शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इथे मृतांना मिळतो ‘न्याय’

By संतोष आंधळे | Updated: November 20, 2022 15:38 IST

श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. अत्यंत थंड डोक्याने केलेली हत्या आणि तेवढ्याच क्रूरतेने केलेले मृतदेहाचे 35 तुकडे, हे सर्व अक्षरश: काळजाचा थरकाप उडवणारे आहे. आता या सगळ्यांची जुळवाजुळव करून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम न्यायवैद्यक विभाग करणार आहे...

फॉरेन्सिक सायन्स अर्थात न्यायवैद्यक शास्त्राची तोंडओळख आपल्याला अलीकडच्या वेब सीरिजच्या माऱ्यामुळे वा सिनेमा, टीव्हीवरील मालिकेमुळे झालेली असते.  मात्र, त्याचे काम नेमके चालते कसे हे जाणून घेणे उद्बोधक आहे. सध्या देशभर गाजत असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात फॉरेन्सिक विभागच केंद्रबिंदू ठरणार आहे. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आणि मारेकरी आफताबने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते दिल्लीच्या आसपासच्या परिसरात इतस्तत: टाकले आहेत. ते तुकडे शोधण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. त्यानंतर सापडलेल्या हाडांच्या आधारे ते नेमके कुणाचे आहेत यासाठी त्यांना सर्वस्वी न्यायवैद्यक शास्त्र तज्ज्ञांवर अवलंबून राहावे लागणार आहे. 

२०१२ साली  शीना बोरा हत्या प्रकरणाने अशाच पद्धतीने  देशभर खळबळ माजली होती. या प्रकरणात आरोपींनी शीनाची हत्या करून तिचा मृतदेह रायगड येथील जंगलात पुरला होता. त्यावेळी या प्रकरणातील आरोपीना अटक करून तो मृतदेह उकरून बाहेर काढून त्याचा काही भाग न्यायवैद्यक शास्त्र विभागाला दिला होता. त्यामध्ये नायर रुग्णालयातील  न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश मोहिते यांनी वैद्यकीय संशोधन करून त्या मृतदेहाची ओळख पटवली होती. त्यांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. न्यायवैद्यक शास्त्राच्या मदतीने आजपर्यंत मोठमोठ्या घटनांमध्ये पोलिसांना पुरावे शोधून देण्याचे काम केले आहे. 

मानवी हाडे आणि दात सर्वसामान्य वातावरणात तीन वर्षापर्यंत राहू शकतात. त्यावर ओलसरपणा, हवेच्या आर्द्रतेचा परिणाम होत असतो. शरीरातील मोठे हाड म्हणजे मांडीचे हाड असेल तर शोध घेणे सोपे होते. जर कवटी मिळाली तर दाताच्या आधारावरसुद्धा त्या व्यक्तीचे वय शोधणे सोपे जाते. हाडाच्या आधारावर न्यायवैद्यक शास्त्रातील विविध निकषांवर त्या हाडांचे वर्गीकरण केले जाते. प्रयोगशाळेतील परीक्षण महत्त्वाचे असते. - डॉ. राजेश ढेरे, न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख, सायन हॉस्पिटल.

असा होतो उलगडा... -डॉ. महिते यांनी लोकमतला सांगितले, हाडाच्या आधारावर ओळख पटविणे ही शास्त्रीय पद्धत आहे. यासाठी शरीररचना शास्त्र विभागातील तज्ज्ञ व न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेतली जाते. पोलिस ज्यावेळी एखादा हाडाचा तुकडा आणतात. त्यावेळी डोळ्यांनी सहज पाहून पॅथॉलॉजिस्टच्या मदतीने हिस्टोपॅथॉलॉजी चाचणी करतो. सर्वप्रथम ते हाड मानवाचे आहे की प्राण्याचे हे शोधून काढतो. ते मानवाचे आहे, हे निश्चित झाल्यानंतर त्याच्यातील डी. एन. ए. काढण्यासाठी ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले जाते. त्यानंतर प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर त्या चाचणीचा आणि त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक म्हणजे आईवडील, सख्खे भाऊ-बहीण यांचे रक्ताचे नमुने घेऊन डीएनए जुळतात की नाही ते पाहिले जाते. डीएनए जुळले तर ती व्यक्ती त्यांचीच आहे हे सिद्ध होते. त्या हाडाच्या आधारे, त्या व्यक्तीचे वय, लिंग, तसेच ते हाड कधी पुरण्यात आले आहे. तो हाडाचा तुकडा जिवंतपणीच आहे की मृत्यूनंतरचा आहे, या अशा विविध गोष्टी न्यायवैद्यक शास्त्राच्या आधारावर उलगडा करणे  शक्य आहे. हाडाचा तुकडा मिळाल्यानंतर १० दिवसांत त्याचा शोध करून मिळू शकतो.   

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी