शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पालकत्वाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 19:45 IST

- मिलिंद कुलकर्णीपार्टी विथ द डिफरन्स असा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे मंत्री चार वर्षात इतके बदलतील, असे वाटत नव्हते. जळगावचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील हे संवेदनशील मंत्री, नेते म्हणून ओळखले जातात. अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी जळगावात काही वर्षे कार्य केले असल्याने त्यांना जळगावविषयी आत्मियता आहे. परंतु त्यांच्या १३ ...

- मिलिंद कुलकर्णीपार्टी विथ द डिफरन्स असा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे मंत्री चार वर्षात इतके बदलतील, असे वाटत नव्हते. जळगावचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील हे संवेदनशील मंत्री, नेते म्हणून ओळखले जातात. अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी जळगावात काही वर्षे कार्य केले असल्याने त्यांना जळगावविषयी आत्मियता आहे. परंतु त्यांच्या १३ महिन्यांच्या कारकिर्दीत जळगावला फार काही मिळाले, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पूर्वीच्या काँग्रेस आघाडीच्या काळात मंजूर आणि सुरू झालेल्या प्रकल्पांची उद्घाटने करायलासुद्धा पालकमंत्र्यांना वेळ नाही, हे जळगावकर अनुभवत आहेत. वनविभागाच्या लांडोरखोरी उद्यानाचे उद्घाटन असेच दोन महिने रखडले होते. आता जळगावातील नाट्यगृहदेखील मंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहे. हे कौतुकसोहळे झाले. पण जळगावकरांच्या दु:खाशी, वेदनेशी समरस व्हायला, मंत्र्यांना वेळ नाही, हे दुर्दैव आहे. एकेकाळी पालकमंत्री असलेले प्रा.लक्ष्मणराव ढोबळे वाकडी येथे येऊन गेले. पण पाटील हे जळगावात येऊन वाकडीला गेले नाही. ज्या खात्याचा कारभार तात्पुरत्या स्वरूपात ते बघत आहेत, त्या कृषी खात्याशी निगडित रावेर तालुक्यातील ५१ गावांमधील दोन हजार हेक्टरवरील केळी तीन दिवसांच्या वादळाने भूईसपाट झाली. रावेरला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील शहापूर तालुक्यात याच काळात केळीचे नुकसान झाले. त्याठिकाणी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान स्वत: येऊन गेले आणि त्यांनी ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांना प्रती हेक्टरी १ लाख रुपये भरपाई, खत व बियाण्यांसाठी बिनव्याजी कर्ज, बँकेच्या कर्जावरील व्याजमाफी, ३१ डिसेंबरपर्यंतचे वीज बिल सरकार भरणार अशा जागेवरच घोषणा केल्या. मात्र रावेरच्या शेतकºयांच्या नुकसानीचा अद्याप पंचनामा बाकी आहे. पाटील यांच्याकडे महसूल खाते आहे, त्यांनी केवळ लवकर पंचनामे पूर्ण करा, असे निवेदन जारी करून कर्तव्यपूर्ती केली. विशेष म्हणजे याच काळात पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत नियुक्त मंत्री गटाचे सदस्य होते. दुसरे सदस्य जळगावकर गिरीश महाजन हे होते. त्यांनी चौहान यांच्यासारखी भूमिका घेऊन शेतकरीहिताचा निर्णय घेऊ शकले असते. पण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगितले जात असेल तर अमळनेरात पाटील यांनी तर आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या पाटील यांनी संस्थाचालकांची बैठक घेतली. भाजपा उमेदवाराला समर्थन देण्याचे आवाहन केले. या वेळी काही संस्थाचालकांनी व्यथा मांडली, कर्मचारी भरतीचे आमचे अधिकार सरकारने काढले आहेत. मात्र पाटील प्रत्युत्तर देताना म्हणाले, असा कोणताही निर्णय झाला नाही, आणि मी अजून सहा तास मुख्यमंत्री आहे, त्यामुळे असा निर्णय होऊही देणार नाही. ही तत्परता वाकडी आणि रावेरच्या केळी उत्पादकांविषयी का दाखविली नाही, हा प्रश्न आहेच.