शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

संस्कृतीचा प्राण जपण्याची आशा!

By किरण अग्रवाल | Updated: December 9, 2017 05:07 IST

समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक उन्नयनाच्या विचारांचे मंथन ज्यात घडावे असे अपेक्षित आहे, त्या कुंभमेळ्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश केला गेल्याने संस्कार व सामाजिक उद्बोधनाचा प्रवाह अविरत

समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक उन्नयनाच्या विचारांचे मंथन ज्यात घडावे असे अपेक्षित आहे, त्या कुंभमेळ्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश केला गेल्याने संस्कार व सामाजिक उद्बोधनाचा प्रवाह अविरत, अखंडित राहण्याबरोबरच संस्कृतीचा प्राण जपला जाण्याची अपेक्षाही बळावून गेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.देशातील अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन व नाशिक-त्र्यंबकेश्वर क्षेत्री दर बारा वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा दिवसेंदिवस ‘हायटेक’ होत चालल्याने तशीही त्याची कीर्ती जागतिक पातळीपर्यंत पोहोचली आहेच. ‘विरक्ती’चा उपदेश करीत अत्याधुनिक सुख-सुविधांत रमणाºया आणि तीर्थाची थोरवी सांगत असतानाच स्वत: मात्र बाटलीबंद पाण्याचा वापर करणाºया बाबा आणि त्यांच्या चेल्यांच्या अनेकविध कथांनी कुंभमेळ्याच्या कीर्तीत अधिकचीच भर घातली आहे. कुंभमेळ्यातील साधू-महंतांचे वर्तन व व्यवहार चर्चित ठरत असतानाच त्यांच्या असण्यापेक्षा ‘दिसण्या’चीही चर्चा मोठ्या प्रमाणात झडत असते. त्यामुळेही अलीकडच्या काळात कुंभमेळ्याला गर्दी उलटून ‘जत्रे’चे स्वरूप प्राप्त होत गेले. तो केवळ आध्यात्मिक सोहळा न राहता शासकीय यंत्रणांच्या व भाविकांच्या दृष्टीनेही ‘इव्हेंट’ ठरू लागला आहे. अशा या सोहळ्याला आता ‘युनेस्को’च्या यादीत स्थान मिळाल्याने कुंभमेळ्याला अधिकृतरीत्या जागतिक परिमाण लाभणार आहे. कुंभस्थळांच्या पर्यटन विकास व वृद्धीच्या दृष्टीने तर ही बाब महत्त्वाची ठरावीच; पण त्याशिवाय सिंहस्थ कुंभपर्वाच्या योजनेमागे अभिप्रेत असलेल्या संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने उपायात्मक गोष्टी घडून येण्याचीही अपेक्षा यानिमित्ताने पुन्हा बळावून जाणे स्वाभाविक ठरून गेले आहे.कुंभमेळ्याला आज भलेही काहीसे वेगळे रूप व स्वरूप आलेले दिसत असले तरी, समाजाच्या सर्वांगीण उन्नयनाच्या सम्यक कृतीचा एक प्रवाह म्हणून त्याकडे पाहिले गेले आहे. मनुष्याला अशाश्वताकडून शाश्वताकडे, सांताकडून अनंताकडे व ध्येयशून्यतेकडून ध्येयवादाकडे नेणाºया संस्कृतीचे विचारमंथन होणे, त्यातून अध्यात्माधिष्ठित समाजाच्या धारणा अधिक दृढ होणे व पर्यायाने संस्कृती संवर्धनाचे मूळ प्राणतत्त्व जपले जाणे अभिप्रेत आहे. आज हे तसे अपवादानेच घडते. बुवा-बाबांच्या चमत्कृतींपुढे साधू-सन्याशांचे अध्यात्म मागे पडते. आजचे भक्त दिखाऊपणाला भुलतात त्यामुळे परंपरांमागील हेतंूचाच संकोच झाल्याखेरीज राहात नाही. साधूंचे ‘जलवे’ पाहून झाले व गंगा-गोदास्नानाची तिसरी पर्वणी आटोपली की सारेच कसे एकदम रिते झाल्यासारखे भासते, यामागील कारणही हेच की कुंभमेळ्याच्या आयोजनामागील अध्यात्माची बैठक मोडताना दिसून येते आहे. या लयास जाऊ पाहणाºया अगर क्षीण होऊ पाहणाºया ‘नाळे’ला बळकटी देण्याचे काम ‘युनेस्को’च्या सहभागामुळे घडून येत असते. भारतातील वैदिक मंत्रोच्चार परंपरा, मणिपूर नृत्य, छाऊ नृत्य आदींच्या यापूर्वीच्या समावेशाने ते दिसूनही येते. त्यामुळेच ‘ग्लॅमर’च्या डोळे दिपवून सोडणाºया वावटळीत अंग चोरून तग धरू पाहणारा मूळ संस्कृतीच्या संवर्धनाचा प्रवाह कुंभमेळ्याचाही ‘युनेस्को’च्या ऐतिहासिक वारसा यादीतील समावेशाने अधिक प्रशस्त होण्याची आशा जागली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक