शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

त्यापेक्षा शासकीय गुंडच पाळले तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:05 IST

राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा विषय तसा जुनाच आहे. साम, दाम, दंड, भेद या चतु:सूत्रीशिवाय आजचे राजकारण हलत नाही आणि चालतही नाही.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा विषय तसा जुनाच आहे. साम, दाम, दंड, भेद या चतु:सूत्रीशिवाय आजचे राजकारण हलत नाही आणि चालतही नाही. यातील ‘दंड’ हा तर काही राजकीय नेत्यांचा आवडता ‘मंत्र’ असतो. मग अशी दंडेलशाही करण्यासाठी त्या नेत्यांनी आपल्या पदरी गुंड बाळगणे हे ओघानेच आले. आम्ही बापडे मात्र त्याचा विनाकारण बाऊ करतो.आता हेच बघा ना...! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका विद्यमान मंत्र्यावर गंभीर आरोप केला. या मंत्र्याने म्हणे यवतमाळातील गुंडांच्या कुख्यात टोळीला आश्रय दिला, आणि हे गुंड राजरोसपणे लोकांचा छळ करतात. आता यवतमाळच्या गुंडांना आश्रय देणारा मंत्री हा यवतमाळचाच असला पाहिजे असा समज सर्वसामान्य नागरिकांनी करून घेतला यात त्यांचे काही चुकले का? नाहीतरी एका मंत्र्याच्या कार्यक्षेत्रात दुसरा मंत्री उगाच लुडबुड करणार नाही...! पण विखे साहेबांनी या मंत्र्याचे नाव लीक केले नसल्यामुळे सरकारदफ्तरी मात्र तो मंत्री यवतमाळचाच आहे याची नोंद झाली नाही. असे असले तरी हा आरोप प्रत्यक्ष विरोधी पक्ष नेत्याने केल्यामुळे आणि प्रकरण विदर्भाशी संबधित असल्यामुळे सीएमसाहेब फार अस्वस्थ झाले. अधिवेशन संपल्यावर त्यांनी सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलाविली. सुरुवातीलाच भूमिका विशद करताना सीएम म्हणाले, निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशास्थितीत आपल्या मंत्र्यांवर असल्याप्रकारचे आरोप होता कामा नयेत. आपण सर्वांनी यापासून दूर राहिले पाहिजे. त्यांना आणखी बरेच काही सांगायचे होते पण, एक मंत्री मध्येच उठून म्हणाले, साहेब कसे दूर राहणार...? लोक आमचं ऐकत नाहीत. काम करू देत नाही. मग गुंडांना हाताशी धरण्याशिवाय पर्याय राहत नाही.दुसरा मंत्री : हे म्हणतात, ते खरं आहे. आज मंत्री त्याच्याच मतदारसंघात निर्भयपणे फिरू शकत नाही. त्याला सोबत दोन, चार गुंड बाळगावेच लागतात.आणखी एक मंत्री : सर...! राजकारणात भ्रष्टाचार बोकाळल्याची ओरड होते. तो संपविण्याच्या घोषणाही होतात. पण संपला का भ्रष्टाचार? नाही संपला...आणि संपणारही नाही. आता तर अनेक विद्वान म्हणतात, ‘मर्यादित भ्रष्टाचार’ कायदेशीर केला पाहिजे म्हणून. राजकारणातील गुन्हेगारीचेही तेच.येथेही मर्यादित गुन्हेगारी कायदेशीर करता येईल.सेनेचा मंत्री : एकदम करेक्ट. मंत्री झाल्यावर सरकार त्याला ओएसडी देते, पीए देते, चार सहा सुरक्षा जवान देते. सोबतच चार गुंडही पुरविले तर...! सरकारी खजिन्यावर थोडा भार पडेल. पण ते कायदेशीर मार्गाने होईल.भाजपा मंत्री : (उपहासाने) तुम्हाला कशाला हवेत हो गुंड...!सेना मंत्री : (रोख ओळखून) तुम्हाला नेमके म्हणायचे काय आहे ?वातावरण तापत असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली.मुख्यमंत्री : हे बघा...! शासकीय गुंड पाळण्याची भाषा आपल्याला करता येणार नाही. मंत्रिमंडळ विस्तारासाठी यादी घेऊन मी दिल्लीला जातोच आहे. दरम्यान विखेंना खासगीत ‘त्या’ मंत्र्यांचे नाव विचारून त्याला डच्चू कसा देता येईल ते बघतो. मग सर्वजण ‘तो मी नव्हेच’ म्हणत बाहेर पडले.- दिलीप तिखिले