शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 10:38 IST

‘पार्टी विथ अ डिफरन्स’ नव्हे, ‘पार्टी विथ अ रिलेव्हन्स’! ‘कालसंगत’ पक्ष होण्याची गरज वाटणाऱ्या भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्लीशेवटी एकदाचे पोतडीतून मांजर बाहेर आले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात कुठेतरी काहीतरी गडबड असल्याची कुजबुज गेले काही महिने सत्तावर्तुळात सातत्याने चालू होती. आता ती थांबली आहे. भाजपचे शक्तिशाली सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष हे माध्यमांच्या प्रकाशझोतातून बाहेर गेले तेव्हापासून या चर्चेला सुरुवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेल्या संतोष यांना भाजपच्या संघटनात्मक बाबीत लक्ष घालण्यासाठी नेमलेले असल्याने पंतप्रधान मोदी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एखादा कार्यक्रम पक्षाच्या मुख्यालयात झाला तर संतोष यांना व्यासपीठावर आसन दिले जात असे. परंतु अलीकडे ते रहस्यमयरीत्या गायब झाल्याने परिवारात काहीतरी बिनसले आहे अशी चर्चा सुरू झाली. 

विशेषत: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे पानिपत झाल्यानंतर संतोष यांच्या म्हणण्याकडे पक्षाचे नेतृत्व पुरेसे लक्ष देत नसल्याचे बोलले जाऊ लागले. संघाचा पूर्णवेळ प्रचारक भाजपकडे लक्ष देण्यासाठी नेमलेला असताना त्याचे म्हणणे ऐकले जात नाही, याचे परिणाम होणारच होते.  भाजपला आता ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ होण्याऐवजी ‘पार्टी विथ अ रिलेव्हन्स’ - राष्ट्रीय पातळीवरील ‘कालसंगत’ पक्ष होण्याची गरज वाटू लागली आहे. त्याचे महत्त्वाचे कारण, पहिल्यांदाच भाजपची पदचिन्हे संपूर्ण भारतात दिसू लागली आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यापुढे पक्षाचा वैचारिक मार्गदर्शक राहील. परंतु रोजच्या कामकाजात लक्ष घालणार नाही. भूमिकेत झालेल्या या बदलावर अद्याप शिक्कामोर्तब मात्र व्हावयाचे आहे.

नव्या वर्गाची मनधरणी४ जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शेअर बाजार मोठी उसळी घेईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला हे नक्कीच आश्चर्यकारक होते. निवडणुका चालू असताना १९ मे रोजी एका  मुलाखतीत पंतप्रधानांनी हा विश्वास व्यक्त करणे हे जरा विचित्र होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी १३ मे रोजी हेच म्हटले होते. भाजप आणि त्याचे मित्रपक्ष ४०० पार होतील आणि बाजार वाढेल, असे शाह म्हणाले. चार जूनपूर्वी शेअर खरेदी करून नफा कमवा, असा सल्लाही त्यांनी दिला होता. 

सत्तावर्तुळातील या उभयतांचे निकटवर्तीय सांगतात की, ते कोणतीही गोष्ट विनाकारण करत नाहीत. अशा प्रकारची भविष्यवाणी करून भाजप एका अत्यंत महत्त्वाच्या वर्गाला दिलासा देत असल्याची चर्चा आहे. शेअर बाजारात सध्या ८ कोटींपेक्षा जास्त छोटे गुंतवणूकदार असून भाजप पुन्हा सत्तेवर न आल्यास आपल्या गुंतवणुकीचे काय होईल? याची काळजी त्यांना लागली आहे. 

 भारतीय अर्थव्यवस्था भरारी घेईल, असा विश्वास वाटून २०१५ नंतर हे छोटे गुंतवणूकदार बाजाराकडे वळले. बाजार पडत असल्याने सध्या ते सचिंत आहेत. भाजपच्या पक्षनेतृत्वाला त्यांना दिलासा देणे आवश्यक होते.  माध्यमांवर अहोरात्र लक्षदेशातील साधारणत: ९०० च्या घरात असलेल्या दूरचित्रवाणी वाहिन्या अहोरात्र कोणत्या बातम्या देतात आणि काय भाष्य करतात, यावर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बारीक लक्ष असते. या वाहिन्यांवर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. हिंदी, इंग्रजीबरोबरच सर्व प्रादेशिक भाषांत प्रसारित होणारी प्रत्येक बातमी आणि भाष्य या मंडळींच्या नजरेखालून जाते. तीन पाळ्यांमध्ये ही मंडळी काम करतात. माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या कार्यालयालाही नियमितपणे अहवाल जातो.

आधीच्या कारकिर्दीतही अशी व्यवस्था होती; पण ती फारशी प्रभावी नव्हती. आता सुमारे २४०० निरीक्षक टीव्हीच्या प्रसारणावर लक्ष ठेवून आहेत. नभोवाणी आणि वृत्तपत्रांमध्ये काय म्हटले जाते, याकडे लक्ष द्यायला स्वतंत्र व्यवस्था आहे. रोजच्या रोज ही सगळी कवायत होत असते. स्वाभाविकच सत्तारूढ बाजू अत्यंत जलद गतीने प्रतिसाद देते आणि गरज असेल तेथे धोरणातही बदल केला जातो.

शिवराजसिंह यांना वाढती मागणीमध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे भाजपचे नवे स्टार प्रचारक असून पक्षनेतृत्वाशी त्यांनी छान जुळवून घेतले आहे. त्यांना जिथे जिथे प्रचाराला पाठवले जाते तेथे तेथे ते केंद्रीय नेतृत्वावर प्रभाव टाकतात. शिवराजसिंह इतर मागासवर्गीय समाजातील असून या वर्गाला आकृष्ट करण्यासाठी भाजपला ते उपयोगी पडतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसरे मागणी असलेले प्रचारक असून त्यांनाही भारतभर प्रतिसाद मिळतो. विशेषत: राजपूत समाजात त्यांचा प्रभाव पडतो. परंतु देशात इतर मागासवर्गीयांची संख्या ५५ टक्क्यांच्या घरात असल्यामुळे शिवराजसिंह यांना अधिक मागणी असते. 

चालू निवडणुकीच्या पहिल्या फेरीत मतदानाचे प्रमाण खूपच कमी आढळल्यानंतर त्यात लक्ष घालण्यास शिवराजसिंह यांना सांगण्यात आले. विदिशामधून ते लोकसभेची निवडणूक पक्षातर्फे लढवत असले तरीही त्यांच्या मनात आपल्याला बाजूला ठेवल्याचे शल्य टोचत होते. छिंदवाड्यात ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांनी गेली चार दशके बस्तान बसवले आहे, ते मोडीत काढण्यासाठी शिवराजसिंह यांना छिंदवाड्यातून उमेदवारी हवी होती. परंतु बलाढ्य नेत्याला हरविण्याची संधी पक्षाने त्यांना नाकारली. अर्थात नंतर झाले ते बऱ्यासाठी. कारण अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या तुलनेत शिवराजसिंह यांची मागणी वाढली. शिवराज सिंह यांच्यावर ही भगवंताची कृपाच म्हणायची!

टॅग्स :BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPoliticsराजकारण