शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नगरचा कलंक कसा पुसणार?

By admin | Updated: July 23, 2016 04:57 IST

नगर जिल्ह्यात अत्याचार वाढलेच, पण त्यापेक्षाही जातीचे राजकारण अधिक वाढले आहे.

नगर जिल्ह्यात अत्याचार वाढलेच, पण त्यापेक्षाही जातीचे राजकारण अधिक वाढले आहे. यातून जिल्हा बदनाम होतो आहे. ‘जात जातीला चिकटली’ हे नगरच्याच रामदास फुटाणेंनी लिहिले. नेत्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार करुन तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडल्यानंतर नगर जिल्हा राज्यात पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वी जिल्ह्यात सोनई, खर्डा व जवखेडे येथे दलित हत्त्याकांड झाले तेव्हाही राज्य असेच ढवळून निघाले होते. अर्थात जवखेड्याचे हत्त्याकांड हे जातीवादातून नव्हे तर कौटुंबिक कलहातून झाल्याचे नंतर समोर आले. या प्रत्येक घटनेनंतर जिल्ह्यात सवर्ण-दलित अशी तेढ निर्माण होत गेली व त्याचे पडसाद राज्यात उमटले हे या घटनांतील एक साम्य आहे. त्यामुळे ‘नगर जिल्ह्यातच वारंवार अत्त्याचाराची प्रकरणे का घडतात’, असा प्रश्न उपस्थित होतो. नगरला अत्त्याचाराची जी प्रकरणे समोर आली त्यात भयंकर अशी अमानुषता व विकृती दिसली हे वास्तव आहे. पण, केवळ नगरलाच अत्त्याचार घडतात, असे म्हणता येणार नाही. ही प्रकरणे इतर जिल्ह्यातही घडतात. उलट नगर हा जागरुक जिल्हा असल्याने ही प्रकरणे दडपली न जाता ती उघडकीस आली ही अन्यायग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी जमेची बाजू आहे. या घटना घडल्यानंतरची परिस्थिती हाताळण्यात स्थानिक राजकीय नेते कमी पडल्याने ही प्रकरणे चिघळली. घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नेत्यांनी तत्काळ पुढाकार घेणे अपेक्षित असते. मात्र, तसे घडले नाही. उदाहरणार्थ सोनई, खर्डा, जवखेडा येथे दलितांची हत्त्या झाल्यानंतर जिल्ह्यातील सगळेच मराठा नेते गांगरुन गेले. त्यांनी या प्रकरणांत निर्णायक भूमिका न बजावता अलिप्त राहणे पसंत केले. त्यामुळे रामदास आठवलेंसह इतर दलित नेते जिल्ह्यात आले व त्यातून आंदोलन पेटले. पुढे त्याला जातीय रंग आला. स्थानिक मराठा व दलित नेते अगोदरच अत्त्याचारग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी उभे राहिले असते तर असा रंग आला नसता. हेच कोपर्डीतही घडले. या प्रकरणातील पीडित मुलगी सवर्ण, तर आरोपी दलित. यावेळीही मराठा-दलित नेते एकत्र नाहीत. प्रत्येक पक्षाचा नेता कोपर्डीत स्वतंत्रपणे गेला. राजकारणात सेना-भाजपा-भीमशक्ती अशी युती होते. कॉंग्रेसलाही रिपाइं हवी असते. मग, अशा घटनांत ही युती का दिसत नाही? आठवले, प्रकाश आंबेडकर यांनी कोपर्डीत यायला उशीर केला. त्यामुळेही गैरसमज वाढले. जातीय प्रचारामुळेच २००९ मध्ये आठवले शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत झाले. तो विसंवाद आजही आहे. जिल्ह्याचे नेते राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड, यशवंतराव गडाख, राम शिंदे यांनीही ही सर्व प्रकरणे पुढाकार घेऊन हाताळली नाहीत. राज्यातील इतर नेतेही ‘गाव जले हनुमान बाहर’ या भूमिकेत आहेत. ओबीसी नेतेही या राजकारणात प्रचंड सावध दिसतात. घटनेनंतर राजकारण होते, बाहेरचे नेते येतात, आंदोलने होतात, पण पुढे काय? सोनई, खर्डा, जवखेडा प्रकरणांचे निकाल अद्यापही नाहीत. या घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याच्या निव्वळ घोषणा झाल्या. नगरच्या भूमीतून ज्ञानेश्वरांनी विश्व बंधुतेचे पसायदान मागितले. मात्र, त्याच जिल्ह्यात आज अत्त्याचार व जातीय विखार वाढतो आहे. याला राजकीय व्यवहार कारणीभूत आहे. समाजाला कठोरपणे सुनावण्यापेक्षा नेते मतांचा विचार करुन भूमिका ठरवतात. जिल्ह्याला डाव्या चळवळीची पार्श्वभूमी आहे. दत्ता देशमुख यांच्यासारख्या नेत्याचा पूर्वी दरारा होता. दादासाहेब रुपवते, बाबुराव भारस्कर हे दलित नेते जिल्ह्यात होते. त्यांना सर्व समाजात सन्मान होता. आताच्या राजकीय पिढीने दलित नेतृत्वच नेस्तनाबूत केले. कार्यकर्त्यांचे प्रबोधनही घडविले नाही. दुसरीकडे अवैध व्यवसाय खेडोपाडी बोकाळले. महिलांनाही संधी नाही. विधानसभेत प्रथमच दोन महिला पोहोचल्या. मात्र त्याही अशा घटनांत बोलत नाहीत. पुरोगामीपण म्हणायला उरले आहे. नगरच्या रामदास फुटाणे यांनी ‘जात जातीला चिकटली, असे म्हटले. तसेच घडते आहे. - सुधीर लंके