शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

चार चेंडूत ९२ धावा!

By admin | Updated: April 15, 2017 05:08 IST

ब्रिटिशांनी आपल्या सत्तेसोबत वसाहतींमध्ये पसरविलेले क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जातो. पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा वाटत असला

ब्रिटिशांनी आपल्या सत्तेसोबत वसाहतींमध्ये पसरविलेले क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जातो. पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा वाटत असला तरी तो मान्य करणे हे क्रिकेटमधील सभ्यपणाचे एक लक्षण आहे. तरीही पंचांच्या निर्णयावरून वाद होतच असतात व काही वेळा तर पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या संघास सामना किंवा प्रसंगी प्रतिष्ठित स्पर्धेचे अंतिम जेतेपदही गमवावे लागल्याची उदाहरणे आहेत. पंचांच्या निर्णयावरून बहुतांश वाद होतात ते झेल, पायचीत, यष्टिचीत. धावचीत, षटकार, सीमारेषेवरील झेल आणि नोबॉल या संबंधीचे असतात. परंतु पंचांनी दिलेल्या नाणेफेकीच्या कौलावरून वाद क्वचितच होतात आणि त्याचा निषेध म्हणून एखाद्या संघाने मुद्दाम सामना हरणे तर त्याहून विरळा. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरात मंगळवारी नेमके असेच घडले. मंगळवारी लालमातिया क्लब आणि अ‍ॅक्झिआॅम क्रिकेटर्स या दोन संघांमध्ये सामना झाला. पंचांनी दोन्ही संघांच्या कप्तानांना सोबत घेऊन नाणेफेक केली आणि अ‍ॅक्झिआॅमच्या कप्तानाने म्हटल्याप्रमाणे ‘छापा’ पडल्याचे पंचांनी जाहीर केले. अ‍ॅक्झिआॅमने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण लालमातियाच्या कप्तानास ही नाणेफेक मान्य नव्हती. पंचांनी नाणे न दाखवताच कौल जाहीर केला, असा त्याचा आक्षेप होता. पण त्याने लगेच दृश्य स्वरूपात निषेध नोंदवून आकांडतांडव केले नाही. लालमातिया संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ८८ धावा केल्या. त्यानंतर अ‍ॅक्झिआॅम संघ फलंदाजीस उतरला आणि लालमातियाने न बोलता आपले निषेधाचे अस्र बाहेर काढले. लालमातिया संघाच्या सुजोन मेहमूद या आघाडीच्या गोलंदाजाने टाकलेले पहिले षटक हाच त्या संघाचा अभूतपूर्व निषेध होता. मेहमूदने या षटकात चक्क १५ ‘नो बॉल’ व १३ ‘वाइड बॉल’ टाकले. यापैकी एकही ‘वाइड बॉल’ यष्टिरक्षकाने (मुद्दाम) न अडविल्याने त्या प्रत्येक चेंडूवर चार ‘बाय’ मिळाल्या. अशा प्रकारे, ‘नो बॉल’ आणि ‘वाइड बॉल’वर ६७ धावा झाल्या. मेहमूदने नियमाला धरून टाकलेल्या चार चेंडूंवर अ‍ॅक्झिआॅमच्या फलंदाजांनी १२ धावा केल्या आणि त्यांचा १० गडी राखून विजय झाला. या प्रकाराने अ‍ॅक्झिआॅमचे खेळाडू व सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेले थोडके प्रेक्षक चक्रावून गेले. लालमातिया क्लबचे महासचिव अदनान रेहमान दिपाँ यांनी नंतर सांगितले तेव्हा हा पंचांच्या निषेधाचा प्रकार होता, हे स्पष्ट झाले. या स्पर्धेत असा निषेध नोंदविला जाण्याची ही पहिली वेळ नव्हती. आदल्याच दिवशी फिअर फायटर्स स्पोर्टिंग क्लबच्या तसनीम हसन या गोलंदाजाने अशाच प्रकारे सात ‘वैध’ चेंडूंमध्ये ६९ धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या होत्या. स्थानिक पातळीवरचे क्रिकेट जर असे खेळले जात असेल तर राष्ट्रीय पातळीवर मातब्बर संघ तयार होण्याची अपेक्षा ठेवणेही चुकीचे ठरेल.