शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कोण किती पाण्यात?

By admin | Updated: October 4, 2014 01:05 IST

विधानसभेची निवडणूक एवढी गुंतागुंतीची होईल, असा कुणालाही अंदाज नव्हता. जागा वाटपावरून खेचाखेची होती.

विधानसभेची निवडणूक एवढी गुंतागुंतीची होईल, असा कुणालाही अंदाज नव्हता. जागा वाटपावरून खेचाखेची होती. पण नेतेमंडळी तुटेर्पयत ताणत नेतील, असे कुणाच्याही स्वप्नी नव्हते. पण ताणले आणि आज आपण पाहत आहोत, सर्वत्र पोळा फुटला आहे. कोणता पुढारी कोणत्या छावणीत आहे, हेच कळेनासे झाले आहे. भाजपावर टीका केल्याशिवाय ज्यांची सकाळ उजाडत नव्हती, त्यांच्या गळ्याला भगवे दुपट्टे गुदगुल्या करताना दिसू लागले. शेअर मार्केट वाढावे तसे तिकीट मागणा:यांचे भाव अचानक वधारले. 288 उमेदवार आणणार कुठून? चांगले चांगले राजकीय पक्ष उमेदवारांच्या शोधात भटकताना दिसले. अनेक कार्यकत्र्याना तर लॉटरी लागली. कुठल्या राजकीय पक्षाचा आता विटाळ राहिलेला नाही. संजय देवतळे हे विदर्भातले काँग्रेसचे एक मोठे प्रस्थ. चार वेळा  निवडणूक लढलेले, मंत्री राहिलेले. या वेळी काँग्रेसने चक्क त्यांचे तिकीट कापले, तेव्हा त्यांनी संतापाने भाजपाशी चटमंगनी-पटशादी करून तिकीटही आणले. याच जिल्ह्यातला राष्ट्रवादीचा एक पुढारी शिवसेनेत गेला आणि दुस:याच दिवशी परत आला. राज्यात अनेक जागी पुढा:यांनी असे ‘यू टर्न’ घेतले. काही जण तर सकाळी एका पक्षात होते तर दुपारी दुस:या पक्षात आणि रात्री तिस:याच पक्षात तरंगत होते. लोकशाहीची अशी ङिांग ब:याच काळानंतर लोक अनुभवत आहेत. नागपूरच्या देशमुख घराण्यात तर महाभारत पेटले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या पुतण्याने- आशिष रणजित देशमुख याने ललकारले आहे. आशिष यांनी सुनील केदार यांच्या विरोधात सावनेरमधून भाजपाकडे उमेदवारी मागितली होती. भाजपाने काटोलकडे बोट दाखवल्याने पुतण्याला काकावर धावून जाण्यावाचून पर्याय उरला नाही. काका-पुतण्याची ही लढाई देशमुखी राजकारण हादरवून सोडणार आहे. विदर्भातली आणखी एक व्हीआयपी फाईट म्हणजे यवतमाळ. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष  माणिकराव ठाकरे यांनी अखेर आपल्या मुलासाठी तिकीट आणलेच. त्यासाठी त्यांनी तिथल्या नंदिनी पारवेकर यांचे तिकीट कापले. सर्वत्रच अशी कापाकापी  झाली.  साम, दाम, दंड, भेद.. भाजपाने सारे मार्ग योजायचे ठरवलेले दिसले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेकांना डुबकी मारण्याची संधी देऊन ‘पवित्र’ करून घेण्याचा भाजपाने तर सपाटाच लावला. प्रेम आणि राजकारणात सारे क्षम्य असते असे मानले तरी हे अति झाले बरं का! 
युती तुटली, आघाडी फुटली, पण कुणीही रडायला तयार नाही. कुठेही सुतकी वातावरण नाही.  आनंदीआनंद आहे. भाजपा-शिवसेनेचा 25 वर्षाचा संसार  मोडला, काँग्रेस-राष्ट्रवादी 15 वर्षाच्या सत्तेच्या ताटावरून उठले. पण कुणाला काही हरवल्याची हुरहूर नाही. उलट सुटल्याचा मोकळेपणा आहे. मग खरेच युती किंवा आघाडी तुटली का? तुटली तर किती दिवसांसाठी? निवडणूक 11 दिवसांवर आली आहे. ही तोडफोड फक्त 11 दिवसांसाठी आहे का?  युती किंवा आघाडी तुटल्याचे खापर घटक पक्ष एकमेकांवर फोडत आहेत. ही चिखलफेक  लुटुपुटीची मानायची का? निकालानंतर राष्ट्रवादी  भाजपासोबत जाईल, अशी चर्चा आताच सुरू झाली आहे. दोन्हीही राजकीय पक्ष याचा ठाम इन्कार करीत आहेत. पण कुणालाही स्वबळावर बहुमत मिळाले नाही तर तशी युती होणार नाही, याची काय गॅरंटी?  राजकारणात काहीही होऊ शकते. कोण किती पाण्यात आहे, ते कळेल. युती आणि आघाडी मोडल्याचा आनंद त्यासाठीच आहे.   राष्ट्रवादीवाल्यांना आपल्या शक्तीचा काय जबर आत्मविश्वास आहे! निम्म्या म्हणजे 144 जागा  मागत होते. काँग्रेसवाले तेवढय़ाही द्यायला तयार नव्हते. भाजपावाल्यांचा रथ हवेत चालू लागला होता. गेल्या खेपेपेक्षा 5-25 जागा जास्त मागत होते. त्यालाही शिवसेनावाले तयार नव्हते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येकाला स्वबळाचा जणू शोध लागला होता. पण खरेच वास्तव काय? 1999 मध्ये राष्ट्रवादीने स्वबळावर लढून पाहिले, 6क् जागा मिळाल्या. त्यानंतर दोन्ही काँग्रेस मिळून लढत आल्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 21 टक्के मतं व 82 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादीला 16.37 टक्के मतं आणि 62 जागा मिळाल्या.    शिवसेनेला 16.26 टक्के मतं व 44 जागा मिळाल्या, तर भाजपा 14 टक्क्यावर थांबला. पण त्याला  शिवसेनेपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या. युती म्हणून  ही टक्केवारी 3क्.28 एवढी होते. राज ठाकरे यांच्या मनसेने 5.71 टक्के मतं खेचत 13 जागा जिंकल्या व युतीचा राजयोग हुकला. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या पारडय़ात 47.8 टक्के एवढी भरघोस मतं पडली. यात भाजपाला 28 टक्के मतं पडली, तर 2क्.82 टक्के मतं घेऊन शिवसेना दुस:या नंबरवर आहे. लोकसभेत काँग्रेस आघाडीला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले असले तरी, गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा तिची मतं फक्त 3 टक्क्याने घटली. काँग्रेसला 18.29 टक्के तर राष्ट्रवादीला 16.12 टक्के मतदान झाले आहे. चार महिन्यांपूर्वीचे मतदान पाहिले तर भाजपा काँग्रेसपेक्षा 9 टक्क्याने पुढे आहे आणि शिवसेना काँग्रेसपेक्षा 2 टक्क्याने पुढे आहे. 
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची समीकरणं वेगवेगळी असतात. त्यामुळे हेच चित्र आता असेल, असे मानायचे कारण नाही. सध्याच्या हवेत तर अजिबात नाही. सीन एकदम बदलला आहे.  युती-आघाडी नाही. पाच प्रमुख पक्ष स्वबळावर रणांगणात मांडी ठोकून उभे आहेत. तेवढेच बंडखोर आणि अपक्ष आहेत. हौसे, नवसे, गवसे मोजताना दमछाक होते. एकेका मतदारसंघात किमान 25 उमेदवारांची हाऊसफुल्ल गर्दी आहे. चौथ्या-पाचव्या क्रमांकाच्या उमेदवाराने ब:यापैकी मतं खाल्ली तर   निकालच बदलून जातो. स्वबळाच्या हौसेपायी  राजकीय पक्षांनी यंदाची निवडणूक कमालीची थरारक करून टाकली. या वेळचे विजयी मताधिक्य   काही छटाक राहील. ताकद चार जागी विभागली गेल्याने सशक्त उमेदवाराचेच या वेळी काही खरे आहे.  केवळ पार्टीचे बॅनर कामी येणार नाही. ग्राऊंड लेव्हलला ज्याचे काम आहे तो तरेल. मोदी लाट वगैरे अजिबात नाही. आधीही नव्हती. पण मोदींच्या नावाचे मार्केटिंग जोरात होते. कुठून आली कुणास ठाऊक, पण आर्थिक रसदही जोरात होती. मोदींनी  आपली निवडणूक गदागदा हलवली तसे या वेळी  दिसत नाही. सोशल मीडियाही गप्प आहे. अजून तरी थंडा मामला दिसतो. मतदानाला फक्त 15 दिवस उरले असताना लोक घराबाहेर निघालेले नाहीत. 15 दिवसांत करून करून किती उठापटक करणार?     भाजपावाले मोदींना खूप फिरवणार, अशी बातमी आहे. मोदी फिरले तर काँग्रेसवाल्यांकडे कोण आहे?  आणि आता मोदींचा तो चार महिन्यांपूर्वीचा करिश्मा राहिलेला नाही. ‘भाषण पे भाषण.. राशन नाही.’ लोक कंटाळले आहेत. शेतक:यांचे प्रश्न, शेतक:यांच्या आत्महत्या.. यांना मोदींनी अजिबात हात लावलेला नाही. कुठलाही पक्ष घ्या. त्यांच्याकडे बोलायला काय विषय आहे? युती किंवा आघाडी कुणी तोडली, याच्यात लोकांना रस नाही. मोदी आल्यानंतरही अच्छे दिन दिसत नाहीत म्हणून ते अस्वस्थ आहेत. आता ही निवडणूक कुण्या पक्षाच्या हाती राहिलेली नाही. ती जनतेच्या हाती गेली आहे.  
 
मोरेश्वर बडगे 
राजकीय वेिषक