शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

सेल्फीद्वारे मृत्यूमध्ये भारत आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 03:02 IST

आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. एकविसाव्या शतकात संगणक व मोबाइल क्रांतीने जीवन पद्धतीचे सर्व संदर्भ बदलले आहेत.

- डॉ. दीपक शिकारपूर आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. एकविसाव्या शतकात संगणक व मोबाइल क्रांतीने जीवन पद्धतीचे सर्व संदर्भ बदलले आहेत. प्रत्येक वस्तू, उपकरण हे ‘स्मार्ट’ असणे आज चैन नसून गरज होत चालली आहे़ सध्या नव्या पिढीच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे आणि या फोनवर चांगले फोटो काढणे सोपे असल्याने स्मार्ट तरुणांना पदोपदी फोटो काढण्याचे वेड जडलेले आहे. स्मार्टफोनमध्ये असलेल्या सेल्फीच्या सोयीमुळे स्वत:चाच फोटो काढणे सोयीचे झाले आहे. हा अतिरेक काही जणांच्या बाबतीत व्यसानकडे झुकू लागला आहे. संगणक व इतर उपकरणे आपले जीवन सुसह्य करण्यासाठी निर्माण केली आहेत. पण दुर्दैवाने अनेक त्याच्या अधीन झाले आहेत. सेल्फीचे भूत आजकाल प्रत्येकाच्याच डोक्यावर चढलेले आहे. स्मार्टफोन मिळताच जो तो सेल्फी काढत फिरत आहे. सेल्फीचा अतिरेक हा मूर्खपणा नक्कीच आहे़ हा मानसिक आजारपण असू शकतो़अनेक तरुण (मुले /मुली) अगदी कपडे बदलले की त्या बदलाची सेल्फी काढतात. क्षणोक्षणी सेल्फी काढण्याचे प्रकार नित्य आढळत आहेत. त्यांच्या हातात फोन आहे आणि सेल्फी त्यांची त्यांनाच काढायची आह़े़ त्यामुळे त्यांना ती काढण्यास कोणी अटकाव करू शकत नाही. परंतु त्यासाठीसुद्धा काही तारतम्य पाळले पाहिजे की नाही? आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्यात काय अर्थ आहे?सध्या लहान मुले, अबालवृद्ध आणि समस्त युवा वर्गाला पर्यटनस्थळी गेल्यावर तेथील ठिकाणाची छबी, दृश्य टिपण्याची नवी क्रेझ रूढ झाली आहे. आपापल्या मोबाइलद्वारे (सेल्फी) काढण्याची क्रेझ रूढ झाली आहे. फाजील आत्मविश्वास, अतिउत्साह, स्टंटगिरी करत अनेक जण अत्यंत धोकादायक ठिकाणी जाऊन मोबाइलद्वारे सेल्फी काढतात. गड, किल्ले, उंच डोंगर, सुळके, खोल दर्या, धबधबे, कडेकपारी, गुहा, वेगवान जलप्रवाह, खोल जलाशये अशा विविध ठिकाणी पर्यटनाला गेल्यावर तेथील परिसरातील धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याची क्रेझ केवळ युवकांमध्येच नाही, तर सर्वांमध्ये वाढल्याचे वास्तव आहे. धोकादायक ठिकाणाच्या सेल्फीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका मुलाने सापाबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला़ हत्तीबरोबर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एक तरुण हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला. सेल्फी म्हणजे असे काय आहे की ज्याच्यासाठी आपल्या प्राणाचीही पर्वा करू नये? ती प्राणाच्या पलीकडे आहे का? दुर्दैवाने आपला देश ह्या प्रकारच्या सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये आघाडीवर आहे़ कमी वयात हातात येणारा पैसा. त्याच्या विनियोगाकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष यासाठी कारणीभूत आहे. शाळा, महाविद्यालये इथेही संगणक, स्मार्टफोनचे दुष्परिणाम यावर प्रबोधन होणे बंधनकारक व्हावे. नागरिक शास्त्र विषयात याचा समावेश व्हायची हीच वेळ आहे.कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते. मोबाइल तंत्रज्ञानाचेपण असेच आहे. गरज असेल तरच ते वापरा. वेळ जात नसेल तर मैदानी खेळ, कला, बाह्यक्रिया, योगा, फिरणे, संगीत असे अनेक पर्याय आहेत. मोबाइल न वापरायची सवयपण झाली पाहिजे. माझा एक मित्र रविवारी मोबाइल, नेट अजिबात वापरत नाही. स्वत:वर बंधन व शिस्त या बाबतीतही आवश्यक आहे. माफक प्रमाणात हवे तेव्हाच जर आपण हे तंत्रज्ञान वापरले तर त्याचे अनेक फायदेही आहेत़(संगणक साक्षरता प्रसारक)