शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

उलगुलान तरी कितीवेळ करावे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 13:09 IST

खान्देशातील १० तालुक्यांमधील आदिवासी बांधवांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत

मिलिंद कुलकर्णीखान्देशातील १० तालुक्यांमधील आदिवासी बांधवांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्याची सोडवणूक करण्याच्यादृष्टीने शासकीय पातळीवर योजनांचे मोठे आश्वासक चित्र निर्माण केले जाते, परंतु वस्तुस्थिती अतीशय भीषण असते. आदिवासींसाठी काम करणाऱ्या संघटना ‘उलगुलान’ मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा अनेकदा प्रयत्न करतात, परंतु, आश्वासनापलिकडे काहीही हाती पडत नाही.आठवडाभरात घडलेल्या दोन दुर्घटना आदिवासी बांधवांच्या जगण्यावर विदारक भाष्य करतात. पहिली घटना धुळे जिल्ह्यातील साक्री शहरातील आहे. आदिवासी विकास विभागातर्फे चालविण्यात येणाºया मुलींच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलगी प्रसूत झाली; भीतीपोटी तिने अर्भकाला वसतिगृहाच्या मागे फेकून दिले. हा प्रकार उघड झाल्यावर त्या अर्भकाला आणि अल्पवयीन मातेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.धक्कादायक असा हा प्रकार मुलींच्या वसतिगृहात घडतो, यावरुन आदिवासींसाठी असलेल्या व्यवस्था कशा आणि कोणत्या दर्जाच्या आहेत हे लक्षात येते. वसतिगृहातील मुलींची सुरक्षितता, आरोग्यविषयक तपासणी या सगळ्या बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना आहे. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहते आणि त्याचा वसतिगृहातील अधीक्षक, नियमित वैद्यकीय तपासणी करणारे अधिकारी, तपासणीच्या नावाखाली दौरे करणारे आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांना कळूदेखील नये, यावर विश्वास बसत नाही. याचा अर्थ ही वसतिगृहे, आश्रमशाळा यांचा कारभार हा वाºयावर सोडलेला आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उचलून धरल्यानंतर अल्पवयीन मुलगा, अधीक्षिका, शिपाई, मदतनीस यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. काहींना निलंबित करण्यात आले. हा उपचार झाला, परंतु, असे प्रकार घडू नये, यादृष्टीने उपाययोजना का होत नाही, हा प्रश्न कायम राहिला.दोन वर्षांपूर्वी विदर्भातील आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुक्ताईनगर तालुक्यातील ३०-३५ मुुलींना पालकांनी आश्रमशाळेतून काढून घेतले. नजिक कोठेही मुलींची आश्रमशाळा नसल्याने आणि नियमित शाळेत पाठविण्यासाठी प्रवासादरम्यान सुरक्षेची काळजी असल्याने या मुलींचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय झाले.समाजातील सर्व घटकांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे, प्रगती करावी असा शासनाचा उद्देश असला तरी अंमलबजावणी करणाºया यंत्रणा या पध्दतीने काम करीत असतील, तर कसा होणार या वंचित घटकांचा विकास?दुसरी घटनादेखील दुर्देवी आहे. महाराष्टÑ आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या उकाई धरणाच्या बँकवॉटरमध्ये बोट उलटून सहा जणांना जलसमाधी मिळाल्याची घटना धुलिवंदनाच्या दिवशी घडली. गेल्या वर्षी संक्रांतीला भूषा येथे अशीच दुर्घटना झाली होती. त्याची आठवण या दुर्घटनेने ताजी केली.नवी दिल्ली आणि मुंबईत वातानुकुलीत खोल्यांमध्ये बसून आदिवासी भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कागद रंगविणाºया मंडळींना प्रशिक्षण व परीविक्षाधीन कालावधीतील अल्पकाळातील आदिवासी भागातील रहिवास सोडला तर काहीही अनुभव नसतो. आदिवासींच्या व्यथा, वेदना माहित नसतात. विकासाच्या चुकीच्या परिभाषा राबवून आदिवासींना त्यांच्याच भूमितून विस्थापित केले जात असताना त्यांना दैनंदिन संसारोपयोगी जिन्नस आणण्यासाठी दीड -दोन किलोमीटर पायपीट किंवा बोटीतून धोकेदायक प्रवास केल्याशिवाय पर्याय नसतो. हा प्रवास केला नाही, तर घरात संध्याकाळी चूल पेटणार नाही हे माहित असल्याने जीव धोक्यात घातला जातो. जीवावर उदार होऊन जीपच्या टपावर बसलेली १५-२० माणसे, लाईफ जॅकेट हा शब्ददेखील न ऐकलेली आयुष्याची संध्याकाळ पाहणारी माणसे बॅकवॉटरमधून रोज ये-जा करताना पाहिली म्हणजे आकांक्षित जिल्हा, आदिवासींचा विकास या संकल्पनांवर विश्वास कसा ठेवावा?वर्षानुवर्षे जंगलांचे रक्षण करणाºया आदिवासी बांधवांना पोटापाण्यासाठी जंगल सोडून परराज्यातील बांधकामे, वीटभट्टी, साखर कारखान्यांवर मजूर म्हणून काम करावे लागते. वर्षातून सहा-आठ महिन्यांचे स्थलांतराचे दु:ख अश्वत्थाम्यासारखे त्यांच्या भाळी लिहिले कोणी हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. तरीही जंगलतोडीचा शिक्का त्यांच्याच माथी मारला जातो, यापेक्षा दैवदुर्विलास तो कोणता असेल?

टॅग्स :Jalgaonजळगाव