शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

हा ‘महाकवी’ असा दुराग्रही कसा?

By गजानन जानभोर | Updated: December 26, 2017 00:28 IST

‘देवदूत’कार सुधाकर गायधनी हे मराठी वाङ्मयातील ज्येष्ठ कवी. लोकांनी आपल्याला ‘महाकवी’ म्हणावे असा त्यांचा दुराग्रह असतो.

‘देवदूत’कार सुधाकर गायधनी हे मराठी वाङ्मयातील ज्येष्ठ कवी. लोकांनी आपल्याला ‘महाकवी’ म्हणावे असा त्यांचा दुराग्रह असतो. म्हटले नाही तर ते संतापतात आणि बरळतातही. प्रतिभावंतांमध्ये असे वैगुण्य असतेच आणि समाजही त्याकडे दुर्लक्ष करीत त्याच्या सर्जनशीलतेवर प्रेम करीत असतो. गायधनींचा चाहता वर्ग सर्वत्र आहे. त्यांच्या कवितेने भाषा आणि प्रदेशाच्या सीमा कधीच्याच ओलांडल्या. पण हा श्रेष्ठ कवी माणूस म्हणून ‘वैश्विक’ होऊ शकला नाही, वणी येथे होणाºया विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गायधनींची निवड झाल्याची वार्ता आली तेव्हा साºयांनाच आनंद झाला. त्यात त्यांचे चाहते जसे होते तसेच त्यांच्या तुसडेपणामुळे दुखावलेली माणसेही होती. मराठी कवितेला नवे भान देणाºया या ज्येष्ठ कवीच्या निवडीचे सर्वांनीच मनापासून स्वागत केले. पण, अचानक दुसºया दिवशी गायधनींचा मूळ स्वभाव उफाळून आला. त्यांचे हे रूप यापूर्वीही दिसले पण यावेळी ते जास्तच करपलेले वाटले.ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, ज्ञानेश वाकुडकर यांना संमेलनात बोलावू नका अशी थेट टोकाची भूमिका गायधनींनी घेतली. गायधनींच्या दृष्टीने वाघ आणि वाकुडकर हे सवंग आहेत. तशी गायधनींची ही ‘सवंग’ यादी त्यांच्या कवितेसारखीच दीर्घ आहे. त्यांच्यादृष्टीने तेच एकमेव कवी, बाकीचे तुच्छ. वाघ, वाकुडकरांना सवंग ठरविण्याचा अधिकार या गायधनींना दिला कुणी? साहित्य संमेलनाध्यक्ष असे कुणाला विरोध करीत नसतात. एखाद्याचे नाव सुचवू शकतात फार तर संबंधिताबद्दल प्रतिकूल मत व्यक्त करू शकतात. पण, त्यांच्या नावांवर आक्षेप घेत थेट राजीनामा देणे, एकूणच हा प्रकार किळसवाणा आहे. गायधनी हे विदर्भ साहित्य संघाचे कठोर विरोधक आहेत. ते स्वाभाविकही आहे. कारण वि.सा.संघाने नेहमीच कंपूशाहीचे राजकारण केले आहे. शेवाळकर-द्वादशीवारांनंतर या संघाची वाटचाल नीतीपेक्षा कूटनीतीच्याच मार्गाने होत आली आहे. संघाचे हे कुटील वर्तमान कायम असतानाही सुधाकर गायधनींना अध्यक्ष करावे असे मनोहर म्हैसाळकरांना वाटणे, ही गोष्ट त्यांच्या मनाचा मोठेपणा दर्शविणारी जशी आहे तसाच तो त्यांच्या प्रायश्चित्ताचाही भाग आहे. म्हैसाळकर आता थकलेले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी अशी माणसे कमालीची हळवी होतात. आयुष्यात अनवधानाने झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त शोधण्याचाही ते प्रयत्न करतात. कदाचित याच भावनेतून म्हैसाळकरांनी गायधनींची अध्यक्षपदी निवड केली असावी!गायधनी स्वत: काही वर्षांपूर्वी हृदयरोगाच्या मोठ्या शस्त्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. ‘मी मृत्यूचे दार ठोठावून परत आलो आहे’ असे सांगताना हेच गायधनी अनेकदा भावनिक होतात. अशी पुनर्जन्म मिळालेली माणसे उत्तर आयुष्यात क्षमाशील होतात. त्यांच्या स्वभावात बदल झालेला जाणवतो. तो देखणा आणि प्रसन्न असतो. थोडक्यात काय तर नियतीने त्यांना पूर्वायुष्यातील चुकांचे प्रायश्चित्त घेण्याची संधी एकाच जन्मात दिलेली असते. म्हैसाळकरांनी ती स्वीकारली मात्र गायधनींनी कद्रुपणाने गमावली. यशवंतराव चव्हाण गायधनींच्या कवितेचे भक्त होते. त्यांच्या विजनवासात गायधनींच्याच ‘चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो...’ या कवितेने त्यांना साथ दिली. माणसाच्या आयुष्याचे सार चार शब्दांत सांगणारा हा श्रेष्ठ कवी मात्र आपल्याच शब्दकळांना असा कृतघ्न व्हावा? त्यांच्या प्राक्तनाचा हा शोकात्म भाग क्लेषदायक आहे.ँ्नंल्लंल्ल.्नंल्लुँङ्म१@’ङ्म‘ें३.ूङ्मे