शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

नक्षत्रांचे देणे

By admin | Updated: April 22, 2017 04:21 IST

चिखलदऱ्याला विश्रामगृहाच्या प्रशस्त अंगणात आकाशात चमचमणाऱ्या नक्षत्रांवर नजर खिळवून मंत्रमुग्ध झाल्यासारखे आम्ही कितीतरी विद्यार्थी बसलो होतो.

- डॉ. सौ. प्रज्ञा आपटेचिखलदऱ्याला विश्रामगृहाच्या प्रशस्त अंगणात आकाशात चमचमणाऱ्या नक्षत्रांवर नजर खिळवून मंत्रमुग्ध झाल्यासारखे आम्ही कितीतरी विद्यार्थी बसलो होतो. एरवी उंच इमारतींच्या घेऱ्यात व विजेच्या दिव्यांच्या लखलखाटात क्षितिजापर्यंतची नक्षत्रे घरच्या खिडक्यातून नजरेस पडतच नाहीत. प्रतिभेच्या गूढ देण्याची परतफेड करायचे राहून गेले - ‘गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे !’ म्हणून हुरहूर व्यक्त करणारे आरती प्रभू आठवले. लाट उसळून जळात खळं व्हावं आणि त्यात चंद्राचे चांदणे पडावे तशी लाडक्या कन्येची गालावरची खळी ‘बी’ कवींना भासली. उभे विश्व म्हणजे महादेव (व्योमकेश), आकाश हे त्यांचे केस, त्यात चंद्र आणि आकाशगंगा चमचमत आहेत ही सावरकरांच्या सप्तर्षी कवितेतील अचाट कल्पना अचानक आठवली. कालपथावर निघालेल्या ‘जगन्नाथाचा रथ’ आठवला. ‘पृथ्वीचे प्रेमगीत, काढ सखे गळ्यातील, मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसिले’ अशा कुसुमाग्रजांच्या कवितेतील नक्षत्रांची मोहकता आठवली. ‘थांग-अथांग’ संग्रहातील नागझिरा कवितेच्या तिसऱ्या भागात कवी श्रीधर शनवाऱ्यांनी विश्रामगृहाच्या खिडकीतून दिसणाऱ्या एका वठलेल्या निष्पर्ण वृक्षाचे शब्दचित्र रेखाटले आहे. कृत्तिकेचा पुंज, मग रोहिणी आणि कितीतरी नक्षत्रे त्या वृक्षावर उमलत गेल्याचे त्यांना दिसते. दिशा उजळल्यावर वास्तवाची धग जाणवते. वठलेल्या झाडावर घाव घालायला रेंजर उभा असतो. आपले जगणे असेच आभासमय तर नाही? हा अनुत्तरित प्रश्नही कवीच्या मनात तरळत राहिला.बी.एड.च्या विद्यार्थ्यांची चिखलदऱ्याला गेलेली ती सहल होती. आकाशवाचनाची माझी हौस स्वस्थ बसू देईना. पूर्वेकडचे हस्त नक्षत्र, कृत्तिकेचा पुंज, रोहिणी, सप्तर्षी, आकाशाचे महाद्वार सारे बघताना दक्षिण क्षितिजाच्या थोडे वर असणारे वृश्चिक नक्षत्र लखलखू लागले. ते दाखवते आहे तोच मॅडमची हाक कानी आली. आम्ही सगळ्याजणी परतलो. रात्र बरीच झाली होती. विश्रांतीचीही गरज भासत होती. गादीवर पसरलेल्या पांढऱ्याशुभ्र चादरीवर अंग टाकले मात्र विंचवाने डंख मारल्यागत मी झटक्यात उठून बसले. माझ्या लहानशा चित्काराने मैत्रिणीही भोवती जमल्या. डंखाच्या झिणझिण्या क्षणासाठी पार मेंदूपर्यंत पोहोचल्या. माझ्या गादीवर टेकलेल्या दंडाला डंख मारून, नुकतेच जगात आले असावे इतके नखभर लहान आणि भुरे विंचवाचे पिल्लू नांगी उभारून बिछान्याबाहेर धावत होते. नुकतीच मी वृश्चिक नक्षत्र बघितले होते आणि आता हा त्याचा डंख. विंचवाचे पिल्लू लहान होते; पण त्याच्या डंखात विखार होताच. मैत्रिणींनी त्याचा समाचार घेतला. माझ्यावर उपचार केले. मी मात्र तेव्हापासून आकाशवाचनाचा आणि विशेषत: ‘वृश्चिक’ नक्षत्राचा धसकाच घेतला आहे !