शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

निराकार परमेश्वराचे रुप

By admin | Updated: September 10, 2016 05:49 IST

विमानाने आकाशात झेप घेतली. जमिनीशी संपर्क तुटला. वितभर खिडकीतून बाहेरचे मनोहारी सरकते दृश्य नजर बांधून ठेवत होते.

विमानाने आकाशात झेप घेतली. जमिनीशी संपर्क तुटला. वितभर खिडकीतून बाहेरचे मनोहारी सरकते दृश्य नजर बांधून ठेवत होते. उंच इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या तर शेतांचे, जंगलांचे हिरवे पट्टे वर्ल्ड अ‍ॅटलाससारखे दिसत होते. वळत जाणाऱ्या नद्या चांदीप्रमाणे चकाकत होत्या आणि लांबवर जाणारे महामार्ग पाहताना नदीचाच आभास होत होता. हळूहळू जमिनीशी नाते तुटले. नजर आत वळली. पण खिडकीबाहेरच्या मनोहारी दृश्याने मी अवाक् झाले.अष्ट नव्हे तर खाली-वर धरून दशदिशांना निळ्या अनंत आकाशाचा नीलिमा दृष्टीला सुखवत होता. निराकार, अनाम अशा परमेश्वराचेच जणू ते रूप. जितके विशाल हे आकाश आहे तितकेच विशाल आतले आकाश आपल्या मूठभर दिसणाऱ्या हृदयात आहे. उपनिषदातील एक संवाद मनात उमलत होता. विश्वात ‘जिकडे जावे तिकडे, पायाखाली, तृणावृता भू दिसते।’ पायाखाली गर्भरेशमी हिरव्या रंगाने सजलेली सावळी भूमाता दिसते आणि आपल्याप्रमाणेच शत्रू राष्ट्राच्या माणसांच्या ‘डोक्यावरती दिसते निलांबर ते’ केशवसुतांनी किती समर्पक वर्णन यात शब्दबद्ध केले आहे.विश्वाचे पालन-पोषण करण्यासाठी आपले रश्मिजाल विणणारा सहस्त्ररश्मी क्षितिजाच्या किंचित वर लखलखत होता. आता खाली एक फक्त लखलखते आवरणच भासमान होत होते. सृष्टीचा हा अनावर पसारा सहज सावरत ही पृथ्वी विशिष्ट गतीने स्वत:भोवती तर फिरतेच पण हिरण्यगर्भाभोवती ठराविक मार्गाने, नेमक्या गतीने, अचूक कोन साधत प्रदक्षिणा पूर्ण करते. हे सर्व ईश्वराने वसविले आहे. ‘ईशावास्यम् इदं सर्वम्’ ईश्वराने पांघरलेले आवरण सुवर्णमय आहे. सुवर्णमय म्हणजे समोर दिसते आहे तसे चकाकणारे, दृष्टीला मोहात पाडणारे, मनाला लुब्ध करून गुंतवून ठेवणारे. हे वर्णन ईशोपनिषदाच्या मंत्र १ आणि मंत्र १५ मध्ये वाचले होते. विनोबांनी त्याचा केलेला मधुर अनुवाद आणि कृ.ह. देशपांडे यांनी त्यावर केलेले सरल भाष्य वाचले होते. त्याचा अर्थ क्षणभर जाणवला. त्यानंतर अनेकदा प्रवास केला पण ते दृश्य पुन्हा कधीही गवसले नाही. कवी केशवसुतांनी क्षणात नाहीसे होणारे, हातातून, शब्दातून आणि जाणिवेतून निसटून जाणाऱ्या दिव्य भासांनाच म्हणजे अशा अवचित प्रचिती देणाऱ्या अनुभवांनाच आपल्या काव्यातून अंकुरित केले असावे का?पाहाता पाहाता विमान उतरायला लागले. लांबवर अर्धगोल क्षितिज, कचकड्याच्या खेळण्यासारखे भासणारे आपले शहर आता घरासारखी घरे या स्वरूपात तनमनाला सुखवत होते. जमिनीवर उतरणेही खूप आपलेसे, आश्वासक वाटले.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे