शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

लॉकडाऊनने दिले की चांगले अनुभव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:20 IST

मिलिंद कुलकर्णी २१ दिवसांसाठी लागू झालेल्या लॉकडाऊनने ९० दिवस पूर्ण केले. साखळी तुटलेली काही दिसत नाही. कारण रुग्ण अद्याप ...

मिलिंद कुलकर्णी२१ दिवसांसाठी लागू झालेल्या लॉकडाऊनने ९० दिवस पूर्ण केले. साखळी तुटलेली काही दिसत नाही. कारण रुग्ण अद्याप वाढतायत. कुणी जनतेला दोष देतंय, कुणी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील त्रुटींवर बोट ठेवतंय. अर्थव्यवस्था डबघाईला येतेय, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि नोकरीत चढउतार सुरु आहेत. हे सगळे नकारात्मक चित्र वास्तव असले तरी या तीन महिन्यांनी काही चांगले अनुभवदेखील दिले की, त्याविषयी चर्चा करुया ना !समाजमाध्यमांवर एक संदेश अधूनमधून फिरत असतो. तुम्ही १९६०, ७० च्या दशकात जन्म घेतला असेल तर तुम्हाला देशी खेळ, व्हीडिओ, वाचनालयातील पुस्तके असे अनुभव स्मरणात असतील, आणि या गोष्टी नामशेष होतानाही तुम्ही पाहिल्या. तुम्ही खरे भाग्यशाली आहात, असा त्या संदेशाचा एकंदरीत अर्थ आहे. तसाच अनुभव सगळ्याच वयोगटातील मंडळींनी या काळात घेतला.परदेश, परराज्य व महानगरांमध्ये स्थायिक झालेली मंडळी गावाकडे परतली. काही काळासाठी का होईना, या परतलेल्या भावंडांमुळे कुटुंब पुन्हा एकसंघ झाले. नातेबंध अधिक दृढ झाले. पुढच्या पिढीत कौटुंबिक जिव्हाळा वाढला. आपले क्षितीज कितीही विस्तारले, तरी घरट्यात परत यावेच लागते, हे नवे भान या काळाने दिले. परदेश, परराज्य व महानगरात राहत असल्याने दोन शिंगे अधिक असल्याचा अहंकार या काळात गळून पडला. गावाकडे राहणारा नातलगदेखील सुशिक्षित, सुसंपन्न व समृध्द आहे. नातेवाईकांशी ऋणानुबंध आहेत. अडीअडचणीत धावून जाणारी भावकी आहे, याची प्रचिती दिली. गावाशी नाळ कायम ठेवायला हवी, ही जाणीव झाली. सणवार, लग्न समारंभ, यात्रोत्सव काळात जसे जमेल तसे यायचे, असा निर्धार केला गेला. ही जमा बाजू नाही काय?ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊनचा काळ आल्याने सुटीत बाहेरगावी जाणारे, चित्रपट-हॉटेलची नियमित सवय असलेले लोक सक्तीने घरी राहिले. त्याचे लाभ तरी किती झाले. गृहिणीचे कष्ट पुरुषमंडळींना कधी नव्हे ते दिसले. पुरुषांमधील पाककलेचा गुण घरच्यांना कळाला. हॉटेलमध्येच खाल्लेल्या नवनव्या डिशेश ‘यु ट्यूब’च्या माध्यमातून घरी बनू लागल्या. उन्हाळी कामे यंदा वेळेत झाली. सगळ्यांचा हातभार लागल्याने महिलावर्गावर भार पडला नाही. वार्षिक धान्य खरेदीनंतर त्याला ऊन दाखविणे झाले. बिबड्या,कुरडया, उडदाचे पापड, शेवया या उन्हाळी कामांना सगळ्यांचा हातभार लागला. घरातील कपाटे, माळे आवरले गेले. अंथरुणे, पांघरुणे धुवून झाली. गाद्या-उशांना ऊन दाखवून झाले. केवढी कामांची यादी असते, हे प्रथमच घरातील सगळ्यांना कळले.कॅरम, पत्ते, चौपट, भोवरा, गोट्या, ल्युडो, व्यापार, सापशिडी असे बैठे खेळ रोज खेळले गेले. टीव्ही पेक्षा या खेळांचा आनंद वेगळा असतो, याची अनुभूती बालगोपाळांना आली.प्रदर्शनांमधून घेतलेली, भेट म्हणून मिळालेली अनेक पुस्तके कपाटाचे धन बनले असताना या काळात त्यावरील धूळ झटकली गेली. पुस्तके वाचनाचा आनंद पुन्हा एकदा भूतकाळात घेऊन गेला. धावपळीच्या जीवनात या आनंदापासून आपण मुकलो होतो, हे जाणवले. आता रोज किमान एक पान वाचायचे असा निर्धार केला गेला.आॅनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होमच्या निमित्ताने नवे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप घरात आले. घरातील आजीसह मध्यमवयीन आईदेखील तंत्रस्रेही झाली. युट्यूबरील अध्यामिक प्रवचने, पाककला, टी.व्ही.वरील मालिकांचे सुटून गेलेले भाग बघण्याचा आनंद महिला वर्ग घेऊ लागला.तात्पुरता रोजगार गमावलेल्या भंगार विक्रेता, रिक्षाचालक बांधवांनी हार न मानता लोटगाडी, रिक्षेचा वापर भाजीपाला, फळे विक्रीसाठी केला. लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने घरपोच भाजीपाला, फळे मिळत असल्याने प्रतिसाद चांगला मिळाला. शेतकरी बांधवांनीदेखील बांधावरुन थेट ग्राहकाच्या घरापर्यंत माल पोहोचविला. दलालाची साखळी तुटल्याने शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले आणि ग्राहकाला ताजा भाजीपाला मिळाला.अनेक साहित्यप्रेमी व्हीडिओद्वारे कथाकथन, साहित्यवाचन, कवितावाचनाच्या कार्यक्रमात रंगले. काहींनी भूतकाळात रमत आठवणी शब्दबध्द केल्या. घरी राहणे फार काही कंटाळवाणे नसते हे सक्तीच्या लॉकडाऊनने शिकविले. या चांगल्या गोष्टींविषयीदेखील बोलायला हवे की, नको, सांगा बरे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव