शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

मलाही म्हणावेसे वाटेल ‘गर्वसे कहो हम देशद्रोही है’!

By admin | Updated: February 19, 2016 03:03 IST

नव्वदच्या दशकात देशातील राजकारणात धर्मनिरपेक्ष आणि ढोंगी धर्मनिरपेक्ष अशी दुफळी निर्माण झाली होती. पण आताची दुफळी अधिक घातक म्हणजे राष्ट्रभक्त

राजदीप सरदेसाई - (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)

नव्वदच्या दशकात देशातील राजकारणात धर्मनिरपेक्ष आणि ढोंगी धर्मनिरपेक्ष अशी दुफळी निर्माण झाली होती. पण आताची दुफळी अधिक घातक म्हणजे राष्ट्रभक्त व राष्ट्रद्रोही अशी आहे. माझ्यावर पहिल्यांदाच सोशल मीडियातून राष्ट्रद्रोही असल्याचा आरोप झाला, तेव्हा मला माझी भूमिका मांडायला पुरेशी संधीदेखील दिली गेली नाही. मतप्रदर्शन केले म्हणून लगेच राष्ट्रभक्तीवर शंका घेणे तसे कुणालाच आवडत नसते. पण आता काही वर्षानंतर ज्या काही असभ्य घटना घडत आहेत त्या बघता ‘गर्वसे कहो हम देशद्रोही है’, असेच मला म्हणावेसे वाटते. ते का, हे जरा विस्ताराने बघू. घटनेच्या १९ व्या कलमात जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे त्याच्या व्यापक व्याख्येवर माझा विश्वास आहे. त्यात केवळ दोन उचित बंधने आहेत. हिंसा आणि द्वेष यांना प्रोत्साहित करणारी वक्तव्ये. घटनेत ज्याला द्वेष पसरविणारे वक्तव्य म्हटले आहे त्यावर चर्चा होऊ शकते. उदाहरणार्थ रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात दिली जाणारी ‘जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा’ ही घोषणा हिंदू राष्ट्राचे आवाहन करुन कायद्याचे उल्लंघन करीत दोन समुदायात तेढ निर्माण करीत होती की नाही? खलिस्तानवाद्यांची ‘राज करेगा खालसा’ ही घोषणा राष्ट्रद्रोही होती की नाही? बलवंत सिंग विरुध्द पंजाब राज्य प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना असे म्हटले होते की ‘दोन व्यक्तींनी एक दोनदा आकस्मिक घोषणा दिल्या तर त्याचा अर्थ घोषणा देणाऱ्या व्यक्तींचा उद्देश द्वेष पसरवणे किंवा भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ नुसार भारत सरकारच्या विरोधात असंतोष प्रदर्शित करणे असा होऊ शकत नाही’.होय, मी संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या समर्थनार्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दिलेल्या घोषणांनी अवस्थ झालो आहे. पण हे कृत्य म्हणजे राष्ट्रद्रोह होऊ शकतो का? पुरावा म्हणून सध्या जी अर्धवट ध्वनीचित्रफीत दाखवली जात आहे, तिच्यात काही विद्यार्थी (ते विद्यार्थी आहेत की नाही हे अजून पूर्णपणे माहीत नाही) भारत की बरबादी आणि अफझलचा मृत्यू हौतात्म्य असल्याची घोषणा देताना दिसतात. त्यातली भाषणे सरकारची निंदा करणारी होती पण ती त्या विद्यार्थ्यांना संभाव्य दहशतवादी किंवा काश्मीरच्या वेगळेपणाला सहानुभूती देणारे आहेत असे म्हणण्यासाठी पुरेसे आहेत का? ते जर हिंसेला प्रोत्साहन देत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. पण निव्वळ वैचारिक समर्थन दिले म्हणून त्यांना जिहादी म्हणणे किंवा त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप लावणे योग्य आहे का? त्याहून वाईट गोष्ट अशी की ज्या विद्यापीठाला अनेक प्रज्ञावंत लोकांची परंपरा आहे त्या विद्यापीठात समविचारी विद्यार्थी नाहीत म्हणून त्याला राष्ट्रद्रोही लोकांचा अड्डा म्हटले जात आहे. दुर्दैव असे की या वादाचे ध्रुवीकरण तीव्रतेने झाल्यामुळे विद्यापीठ आवारातील (फक्त भारतातील नव्हे तर जागतिक स्तरावरील सुद्धा) आणि काश्मीर खोऱ्यातील वादग्रस्त राजकारणाचा इतिहास समजून घेण्यात अपयश येत आहे. मी जिथे शिकलो त्या आॅक्सफर्ड विद्यापीठात १९९३ साली ‘हे सभागृह कुठल्याही अटीवर राजा आणि देश यांच्यासाठी युद्ध करणार नाही’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. विषयाच्या बाजूने प्रचंड बहुमत मिळाले आणि ब्रिटीश सरकार स्तंभित झाले. आॅक्सफर्डवर राष्ट्रद्रोही आणि कम्युनिस्ट लोकांचे ठिकाण अशी दूषणे लावली गेली. पण कुणावरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला नाही. १९६० साली अमेरिकेतील विद्यापीठात व्हिएतनाम युद्धविरोधात निदर्शने गाजली होती, पण एकावरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. जर अफझल गुरूला समर्थन देणे राष्ट्रद्रोह असेल तर जम्मू आणि काश्मीरातील भाजपा-पीडीपी सरकारचे निम्मे मंत्रिमंडळ दोषी धरले गेले पाहिजे. पीडीपीने तर अफझलच्या फाशीला न्यायदानाची विफलता म्हणत अफझलचा मृत देह त्याच्या परिवाराला देण्याची मागणी केली होती. जर काश्मिरी युवकाना अफझल बळी ठरवला गेला आहे असे वाटत असेल तर त्यांना कायदेशीररीत्या राजकीय चर्चेसाठी आवाहन केले पाहिजे. त्यांचा दृष्टीकोन उर्वरित राष्ट्राविषयी तिरस्करणीय आहे म्हणून त्यांना राष्ट्रद्रोही समजण्यात काय अर्थ आहे? असे असेल तर मग आजही ३० जानेवारीला संपूर्ण राष्ट्र महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहत असताना, नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या हिंदू महासभेला राष्ट्रविरोधी संघटना का म्हणू नये? गांधींच्या खुन्याला राष्ट्रभक्त म्हणणाऱ्या भाजपा खासदार साक्षी महाराज यांचे काय? गोडसेंचे समर्थन किंवा उदात्तीकरण राष्ट्रविरोधी का म्हटले जाऊ नये? की राष्ट्रभक्तीची व्याख्या सत्ताधाऱ्यांच्या सोयीचीे असली पाहिजे? हे सर्व पाहाता, मला ढोंगी राष्ट्रभक्त म्हणवून घेण्यापेक्षा राष्ट्रविरोधी म्हणवून घेणे अधिक रास्त वाटेल. मी अभिमानी हिंदू आहे. तरीही मला गोमांस भक्षण आवडते. मी पत्रकार असल्याचा मला अभिमान असल्याने असहाय्य महिला पत्रकारांवर भारत मातेचे नाव घेऊन हल्ला करणाऱ्यांशी मी दोन हात करीन. (डिसेंबर १९९२मध्येसुद्धा महिला पत्रकारांवर हल्ला झाला होता). मला भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि म्हणून मला जवानांच्या बलिदानाचा, त्यागाचा आदर आहे. सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना इतरांपेक्षा जास्त वेतन मिळाले पाहिजे असेही मला वाटते. मी समलिंगी लोकांच्या हक्कांचे समर्थन करतो आणि मृत्यूदंडाचा विरोध करतो. जातीय दंगलीत रक्त सांडायला नको असेही मला वाटते. आणि हो, सार्वजनिक ठिकाणी अस्वस्थ करणारे सत्य मांडणे मला आवडते, तरीही माझा भारतीय राज्यघटनेवर प्रचंड विश्वास आहे. एवढे असल्यावरही मी राष्ट्रद्रोही ठरत असेल तर तेही मला मान्य आहे. मी देशद्रोही या दूषणास कंटाळलो असलो तरी मी माझी समजूत मला आदर्शवत मुष्टीयोद्धा महम्मद अली यांच्या उदाहरणाने काढून घेईन. त्यांना एकदा श्वेतवर्णीयांच्या उपाहारगृहात प्रवेश नाकारण्यात आला असता निषेध म्हणून त्यांनी त्यांचे सुवर्णपदक नदीत फेकून दिले. त्यांचे कृत्य त्यावेळी राष्ट्रद्रोहाचे ठरवून त्यांची आॅलिम्पिक पदके काढून घेण्यात आली. काही वर्षानंतर १९९६ साली त्यांच्या हातून अ‍ॅटलांटा आॅलिम्पिक ज्योत चेतवण्यात आली. तो त्या महान खेळाडूची माफी मागण्याचा अमेरिकेचा मार्ग होता. ताजा कलम- मागील आठवड्यात दिल्ली जिमखाना साहित्य संमेलनात मी असे सुचवले होते की भाषण स्वातंत्र्यात स्वत:ची बाजू मांडण्याचा अधिकार सामील केला पाहिजे, तोदेखील हिंसेला प्रवृत्त करणार नाही या मर्यादे पर्यंत. पण एक निवृत्त लष्करी अधिकारी माझ्यावर चिडले आणि ओरडले, ‘तुम्ही राष्ट्रद्रोही आहात, तुम्हाला इथेच ठेचले गेले पाहिजे’. जर जिमखाना क्लबसारख्या सभ्य वातावरणात सुद्धा इतक्या स्तराला जाऊन प्रतिक्रि या व्यक्त केली जात असेल तर ती साऱ्यांसाठीच एक चिंतेची बाब आहे.