शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

संकटात धावून येणाऱ्यांसाठी कितीदा टाळ्या, थाळ्या वाजतात?

By किरण अग्रवाल | Updated: July 26, 2023 09:07 IST

अपघातसमयी मदतीस धावणारे असोत, की पूरपाण्यातून जीव वाचवणारे; सामान्य लोकांनी आणि यंत्रणांनीही त्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी!

किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

हल्ली माणुसकी दुरापास्त होत चालली आहे, असा नकारात्मक सूर सर्वत्र आळवला जाताना दिसतो. परंतु, जी काही थोड्याफार प्रमाणात माणुसकी शिल्लक आहे, तिला अधिक वाढविण्यासाठी व्यक्ती, संस्था व यंत्रणा म्हणून आपण काय प्रयत्न करतो, असा प्रश्न केला तर उत्तर सापडणे अवघड! विशेषत: अपघात व नैसर्गिक संकटांच्या प्रसंगी जे स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतीसाठी धावून येतात, अशांची कोणती वा कसलीच दखल घेतली जाणार नसेल, तर माणुसकी वाढीस कशी लागेल? 

प्रश्न अतिशय साधा आहे. परंतु,  सत्कार्य करणाऱ्यांची पाठ थोपटण्यात आपल्याकडून होणाऱ्या ‘कंजूस दुर्लक्षा”कडे लक्ष वेधणारा आहे.  संकटकाळी धावून येणाऱ्याबद्दल कौतुकाचे दोन शब्दही बोलले जाणार नसतील तर मुळात माणुसकीबद्दलच प्रश्न उपस्थित होतो! संवेदनाहीनपणा वाढीस लागलेल्या आजच्या काळात कळवळा वा करूणेचा प्रत्यय अपेक्षित असेल तर या साध्या गोष्टीकडे समाजाने व यंत्रणांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. 

सध्या पाणी-पावसाचे दिवस आहेत. जागोजागी नदी, नाल्यांना पूर आले असून, काही ठिकाणी लहान मुले नाल्याच्या पुरात वाहून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अशावेळी जिवाची बाजी लावत वाहून गेलेल्यांना शोधून काढणे हे खूप मुश्किलीचे असते. विहीर किंवा तलावातील संथ पाण्यात पोहणे वेगळे आणि पुराच्या पाण्यात पोहून मदतकार्य करणे वेगळे. सरावाचा, कौशल्याचा व धाडसाचाही अशावेळी कस लागतो. पट्टीचे पोहणारे ही जोखीम स्वीकारतात व वाहून गेलेल्यांना शोधून काढतात. पुरात अडकलेल्यांनाही सुखरूप बाहेर काढले जाते. अशा जीवरक्षकांसाठी कितीदा टाळ्या किंवा थाळ्या वाजतात?

अलीकडे रस्ता अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात मोठा अपघात होऊन २५ प्रवाशांना जीव गमवावा लागला. यात अपघातग्रस्त खासगी बस जळत असताना मदतीला न थांबता पुढे निघून जाणारे काही होते, अशी आपबिती सांगितली गेली. ते खरेच आहे. पण, घटनास्थळाजवळील पिंपळखुटा व सिंदखेड राजातील अनेक जणांनी मदतीसाठी धाव घेऊन आपल्याकडून शक्य ते सर्व काही केले.  नुकतीच सप्तशृंग गडाच्या मार्गावर एक बस सुमारे चारशे फूट दरीत घसरली. यात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला व २२ प्रवासी जखमी झाले. यावेळी तेथील नांदुरीचे गावकरी तातडीने मदतीस धावून गेले होते. अशी इतरही काही उदाहरणे देता येतील, की ज्यात माणुसकी धावून जाताना दिसली. परंतु, ही समयसुचकता दाखविणाऱ्या व मदत करणाऱ्यांची कुठे, काय दखल घेतली गेली? अलीकडेच नागपूर-भुसावळ मार्गावर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरनजीक पावसाच्या पाण्यात रेल्वे रुळाखालील गिट्टी वाहून गेल्याचे निदर्शनास आल्यावर स्थानिक ग्रामस्थांनी तेथून जाणाऱ्या एका पॅसेंजर गाडीला थांबविले. हे झाले नसते तर कदाचित मोठा अपघात घडला असता. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळल्यावर अनेक स्वयंसेवक धावून गेले होते. अशा साऱ्या घटनांमध्ये कर्तव्यदत्त जबाबदारीखेरीज स्वयंस्फूर्तीने मदतीसाठी धावून जाणाऱ्यांचीही कुठेतरी नोंद घेतली जावी, जेणेकरून चांगल्या कामासाठी पुढे येणाऱ्यांना बळ लाभेल. 

असे काही घडले की, फोटो काढण्यात किंवा व्हिडीओ शूट करण्यात धन्यता मानणारे अधिक असतात. पण,  अशाही स्थितीत माणुसकीधर्माला जागून मदतीला धावणारे काही जण पुढे येतात, ज्यांची दखल शासन-प्रशासनाकडून घेतली जाणे गरजेचे वाटते. अपवादात्मक प्रमाणात काही ठिकाणी ते होतेही. परंतु, इतरांवर ते परिणामकारक ठरेल अशी ती दखल असतेच असे नाही. आपत्ती निवारणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यात संबंधित यंत्रणांचे साहित्य आदी खर्चाचा मोठा समावेश असतो. पण, याखेरीज ऐनवेळी मदतीस धावणाऱ्यांचा गौरव, त्यांच्यासाठीही साहित्य व विमासारख्या बाबींची तरतूद केली गेली तर ते अधिक हिरीरीने मदतीस धावतील. माणुसकी धर्मावरील विश्वास वाढवण्यासही ते उपयोगी ठरेल!