शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

माकडाच्या हाती कोलीत दिले तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 08:22 IST

राजधानीतील व्हीव्हीआयपी झोनमध्ये माकडांचा मुक्त संचार असतो

दिल्लीतील माकडंही लय भारी आहेत राजेहो. राजधानीतील व्हीव्हीआयपी झोनमध्ये त्यांचा मुक्त संचार असतो. एरवी आपल्याला या भागात जायचे असल्यास किमान चार ठिकाणी तरी सिक्युरिटी चेक होते. राष्ट्रपती भवनात जातो म्हटलं तर विचारूच नका... पण ही भटकी माकडं थेट कुठंही जाऊ शकतात. काल परवाच खुद्द उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीच राज्यसभेत तक्रार केली की, ही माकडं थेट माझ्या शासकीय निवासात शिरू न सामानाची पळवापळवी करतात. आता बोला...मग कुणी बोलण्याआधीच आम्ही या माकडांच्या अशा या उच्छादामागील सायकॉलॉजीचा अभ्यास केला तेव्हा असे कळले की, सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या निमित्ताने या माकडांना आपल्या काही मागण्या सभागृहात मांडून त्या मंजूर करून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम तर त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंह यांच्या निषेधाचाच ठराव मांडला. या मंत्री महोदयांनी म्हणे, थेट डार्विनच्या सिद्धांतालाच छेद दिला. माणूस हा माकडाच्या उत्क्रांतीतून जन्माला आला हा सिद्धांतच त्यांना मान्य नाही. ‘इतरांचे मला माहीत नाही पण माझे पूर्वज हे माकड नव्हतेच’ असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यांचे हे वक्तव्य ‘ही सर्व मानव जात आमची वंशज आहे’ असे मोठ्या गुर्मीत सांगणाऱ्या या माकडांच्या जिव्हारी लागले. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून त्यांनी दिल्लीच्या व्हीव्हीआयपी भागात गोंधळ घातला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर दिल्लीचा ‘महाराष्ट्र’ करू असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.आता त्यांच्या मागण्या कोणत्या त्या बघू...१) सत्यपालसिंह काहीही म्हणोत पण, आम्हीच माणसाचे पूर्वज आहोत, हे सत्य आहे. आमचाच जातभाई‘अ‍ेप’ यापासूनच माणसाची उत्पत्ती झाली. त्यांचे ९९% जीन्स आपसात शेअर होतात, याचे कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत. शिवाय माकडचेष्टा, खुटीउपाडपणा, माकडाच्या हाती कोलीत अशी आमची सर्व गुणवैशिष्ट्ये(तुम्ही वाटल्यास त्याला अवगुण म्हणा) माणसाने जशीच्या तशी अंगिकारली. ‘हाथ कंगन को आरसी क्या’. तुमच्या या सभागृहातच किंबहुना या देशातील बहुतांश विधानमंडळात या गुणांची उधळण होत असते, हे काय आम्हाला माहीत नाही. तेव्हा आम्हाला माणसाचे पूर्वज म्हणून जाहीर करण्यात यावे.२) आम्हाला नेहमी भटके माकडं म्हणून हिणवण्यात येते. तेव्हा या भटके पुढे विमुक्त शब्द लावून भटके व विमुक्तांना मिळणाऱ्या सोईसवलती आम्हाला द्याव्यात.३) राजधानी दिल्लीत आम्हाला पकडण्यासाठी सापळे लावण्यात येत आहेत. बाहेरून पथकं बोलाविण्यात आली. प्रत्येक माकडामागे २४०० रूपये असा रेट आहे. यात किती घोटाळा होतो हे काय आम्हाला ठाऊक नाही? ५०० कोटीचे विमान १६०० कोटीत घेण्यासारखाच हा प्रकार आहे. तेव्हा हा खुटीउपाडपणा ताबडतोब थांबविण्यात यावा आणि आम्हाला राहण्यासाठी सन्मानजनक जागा देऊ न खानपानाची व्यवस्था करावी. मनेका गांधी आमच्या समर्थक आहेत, त्यांना यासंदर्भात एक निवेदन आधीच देण्यात आले. ‘माकडाच्या हाती कोलीत’ दिलेतर काय होते हे आपल्याला चांगले ठाऊक आहे. तेव्हा आमच्या उच्छादाला देशव्यापी स्वरूप येण्याआधीच उपाय योजावेत ही विनंती.- दिलीप तिखिले 

टॅग्स :delhiदिल्लीMonkeyमाकड