शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हस्ताक्षर कसे असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:25 IST

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या एकोणिसाव्या दशकात लेखनक्रिया या प्रकरणात, हस्ताक्षर कसे असावे याचे सुंदर विवेचन केले आहे.

- डॉ. रामचंद्र देखणे समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या एकोणिसाव्या दशकात लेखनक्रिया या प्रकरणात, हस्ताक्षर कसे असावे याचे सुंदर विवेचन केले आहे.वाटोळे सरळे मोकळे।वोतले मसीचे काळे।कुळकुळीत वोळी चालिल्या ढाळे।मुक्तमाळा जैशा।। (दासबोध) काळीभोर मसी म्हणजे शाई करून अक्षर वाटोळे, सरळ व मोकळे लिहावे. एकसारख्या लिहिलेल्या ओळी जणू मोत्यांच्या माळा वाटाव्यात इतके हस्ताक्षर सुंदर असावे. सुधड, सरळ आणि ठसठशीत मोकळे अक्षर, काना, मात्रा वेलांट्यांच्या लेखनातील स्पष्टता, दोन ओळीतील पुरेसे अंतर, अक्षरांचे आणि ओळीतील अंतरांचे सर्वत्र सारखेपण, ओळीमधल्या आणि समासातल्या शोधांचा अभाव, कागद झडून गेल्यावर मजकुराला बाधा येऊ नये अशा दक्षतेने चारही बाजूंना सोडलेल्या कोऱ्या जागा या सर्वांचे सूक्ष्मतेने चिंतन करून समर्थांनी केवळ हस्ताक्षर आणि लेखनक्रिया या विषयी एक समास लिहिला आहे. शब्दांबरोबर अर्थ, अर्थाबरोबर भाव आणि भावाबरोबरच उच्चारांची शुद्धता येण्यासाठी लेखनक्रिया शुद्ध आणि स्वच्छ असायला हवी. आजही मातृभाषा मराठी असलेल्या आणि त्याच भाषेतून पदवी घेतलेल्या अनेकांना शुद्ध मराठी लिहिता येत नाही. मराठी भाषेसारखेच मराठी हस्ताक्षरही ठसठशीत, स्पष्ट आणि सुंदर असायला हवे. हस्ताक्षराचा आणि लेखनक्रियेचा काही संबंध नाही, असे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की हस्ताक्षर हाच अंतर्मनाचा आरसा आहे. असेही म्हणतात की, हस्ताक्षरावरून मन कळते, वळणदार अक्षर येण्यासाठी वळणदार मन असावे लागते. मनाला आणि अक्षरालाही संस्कारातूनच वळणदारपणा येत असतो. पूर्वीच्या काळी हस्ताक्षर सुधारण्यासाठी शाळेत गुरुजी खूप परिश्रम करून घेत असत. ज्ञानेश्वरीमध्येही माऊलींनी संदर्भ दिला आहे. ‘‘हे बहु असो पंडितु।धरोनि बाळकाचा हातु।वोळी लिही व्यक्तु। आपणची।।’’ (ज्ञानेश्वरी. १३-२०८) मुलाचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी पंतोजी म्हणजे शिक्षक मुलांचा हात धरून त्याच्याकडून सुंदर हस्ताक्षर लिहून घेत असत. पूर्वीच्या काळी हस्ताक्षर सुधारण्यासाठी बोरुने लिहिण्याची एक शुद्धलेखन पुस्तिका असायची. त्यात वरची ओळ छापलेली असायची आणि त्याप्रमाणे वळणदार पद्धतीने खालच्या ओळी या एकेका अक्षराला घटवून लिहिण्यासाठी जागा असायची. त्या पुस्तिकेच्या मागच्या पानावर म. गांधी काहीतरी लिहित आहेत, असे चित्र होते आणि त्या चित्राच्या खाली गांधीजींचे हस्ताक्षराविषयीचे विचार होते. त्यात त्यांनी लिहिले होते, शिक्षण, मन आणि हस्ताक्षर यांचा किती सुंदर समन्वय आहे, ते यावरून लक्षात येईल.