शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गांधी हत्येचा कट उधळणारे गुरुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 02:17 IST

भारताच्या फाळणीच्या रागातून महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली असे म्हटले जाते ते खरे नाही कारण १९४४ मध्ये भिलारे गुरुजी आणि त्यांच्या सहकाºयांनी गांधी हत्येचा कट उधळून लावला होता

भारताच्या फाळणीच्या रागातून महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली असे म्हटले जाते ते खरे नाही कारण १९४४ मध्ये भिलारे गुरुजी आणि त्यांच्या सहकाºयांनी गांधी हत्येचा कट उधळून लावला होता.तेव्हा भारताची फाळणी झालेली नव्हती, की पाकिस्तान निर्मितीला महात्मा गांधी यांनी मान्यता दिली नव्हती.ंमहाबळेश्वर-पाचगणी या निसर्गसंपन्न डोंगरदºयात वसलेल्या शहरांजवळील भिलारचे भिलारे गुरुजी यांचे नुकतेच देहावसान झाले. लोकसभेच्या १९८९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वार्तांकनासाठी सातारा जिल्ह्यात फिरत असताना या गांधीवादी कार्यकर्त्याची भेट झाली होती. स्वातंत्र्यासाठी झटणाºया कार्यकर्त्याप्रमाणेच सातारा जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी ते पार पाडत होते. त्यांना सर्वजण भिलारे गुरुजी या नावानेच ओळखत होते. चौकशी केली तेव्हा कळले की, स्वातंत्र्यपूर्व काळात केवळ काही वर्षे शिक्षक असलेले भिकाजी दाजी ऊर्फ भिलारे गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. केवळ सहभागी झाले नाहीत, तर सातारा परिसरातील स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य स्वातंत्र्यसैनिक म्हणून काम करू लागले.महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९४२ चा चलेजावचा लढा तीव्र झाला होता. त्यात सहभागी होणाºया भिलारे यांना गुरुजी याच नावाने कायम ओळखले जाऊ लागले. १९१९ मध्ये जन्मलेले भिलारे गुरुजी १९४२ पासून अखेरच्या श्वासापर्यंत कॉँग्रेससाठी कार्य करीत राहिले. हे कार्य करताना महात्मा गांधी, सरहद्द गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, आदी नेत्यांशी जवळून एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले. तरुण गुरुजी सक्रियपणे स्वातंत्र्यलढ्यात काम करीत असताना महात्मा गांधी यांच्याशी परिचय झाला होता. १९४४ मध्ये काही दिवस महात्मा गांधी पाचगणीला आले होते. तेव्हा सर्व कॉँग्रेस कार्यकर्त्यांना भिलारे गुरुजी आणि त्यांच्या सहकाºयांनी एकत्र केले होते. त्या गटास मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा गांधी आले होते. त्या गर्दीत पुण्याहून आलेल्या तरुणांचा एक गट सामील झाला होता. त्यातील एका तरुणाने महात्मा गांधी सभास्थानाहून बाहेर पडत असताना त्यांच्यावर चाकूने हल्ला केला मात्र त्या तरुणावर झडप टाकत त्याचा चाकूचा हात पकडणाºया कार्यकर्त्यांमध्ये भिलारे गुरुजी होते. त्यांनी त्या तरुणास पकडले, त्याला कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तो हल्ला करणारा पुण्याचा नथुराम गोडसे होता. महात्मा गांधी यांना हा गोंधळ समजताच त्या तरुणास का मारता अशी चौकशी केली तेव्हा त्यांना आपली हत्या करण्यासाठी पुण्याहून काही तरुण आले होते, असे त्यांना वाचविणाºया भिलारे गुरुजी आणि त्यांच्या सहकाºयांनी सांगितले. तेव्हा त्यांना चर्चेसाठी बोलाविण्याची विनंती महात्मा गांधी यांनी केली; पण ते तरुण पसार झाले. त्यांचा चर्चेवर विश्वास नव्हताच. त्याच तरुणाने (नथुराम गोडसे) महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्लीत गोळ्या घालून हत्या केली. भिलारे गुरुजी यांच्या निधनाने या सर्व घटनाक्रमांना उजाळा मिळालाच; पण त्याबरोबरच भारताच्या फाळणीच्या रागातून महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली नाही. कारण १९४४ मध्ये भिलारे गुरुजी आणि त्यांच्या सहकाºयांनी गांधी हत्येचा कट उधळून लावला होता. तेव्हा भारताची फाळणी झालेली नव्हती, की पाकिस्तान निर्मितीला महात्मा गांधी यांनी मान्यता दिली नव्हती. महात्मा गांधी यांच्या सर्वधर्म समभाव तत्त्वालाच विरोध करून धर्माधिष्ठित राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशाने त्यांची हत्या करण्याचा कटच रचला होता. तो पाचगणीत यशस्वी झाला नाही. कारण भिलारे गुरुजी यांच्यासारख्या तरुणांची फळी तेथे उभी होती. स्वातंत्र्यानंतरही भिलारे गुरुजी यांनी त्याच निष्ठेने सातत्याने सहा दशके कॉँग्रेसचे काम केले. गावोगावच्या उन्नतीसाठी ग्राममंडळे स्थापन केली. महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरातील ज्याला जावळीचे खोरे म्हणून ओळखले जाते, त्या खोºयातील दºयाखोºयात पसरलेल्या खेड्या-पाड्यांवर काम केले. आमदार म्हणून निवडूनही आले, गांधी विचारधारेनुसार कार्यच नव्हे, तर जीवनधारा अंगीकारणारे गुरुजी तब्बल ९८ वर्षे जगले. अखेरपर्यंत त्यांनी कॉँग्रेसचा विचार जपला.- वसंत भोसले