शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

केवढे हे क्रौर्य?

By admin | Updated: February 28, 2017 23:52 IST

दहशतवाद, बॉम्बस्फोट, भूसुरुंग सर्वात मोठी इमारत उडविली, रेल्वे रूळावरून घसरली, विमान कोसळले

दहशतवाद, बॉम्बस्फोट, भूसुरुंग सर्वात मोठी इमारत उडविली, रेल्वे रूळावरून घसरली, विमान कोसळले, शेकडो नागरिकांची हत्त्या अशा सारख्या बातम्या वाचून आणि दूरचित्रवाणीवरील दृश्ये पाहून मन बधीर झाले आहे़ काही वाटेनासे झाले आहे़ जीवघेणे क्रौर्य हासुद्धा आपल्या जगण्याचा भाग होऊन बसले आहे़ काहीच टाळता येत नाही, निवड करायला संधी नाही़ जे घडते ते उघड्या डोळ्यांनी पाहाणे, कानांनी ऐकणे आणि न बोलता तोंडावर बोट ठेवून सोशीत राहणे एवढेच आपल्या हाती आहे़ ‘कालचक्र हे अविरत फिरते/सारखा काळ चालला पुढे’ काळाबरोबर आपली फरपट़ त्याचे नाव जीवऩ सगळ्या गोष्टीला सीमा असते; पण क्रौर्याला नाही़ जातपात, गरीब श्रीमंत, उच्चनीच भेदाभेद नाहीत़ ते रोखण्याचे सामर्थ्य ईश्वराकडेसुद्धा नाही़ माणूस नावाचा प्राणी निर्माण करून तोही पस्तावला आहे़सृष्टीचे सुंदर दर्शन घेण्यासाठी त्याने दृष्टी दिली, दुसऱ्याचे दु:ख समजून घेण्यासाठी मन दिले़ कारुण्य ओळखण्याची शक्ती दिली़ डोळ्यात अश्रू दिले़ एकच अश्रू; पण नावे दु:खाश्रु आणि आनंदाश्रु़ जीवन साफल्यपूर्ण जगण्याचा मंत्र दिला़ मानवाने प्रतिसृष्टी उभी करून ईश्वरावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालविला आणि जगणेच अवघड होऊन गेले़ रेव्हरंड टिळकांची ‘केवढे हे क्रौर्य’ शालेय जीवनातील कविता आठवली़ करुणरसाने भरलेल्या या कवितेच्या वाचनाने वर्गातील सारी मुले रडत़ मुखी कवळ घेऊन पिलाला भरविणाऱ्या पक्षिणीचा व्याधाने घेतलेला बळी़ शेवट तर केवढा करुणामय़ ‘मातीत ते पसरिले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक चंचू तशीच उघडी पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले’ अश्रूंचा गहीवर आवरता घेणे जमत नसे़ त्या कविता गेल्या़ बालमनही उडून गेले़ क्रौंच पक्षाचा वध एवढे क्षुल्लक कारण रामायण नावाच्या महाकाव्याला जन्मास घालते झाले़‘मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वती: सभा: यत्क्रौंच मिथुनाद् एकम् अवधी: काममोहितम्’ शोक श्लोकबद्ध होऊन बाहेर पडला़ पक्षाच्या मरणाने दु:खी होणारे हे मन कोठले? हजारो निरपराधांचे क्षणात बळी घेणारे क्रौर्य पाहून काहीही वेदना न होणारे आमचे मन कसले हो ! कळेल का? आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपणच शोधावी लागतात़ ‘फु लासारखे केवळ कोमल देऊ नको रे मन मज देवाअसती सुंदर हसरी सुमने जग आहे परि जळता लाव्हा’ ही शोधलेली उत्तरे म्हणजे असते आपुल्यापुरती पळवाट़ दगड झालेल्या मनाला विश्रांती भेटली काय आणि नाही काय? सगळे सारखेच़ ही आणखी एक पळवाट़ -डॉ. गोविंद काळे