शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - मानव यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:24 IST

भारतीय शास्त्रानुसार या जगात ८४ लाख योनी आहेत. या सर्व योनींमध्ये मानव योनीला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे व मानव सर्वश्रेष्ठ असण्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाने मानवाला बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीचा वापर करून मानव उचित व अनुचित निर्णय घेतो. उचित निर्णयामुळे त्याला सुख व शांती मिळते तर अनुचित निर्णयामुळे त्याला अनेक दु:खांना सामोरे जावे लागते.

डॉ. भूषणकुमार उपाध्यायभारतीय शास्त्रानुसार या जगात ८४ लाख योनी आहेत. या सर्व योनींमध्ये मानव योनीला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे व मानव सर्वश्रेष्ठ असण्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाने मानवाला बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीचा वापर करून मानव उचित व अनुचित निर्णय घेतो. उचित निर्णयामुळे त्याला सुख व शांती मिळते तर अनुचित निर्णयामुळे त्याला अनेक दु:खांना सामोरे जावे लागते.या बुद्धीमुळेच मानवाने आदिकाळापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्राचा शोध लावून ते तयार करण्याचे काम तो करीत आहे. या यंत्राचा शोध घेण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे त्याचे जीवन सुखद व्हावे तसेच त्याच्यामध्ये विद्यमान असलेल्या अनंत भावनांना व्यक्त करण्यासाठी पुरेसा वेळ त्याला मिळावा.मानव एक असा जीव आहे, ज्याच्यामध्ये अमर्याद शक्ती सामावलेल्या आहेत. काही शक्ती अशा आहेत, ज्या त्याला बाह्य जगाचा स्वामी बनवतात तर काही अशा ज्या त्याला महामानव बनवून दिव्यत्वाकडे घेऊन जातात.बाह्य जगातील अशा शक्ती आहेत, ज्या मानवाला एका ठराविक मर्यादेनंतर बेचैन व असमाधानी करतात.नृत्य, संगीत-कला व अध्यात्म या आपल्या अंतर्गत शक्तीच्या अभिव्यक्ती आहेत. जेव्हा या शक्ती अभिव्यक्त होतात, तेव्हा मानवाचे जीवन रस, सौंदर्य व परम चेतनेने ओतप्रोत भरले जाते. या शक्तीच्या प्रकट होण्याबरोबरच मानवाला एका परमानंदाची अनुभूती मिळते व मानव सर्व सीमांना तोडून या जगाचा नागरिक बनतो.जेव्हा यंत्र तयार झाले तेव्हा त्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे या यंत्राच्या साहाय्याने मानव कठिणातील कठीण काम लवकर करू शकेल व त्याला स्वत:च्या विकासासाठी जास्तीतजास्त वेळ मिळेल. जेणेकरून तो आपल्या अंतर्जगातील शक्तीला प्रकट करू शकेल.परंतु इतिहास असे सांगतो की, मानवाच्या जीवनात अगदी याच्या विपरीत घडलेले आहे. मानव यंत्राच्या उपयोगात व भौतिक साधनांच्या कमाईमध्ये एवढा गुंतला गेला की या अंत:शक्तीचा विकास पूर्णत: कमी झालेला आहे व आता त्या पूर्णत: खिन्न व आजारी आहेत आणि सध्या मानव तणाव व हिंसेच्या वातावरणात आपले जीवन जगत आहे.आता या गोष्टीची गरज आहे की मानवाने आपल्या जीवनातील थोडा वेळ काढून नृत्य करावे. हेच नृत्य त्याच्या जीवनात आनंदाची एक लहर निर्माण करेल. काव्य आणि साहित्याचे वाचन व सृजन या अंत:शक्तींना खुलवेल.अध्यात्मामुळे आपल्या मूळ स्वभावाची ओळख होऊन आपण अनंत चेतनेशी जोडले जाऊ व यामुळे मानव केवळ यंत्रमानव न राहता तो दिव्यत्वाकडे ओढला जाईल व परम चेतनेचा साक्षात्कार होऊन खºया अर्थाने ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना साकार होईल.