शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

दादांची वारसदारी ! सोलापुरी प्रांतासाठी 'बारामतीकरां'ची दावेदारी..

By सचिन जवळकोटे | Updated: August 23, 2020 06:57 IST

- लगाव बत्ती

- सचिन जवळकोटे

‘थोरले काका बारामतीकरां’ना नेहमीच दिल्लीपेक्षा महाराष्ट्र प्यारा. त्यातही पश्चिम महाराष्ट्र लाडका. त्यात पुन्हा सोलापूर, पुणे अन् सातारा प्रांत तर त्यांच्या हक्काचे. विश्वासाचे. या पार्श्वभूमीवर या परिसरात गेल्या दीड-दोन दशकांपासून ‘अजितदादा गट’ तयार झालेला. आता हे कमी पडलं की काय म्हणून ‘रोहितदादा’ही सोलापूरच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालू लागलेले. भविष्यात नेमकी कोणत्या दादांची वारसदारी इथं चालणार, याची नांदीच अलीकडच्या काही घटनांमधून दिसू लागलेली. लगाव बत्ती.   सोलापुरी प्रांतातील काही गावांमध्ये ‘बारामतीकरां’ना मानणारा मोठा वर्ग अनेक दशकांपासून अस्तित्वात राहिलेला. ‘बारामती’नंतर सर्वाधिक प्रेमही याच ‘सोलापूर’वर ‘थोरल्या काकां’नी केलेलं. ‘भावी पीएम’ म्हणून माढ्याच्या जनतेनंही त्यांना दिल्लीत पाठवलेलं. मात्र नंतरच्या काळात ‘धाकटे दादा’ या परगण्यात नको तेवढं लक्ष घालू लागले. स्थानिक समीकरणं झपाट्यानं बिघडत गेली. स्वतंत्र ‘अजितदादा गट’ उदयास आल्यानंतर अनेक सरदारांनी ‘घड्याळा’ला रामराम ठोकलेला. बरेच सेनापतीही ‘बारामतीकरां’पासून दूर गेलेले. हे सारं ‘थोरल्या काकां’ना समजत नव्हतं की ते हतबल होते, हे काळाला ठाऊक. मात्र या घराण्याची तिसरी पिढी आता पुन्हा एकदा सोलापुरात आपलं नवं अस्तित्व दाखवून देऊ लागलीय.  बारामतीच्या ‘रोहितदादां’नी विधानसभेला ‘कर्जत’मध्ये शिरकाव करत छानपैकी बस्तान बसविलं. त्यानंतर ते आता सोलापूरच्या घडामोडींकडेही बारीक लक्ष देऊ लागलेत. इथल्या विद्यापीठात उभारल्या जाणा-या पुतळ्याबाबत यांनी मंत्रालयात ‘सामंतां’सोबत खास बैठक घेतली. ऑक्टोबरमध्ये या पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ होणार असून त्यावेळी हे ‘दादा’ आवर्जून उपस्थित राहणार असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ठामपणे सांगितलं जाऊ लागलंय. विशेष म्हणजे याचवेळी पार्टीचा पश्चिम महाराष्ट्र युवक मेळावाही घेण्याचं नियोजन आखलं गेलंय.

  याच ‘रोहितदादां’च्या कारखान्याला सोलापूर जिल्ह्यातून लाखो टन ऊस दरवर्षी पोहोच करण्यात आलेला. यासाठी करमाळ्यातल्या ‘गुळवें’सह काही मंडळी नेहमीच अग्रेसर. या उसाच्या निमित्तानं भीमा काठावरच्या हजारो शेतक-यांशीही या कारखान्याचा थेट संपर्क वाढलेला. ‘माळशिरस’मधल्या ‘गोरडवाडी’च्या तरुणांनाही ‘रोहितदादां’नी आपल्या ‘युवा मंच’वर आवर्जून घेतलेलं. माढ्यातली काही पोरंही त्यांना नुकतीच भेटून आलेली. एकेका तालुक्यातली तरुण पिढी हळूहळू आपल्यासोबत जोडून ‘दादा युवा मंच’ या जिल्ह्यात स्ट्राँग होत असतानाच ‘अजितदादां’नी ‘इस्लामपूर’च्या ‘जयंतदादां’ना पूर्वी कधी काळी दिलेला निरोप कार्यकर्त्यांमध्ये खासगी चर्चिला जाऊ लागलेला, ‘सोलापूरचा कोणताही निर्णय मला विचारल्याशिवाय परस्पर घेऊ नका.’.. आता बोला. पुतळ्याचा निर्णय तर सोडाच, कार्यकर्त्यांची निवडही म्हणे आता परस्पर होऊ लागलीय. 

ता.क. : ‘रोहितदादां’चा वावर सोलापुरी टापूत वाढत असतानाच आता ‘पार्थ’लाही इथं आणण्याचा घाट दुस-या गटाकडून आवर्जून घातला जातोय.                   लगाव बत्ती..

महेश अण्णांचं ‘अंदरकी आडपिंचिंडू’!

तुम्हाला महापालिकेतले ‘महेशअण्णा’ आठवतात  का? होय. तेच ते. मुरारजी पेठेतले. इलेक्शनपूर्वी ‘धनुष्यबाण’ घेऊन फिरत होते. तिकीट मिळेना म्हटल्यावर ‘कमळ’वाल्या ‘चंदूदादां’बरोबर सलगी वाढवू लागलेले. नंतर ‘अपक्ष’ उभारून ‘प्रणितीताईं’ना निवडून आणण्यात यशस्वी ठरलेले. ‘एकाच वेळी सर्वांना फिरविणं’ याला तेलुगूत ‘अंदरकी आडपिंचिंडू’ म्हणतात. आता तर म्हणे ते ‘घड्याळ’ बांधण्यासाठी प्रचंड उत्सुक बनलेत. खरंतर, निवडणुकीपूर्वीच पंढरपूरच्या ‘भारतनानां’नी त्यांची गाठ ‘बारामतीकरां’सोबत घालून दिलेली. ‘शेट्टीं’चा ‘हात’ सोडून नंतर पटकन ‘घड्याळ’ वापरणा-या ‘नानां’नी म्हणे ‘अण्णां’ना ‘पक्षनिष्ठा कशी टिकवायची असते’, यावर शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केलेलं.   असो. तेव्हा काही ‘जुळणी’ झाली नव्हती. मात्र आता ‘लक्ष्मी-विष्णू’वाल्या ‘दिलीपभाऊं’ना सोबत घेऊन ‘अण्णां’नी स्वातंत्र्यदिनी ‘भरणेमामां’ची गुपचूप भेट घेतलेली. मात्र त्यांची ‘एमएलसी’ची अट ऐकून ‘मामा’ही दचकलेले. ‘अनगरकरां’सारखी कैक जुनी-जाणती नेतेमंडळी अजूनही पंगतीच्या रांगेत उभारलेली असताना या नव्या अनाहूत पाहुण्याच्या हातात पंचपक्वान्नाचं ताट कसं द्यायचं, असाही प्रश्न या ‘मामां’ना पडलेला. मात्र आगामी महापालिका निवडणुका त्यांच्या डोळ्यांसमोर तरळलेल्या. एकदा तरी ‘बाळीवेशी’पलीकडे आपल्या ‘घड्याळाचा गजर’  करायचा असेल तर दीड डझन मेंबरांसह ‘अण्णां’ना आपल्या पार्टीत घेणं, कधीही फायद्याचंच, हे त्यांच्या लक्षात आलेलं. मात्र, या पक्षांतरावरून ‘मातोश्री’वर पुन्हा गडगडाट झाला तर ‘मीडिया’वाले लगेच ‘सरकार गडगडणार’चा भोंगा वाजविणार, हेही ‘बारामतीकर’ ओळखून.. कारण आत्ताच कुठं ‘पारनेर’चं प्रकरण मिटविता-मिटविता सा-यांना नाकीनऊ आलेलं. मात्र ‘मेंबरां’ना बाजूला ठेवून ‘अण्णा’ एकटेच ‘घड्याळ’वाल्यांसोबत गेले तर ‘देवेंद्र्रदादां’ची चांदीच चांदी. स्वत:कडे ‘धनुष्यबाण’, काकांकडे ‘घड्याळ’ अन् ‘सासुबाईं’कडं ‘कमळ’. वाऽऽ रे वाऽऽ ऑल इन वन. जणू ‘बाय वन गेट थ्री’च की.. पण या धरसोड वृत्तीमुळे ‘एक ना धड भाराभर..’ असं होऊ नये म्हणजे मिळवली. लगाव बत्ती.

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारण