शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

गुगल देवर्षी सीआयडीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:41 IST

एसीपी प्रद्युम्न आणि इन्स्पेक्टर दया स्वर्गलोकात पोहोचले आणि त्यांनी थेट इंद्रदेवाची भेट घेतली

एसीपी प्रद्युम्न आणि इन्स्पेक्टर दया स्वर्गलोकात पोहोचले आणि त्यांनी थेट इंद्रदेवाची भेट घेतली. आपण देवर्षी नारद मुनींच्या शोधात येथवर पोहोचल्याचे त्यांनी सांगताच इंद्राचे सिंहासन गदगदा हलू लागले. लागलीच दया पुढे धावला व त्याने ते सिंहासन गच्च पकडून ठेवल्याने देवाधिदेव इंद्र त्यावरून पडतापडता वाचले. दया, कुछ तो गडबड है... असं म्हणत एसीपी प्रद्युम्न यांनी आपल्याला नारदमुनींचा ठावठिकाणा हवा असल्याचे सांगितले. इंद्रानं आपला सॅटेलाईट फोन उचलून नारदाचे पिताश्री ब्रह्मदेवांना फोन लावला. आपल्या पुत्राकडे तिन्हीलोकी मुक्तसंचार करण्याचा पासपोर्ट असल्याने सध्या तो नेमका कुठे आहे, ते सांगणे कठीण आहे, असे ब्रह्मदेव बोलले. मात्र, सीआयडीने नारदमुनींना शोधून काढलेच. अरे, पण मी पामराने असे काय पातक केले की, तुम्ही मला आपल्यासोबत येण्यास बाध्य करत आहात, असा सवाल मुनीवर यांनी करताच अभिजित म्हणाले की, ते तुम्हाला सीआयडीच्या सेटवर गेल्यावरच कळेल. नारद खुर्चीत बसले असून समोर एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजित, फ्रेड्रिक्स वगैरे उभे होते. दया, कुछ तो गडबड है. अब असली बात का पता चलेगा... प्रद्युुम्न बोलले. वत्सा, मी गुन्हा काय केलाय? नारदमुनींनी काहीशा घाबऱ्याघुबºया सुरात विचारले. खूप गंभीर गुन्हा केलाय तुम्ही, दया अधिक जवळ सरकताच मुनीवरांनी वीणा छातीशी घट्ट धरून अंग चोरून घेतले. प्रद्युम्न बोलू लागले... तुम्हाला तुमच्या वडिलांनी- ब्रह्मदेवांनी विवाह करायला सांगितले होते. परंतु, तुम्ही त्यांची आज्ञा मानली नाही आणि कठोर तपश्चर्या करत राहिलात. त्यामुळे तिन्ही लोकी हाहाकार उडाला. कामदेवाने तुमची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानेही हात टेकले. तुम्हाला ब्रह्मदेवांनी शाप दिला की, तुम्ही गंधर्वयोनीत जन्म घ्याल आणि कामिनींचा सहवास तुम्हाला लाभेल. मात्र, तुम्ही भक्ती सुरू ठेवली. एक दिवस विष्णूने तुमची परीक्षा बघायचे ठरवले. मायानगरी तयार करून देवी लक्ष्मीने रूप घेतलेल्या राजकुमारीकडे तुम्हाला आकृष्ट केले. तिला वश करण्याकरिता तुम्ही विष्णूकडे सुंदर रूप मागितले. पण, त्या राजकुमारीने दीनरूपातील विष्णूला पसंत केल्याने तुमचा तीळपापड झाला.क्रोध अनावर होऊन परत येत असताना तुम्ही नदीपात्रात स्वत:चा चेहरा पाहिला, तर तो माकडासारखा दिसत होता. त्यामुळे तुम्ही क्रोधित होऊन विष्णू-लक्ष्मीला शाप दिला की, तुम्ही मला जसा स्त्रीवियोग दिला, तसा तो तुम्हालाही होईल. त्यामुळे त्या दोघांना राम-सीतेचा अवतार घ्यायला लावले. तुम्ही एवढ्यावरच थांबला नाहीत. तिकडे जंगलात दरोडे टाकून पोट भरणाºया वाल्या कोळ्याच्या वाटेत तुम्ही आडवे गेलात आणि त्याला वल्मीक (वारुळातून) बाहेर काढून वाल्मिकी होण्यास भाग पाडले. राम-सीतेच्या वनवासाची, वियोगाची कथा लिहिण्यास भाग पाडले. अत्री ऋषींची पत्नी अनसूया हिच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्याकरिता ब्रह्मा, विष्णू, महेश यांना इहलोकी येण्याची फूस लावली. अनसूयेकडे त्यांनी निर्वस्त्र जेवण वाढण्याची मागणी केली. लोकांबद्दलची माहिती लीक करणे, ती प्रसिद्ध करण्यास भाग पाडणे वगैरेवगैरे गुन्ह्यांखाली ‘गुगल देवर्षी’ आता आत बसा...- संदीप प्रधान (sandeep.pradhan@lokmat.com)