शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतून...: अतिक्रमण पाडायचे की कारवाईचा फार्स करायचा..?

By नारायण जाधव | Updated: October 30, 2023 07:26 IST

नुसते नामफलक, शेडवर कारवाई करून उपयोग नाही.

नारायण जाधव, उप-वृत्तसंपादक

नवी मुंबईतअतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांविरोधात सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी असलेले राहुल गेठे यांचे थेट नवी मुंबई महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी समावेशन करून त्यांच्याकडे अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामविरोधी पथकाची जबाबदारी सोपविली आहे. सुरुवातीला एक डॉक्टर अतिक्रमणांवर काय कारवाई करणार, अशी टीका गेठेंवर झाली होती. परंतु, त्यांनी या टीकेला न जुमानता ज्या पद्धतीने अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू केली, तिचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. यात लेडीज बारच्या चालक-मालकांनी कारवाई थांबविण्यासाठी पहाट होण्याची न वाट पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यरात्री भेट घेतली, यावरून सुनियोजित नवी मुंबईतील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांची कीड किती व्यापक आहे, हे लक्षात येते.

गेठे यांच्या पथकाकडून जी कारवाई सुरू आहे, तिचे काहींकडून स्वागत होत आहे, तर काहींकडून टीका होत आहे. कारण केलेली कारवाई आणि ठोठावलेला दंड पाहता संशयाला वाव आहे. यामुळे आता डॉ. गेठेच नव्हे आयुक्त राजेश नार्वेकर यांनाही साधवगिरीने अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करावी लागेल. कारण शहरात जी काही अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे आहेत, ती राजकीय नेते, मोठ्या व्यावसायिकांची आहेत.

तक्रारींना केराची टोपली

नवी मुंबई महापालिकाच नव्हे तर सिडकोच्या अतिक्रमण अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात ज्या तक्रारी येतात, त्यांना केराची टोपली दाखवली जाते. एखादे बांधकाम जमीनदोस्त न करता जेसीबीचे एक-दोन फटके मारले जातात. संबंधित अनधिकृत बांधकामांना लागणारे पाणी, मीटर, गटारीसाठी शासकीय यंत्रणाच मदत करतात. निबंधक मुद्रांक घेतात. सिडकोत तर एका ‘संजय’च्या दूरदृष्टीखाली अनधिकृत बांधकामांचा ‘वे (लू) णू’ गगनावर गेला आहे. यामुळे चोरचोर मौसेरे भाईंची ही साखळी तोडणे गरजेचे आहे. अन्यथा, अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई केवळ फार्सच ठरेल.

सध्या दुकाने, हाॅटेल, लॉज यांचे बोर्ड, बाजूच्या शेडवर कारवाई होत आहे. अनधिकृत मोठ्या बांधकामांवर कारवाई होतच नाहीये. बरं शहरातील एकाही व्यावसायिकाने आपल्या नावाचा, एखाद्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी जे बोर्ड लावले आहेत, त्यासाठी कोणतीच परवानगी घेतलेली नाही. अगदी सिगारेट आणि मद्याची जाहिरात करणारे फलकही महापालिका आणि उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून झळकत आहेत.

 पदभार घेतल्यापासून गेठे यांनी ज्या हॉटेल, लेडीज बार, लॉज आणि इतर व्यावसायिकांच्या आस्थापनांवर बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशीत कारवाई केली, त्यांचे नुसते नामफलक, शेडवर कारवाई करून उपयोग नाही. तर मोठी अनधिकृत बांधकामे, आस्थापनांत परवानगी न घेता केलेले अंतर्गत बदल यावर कारवाईची मागणी होत आहे.  एपीएमसीत अनधिकृत लॉजचे पेव फुटले आहे, ते थांबवायला हवे. येथील एकही लॉज नगररचना विभागाच्या नियमानुसार नाही. एपीएमसीत भूछत्राप्रमाणे लेडीज बार, पब, हॉटेल वाढण्यामागे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम विभागातील काही अधिकारी, कर्मचारीच कारणीभूत आहेत.  आजही तुर्भेत एक कर्मचारी या सर्वांचे राडे‘रोडे’ सांभाळतो. त्याने स्वत:च अनधिकृत लॉज थाटल्याचे सांगतात. मॅफ्को मार्केटमधील बांधकामांना यांचेच अभय आहे. कोपरखैरणे, घणसोलीत एका ‘ठाकरे’ साहेबांचा रुबाब आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNavi Mumbaiनवी मुंबई