- डॉ.डी.वाय.पाटीलडॉ. आंबेडकर. १९५२ साली कोल्हापुरातील राजाराम कॉलेजातील कार्यक्रमात मला त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. त्यानंतर माझ्या आजोळच्या आजीचे सख्खे भाऊ दत्तोबा दळवी (आर्टिस्ट) व डॉ. बाबासाहेब यांच्यासोबत कॉलेजपासून बुधवार पेठेपर्यंत टांग्यातून आलो़ त्या दिवसाचे जेवण दत्तोबा दळवी यांच्या घरीच झाले. संध्याकाळी स्टेशनवर सोडण्यासाठी टांग्यातूनच जाण्याचे भाग्य लाभले. डॉ. बाबासाहेबांनी समाजाच्या सुधारणा-परिवर्तनाचे तत्त्वज्ञान शिकविले. भौतिक विकास हा व्यक्तीच्या प्रगतीशी निगडित असतो. स्वातंत्र्यासाठी देशात चळवळी सुरू असताना या महामानवास स्वातंत्र्याची एक वेगळीच संकल्पना घेऊन झगडावे लागत होते. ती म्हणजे मानवतेची संकल्पना होय! त्यामुळेच ते गौतम बुद्धांनी दिलेल्या तेजस्वी विचारांकडे आकर्षित होताना दिसून येतात. व्यक्तीकडून राष्ट्राच्या उन्नतीपर्यंत असणाऱ्या समस्यांचे निवारण करणारे उपाय कोणते आहेत याची प्रभावी जाण डॉ. बाबासाहेबांना होती. ते म्हणतात, ‘समाजाच्या जाती-जमातीत, गटातटात, वर्गावर्गात जो दुरावा आहे तो लोकशाहीच्या यशाला मारक ठरेल. कारण, लोकशाहीत प्रत्येकाला मग तो पीडित असो वा हक्क भोगणाऱ्या वर्गातील असो, प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे. जे सत्ता, सवलती, हक्क भोगतात ते जर वंचित, दलित समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावयास तयार नसतील तर ‘आहे रे व नाही रे’ या दोन वर्गातील तणाव वाढत जाईल. लोकशाही उद्ध्वस्त होईल. सर्व माणसे जन्मत: समानच आहेत. लोकोपयोगाच्या दृष्टीने त्यांच्या दर्जात फरक पडू शकेलही. पण एरवी त्यांचा समान दर्जा कायम राहिला पाहिजे’. डॉ. आंबेडकर यांना धर्मापेक्षाही माणुसकी अधिक महत्त्वाची वाटत होती. वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना लोकशाहीची फळे चाखायला मिळाली पाहिजेत हेच त्यांना अपेक्षित होते. स्वातंत्र्यासाठी देशात चळवळी सुरू असताना या महामानवास स्वातंत्र्याची एक वेगळीच संकल्पना घेऊन झगडावे लागत होते. ती म्हणजे मानवतेची संकल्पना होय! त्यांना धर्मापेक्षाही माणुसकी अधिक महत्त्वाची वाटत होती. वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना लोकशाहीची फळे चाखायला मिळाली पाहिजेत हेच त्यांना अपेक्षित होते.
धर्मापेक्षाही माणुसकी महत्त्वाची
By admin | Updated: April 14, 2016 02:45 IST