शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दादा, आपली इतिहासात नोंद..!

By अतुल कुलकर्णी | Updated: November 15, 2017 12:06 IST

नमस्कार. सगळ्यात आधी आपल्याला रस्तेमुक्त खड्डे व्हावेत यासाठी शुभेच्छा..! सॉरी, खड्डेमुक्त म्हणायचं होतं चुकून उलटं झालं. आपण वाईट वाटून घेऊ नका... महाराष्ट्राला कसं बनवावं याची काही ना काही स्वप्नं आजवरच्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी पाहिली होती.

प्रिय चंद्रकांतदादा पाटील,नमस्कार. सगळ्यात आधी आपल्याला रस्तेमुक्त खड्डे व्हावेत यासाठी शुभेच्छा..! सॉरी, खड्डेमुक्त म्हणायचं होतं चुकून उलटं झालं. आपण वाईट वाटून घेऊ नका... महाराष्ट्राला कसं बनवावं याची काही ना काही स्वप्नं आजवरच्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी पाहिली होती. तशी ती देवादी देव देवेंद्रांनीही पाहिली असतील. हे राज्य खड्डेमुक्त व्हावं असं त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण का मेहनत करायची..? उगाच सगळं श्रेय त्यांना मिळेल ना दादा..! आपण एवढी मेहनत केल्याचा काय उपयोग? ते जाऊ द्या, पण जळगावच्या बैठकीत आपण जो संदेश अधिका-यांना दिला ना दादा, त्याला राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासात तोड नाही. अधिका-यांना काय करू आणि काय नको असं झालंय तेव्हापासून. सगळे अधिकारी कागदावर खड्डे शोधत फायलीवर डांबर टाकत बसलेत. अर्ध डांबर वापरा, बाकीचं माध्यमांना मॅनेज करण्यात घालवा असा आपण दिलेला सल्ला या राज्यात ६० वर्षांत कोणाला कसा सुचला नाही? अगदी आर्थर रोडवर मुक्काम असणाºया छगन भुजबळांचीही हे आपल्याला कसं सुचलं नाही या प्रश्नानं झोप उडालीय म्हणे... काही असो, सगळे अधिकारी मोकळेपणानं कामं करायला उत्सुक झालेत. या एका निर्णयामुळे डांबर किती आणि कुठं लावायचं याच्या हिशोबात सगळे मग्न झालेत बघा..!दादा, विरोधकांना ‘सेल्फी विथ खड्डे’ यावरून काही बोलू नका. तुम्हाला अंदर की बात सांगू का, विरोधकांना सेल्फी काढत बसू द्या... आपल्या फायद्याचं आहे ते. त्यांना काही कमी विषय नाहीत राज्यात. कर्जमाफी, हमी भावाची बंद पडलेली खरेदी, बँक रॉबरी आणि आत्ता काही दिवसापूर्वी सांगलीत पोलिसांनीच एका मुलाला जिवंत जाळल्याची घटना. एवढे सारे विषय असूनही ते फक्त खड्डे, खड्डे करत बसलेत. आपण विरोधात होतो, तेव्हा पोलीस कोठडीमध्ये एकजण मेला होता, त्यावेळी गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, आपले देवेनभाऊ यांनी त्या सरकारला घाम फोडला होता घाम! त्यामानाने आताचे विरोधक बरे म्हणायची वेळ आली दादा... काही घडलं की ते निषेध करतात, फार तर पत्रक काढतात. खूप झालं तर पत्रकार परिषद घेतात आणि गप्प बसतात. आता ते सभा घेतायतं, सेल्फी विथ खड्डे करतायत. करू द्या त्यांना दादा. उलट मीडियाला कसं मॅनेज करायचं ते जरा अधिकाºयांना खासगीत सांगा... म्हणजे ते पण खड्डे खड्डे, सेल्फी सेल्फी करत बसतील.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार