमपद जाईल की काय..’ तेव्हा त्यांच्यापेक्षाही अधिक गंभीर होऊन दादांनी प्रतिप्रश्न केला, ‘तुमचं पद तर किमान भावी. पण माझं आजी डीसीएम पद तर टिकेल का नाही कोण जाणे...’   दरम्यान, लांब पलीकडं ‘हात’वाले ‘पटोले’ मोबाईलवरून थेट दिल्लीला गुप्त रिपोर्ट देत होते, ‘मॅडम, यहां की तीनों पार्टी अंदर से मिलीजुली है. अपने को भौत अलर्ट रहना पडेगा.’ नारायणऽऽ नारायण ऽऽ

लेखक हे सोलापूर 'लोकमत' आवृत्ती चे निवासी संपादक आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस