शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

शिक्षकच भ्रष्ट असतील, तर देश आतून पोखरला जाणारच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 12:55 IST

कुलगुरू, प्राचार्य अशा सर्वोच्च पदावर पोहोचलेले शिक्षकच भ्रष्ट असतील तर या देशाचा सीमेवर पराभव करण्यासाठी शत्रुराष्ट्राची गरजच नाही!

डाॅ. सुनील कुटे,अधिष्ठाता क. का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक

सुरुवातीलाच हे नमूद करतो की, या देशात व्यवसायावर प्रेम आणि निष्ठा असलेले ज्ञानी व व्यासंगी शिक्षक, तसेच चांगली ध्येये व उद्दिष्टे समोर ठेवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्था आहेत. मात्र,  देशातील त्यांची संख्या सातत्याने कमी होत असल्याची खंत व्यक्त करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा ‘राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (नॅक)च्या अध्यक्षांनी तेथे सुरू असलेल्या गैरप्रकारांबद्दल प्रथम नाराजी व्यक्त करणे व नंतर राजीनामा देणे याची दखल घेण्याची गरजच नव्हती. या राजीनाम्यामुळे शिक्षण क्षेत्रातले  गैरप्रकार व भ्रष्टाचारावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे. या  भ्रष्टाचारात शिक्षक सामील आहेत हेही उघड झाले आहे.

नॅकच्या तपासणीच्या अनेक सुरस कथा कानावर येत असतात. कधी समिती सदस्य  महाविद्यालयाच्या पोर्चमध्ये गाडीतून खाली उतरत असताना हस्तांदोलनाच्या निमित्ताने त्यांच्या बोटात सोन्याच्या अंगठ्या घातल्याचे ऐकू येते,  समिती सदस्यांच्या ‘विशेष’ आवडी-निवडी जोपासणे नेहमीचेच! समितीसाठी पंचतारांकित सोयी-सुविधांचा वर्षाव, त्यांचे पर्यटन, त्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तू या साऱ्याचे  समर्थन, हे पाहाता ‘गुणवत्ता’, ‘मूल्यांकन’ व ‘मान्यता’ या शब्दांतील पोकळपणा ध्यानात येतो. 

बरे, या समितीत कोण असतात? तर उच्चपदस्थ शिक्षणतज्ज्ञ. म्हणजे कोण? कुलगुरू व प्राचार्य हे सर्वोच्च पदावर पोहोचलेले शिक्षक. हे शिक्षकच जर अशा भ्रष्ट आचारात अडकले तर त्यांच्या हाताखालच्या शिक्षकांना ते काय नैतिकता शिकवणार? वरपासून सुरू होणारी ही साखळी उच्चशिक्षण ते प्राथमिक शिक्षण अशा विविध टप्प्यांवर अनैतिकतेचे मार्ग अनुसरत संपूर्ण व्यवस्थाच बरबटून टाकते. 

मागच्याच आठवड्यात बारावीचे पेपर शिक्षकांनीच फोडले. त्याआधी शिक्षकभरती घोटाळ्यात, टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ७८७४ शिक्षकांनी २३५ कोटी रुपये वरिष्ठांना चारले. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये साड्या, भांडी व पैसे वाटप करणारेही शिक्षकच.  प्रमोशन मिळविण्यासाठी पैसे देऊन तद्दन फालतू जर्नल्समधून शोधनिबंध छापून आणणारे ‘आंतरराष्ट्रीय संशोधक’ हे पुन्हा आपलेच शिक्षक. चार ओळी धड न लिहिता-बोलता येणारे पीएच.डी.चे मार्गदर्शकही पुन्हा ‘असेच’ शिक्षक. मुलाखतींच्या पॅनलवर, चौकशी समित्यांवर, नॅकसारख्या विविध संस्था व मंडळांवर वर्णी ‘लावून’ घेणारा ‘उद्योगी’ शिक्षकवर्ग उदयाला  आलेला आहे. लाख लाख पगार घेऊन  दिवसाला दहा पानेही न वाचणारे, मात्र ‘ज्ञानवंत’, ‘गुणवंत’ असे विविध पुरस्कार पटकविण्यात माहीर असणारे पुन्हा आपलेच शिक्षक आणि या सर्व बाबींना ‘बहुमताचे’ स्वरूप यावे म्हणून खरोखर आदर्श असलेल्या, ज्ञानी व व्यासंगी असलेल्या, निष्ठेने काम करणाऱ्या शिक्षकांना कट, कपट, कारस्थान व हलके राजकारण करून ‘अल्पमतात’ आणण्यात दिवसभर वेळ घालवणारे, चांगल्या शिक्षकांच्या बदनामीत गुंतलेले हजारो शिक्षकच. नोकरीला लागताना पैसे देणारे शिक्षकच. प्रमोशनसाठी पैसे देणारे शिक्षकच. आणि या साऱ्यांचे समर्थन करताना व्यवस्था, संस्था, संस्थाचालक यांच्यापुढे आम्ही कसे मजबूर आहोत हे सांगणारेही शिक्षकच.

या देशातील शिक्षकच जर असे भ्रष्ट बनले, तर शत्रूराष्ट्राला या देशाचा सीमेवर पराभव करण्याची  गरजच नाही. इथल्या तरुण विद्यार्थ्यांच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करून ते काम आतल्या आतच पार पाडले जाईल. व्यवस्थाच अशी आहे, राजकारण्यांनीच देशाचे वाटोळे केले, संस्थाचालकच धड नाहीत, समाजच बिघडला आहे, हे फक्त शिक्षकांचेच काम आहे का, शिक्षक हादेखील समाजाचा एक घटक आहे, यासारखे दावे करून शिक्षकांच्या भ्रष्ट आचरणाचे समर्थन होऊ शकणार नाही. हा व्यवसाय देशातील इतर सर्व व्यवसाय व धंद्यांपेक्षा वेगळा आहे, या व्यवसायासाठी लागणाऱ्या क्षमता, अर्हता, गुण, ध्येय, निष्ठा, ज्ञान व व्यासंग हे इतर व्यवसायांपेक्षा वेगळे आहेत. ते कागदावरचे निकष व नॅकसारखे अहवाल याच्या पलीकडचे आहेत. ते ऐकण्यासाठी ‘आतला आवाज आतून’ यावा लागतो. या देशातल्या आयआयटीला नॅकच्या तपासणीची गरज नाही, कारण तिथे आतला आवाज, स्वत:चा स्वत:शी असलेला प्रामाणिकपणा, उत्तरदायित्वाची व जबाबदारीची जाणीव याला सर्वोच्च महत्त्व देणारे शिक्षक आहेत. तेही याच देशात राहतात व याच समाजाचे घटक आहेत. 

व्यवस्थेला शरण जाण्याऐवजी व्यवस्था बदलणारे शिक्षक या देशाला हवे आहेत. अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याऐवजी नॅकमध्ये बदल घडविणे जास्त भूषणास्पद झाले असते. अर्थात ‘एक तो पत्थर तबियत से उछालो यारों’ हेही नसे थोडके म्हणा!sunil_kute@rediffmail.com