शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या शेजाऱ्यांशी संबंध हे विदेश नीतीचे अपयश

By admin | Updated: May 12, 2015 23:56 IST

२०११ साली प्रकाशित ‘द ट्रिस्ट बिट्रेड : रिफ्लेक्शन आॅन डिप्लोमसी अ‍ॅॅन्ड डेव्हलपमेंट’ या पुस्तकात लेखक जगत मेहता यांनी असा युक्तिवाद केला आहे की,

रामचन्द्र गुहा(इतिहास संशोधक आणि भाष्यकार)२०११ साली प्रकाशित ‘द ट्रिस्ट बिट्रेड : रिफ्लेक्शन आॅन डिप्लोमसी अ‍ॅॅन्ड डेव्हलपमेंट’ या पुस्तकात लेखक जगत मेहता यांनी असा युक्तिवाद केला आहे की, ‘साधर्म्य नसलेल्या शेजारी राष्ट्रांशी मुत्सद्देगिरी ही विसाव्या शतकातील एक अत्यंत अवघड बाब राहील हे नेहरू पूर्णपणे ओळखू शकले नाहीत आणि विदेश मंत्रालयसुद्धा त्यांना तसा सल्ला देऊ शकले नाही’. भारत आणि नेपाळदरम्यान झालेल्या स्थायी आणि हितकारक परस्पर निर्भरतेच्या संबंधावरील अपव्ययाएवढे मोठे उदाहरण इतिहासात दुसरे कुठलेच नाही, असेही ते म्हणतात.मेहतांचे हे शब्द आठवण्यामागचे कारण आहे, नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या भयंकर भूकंपानंतर भारताने दिलेला शीघ्र प्रतिसाद. आपल्या सरकारने तातडीने मदतकार्यासाठी तुकड्या पाठवणे कौतुकास्पद होते, पण नेपाळी पंतप्रधानांना आपण केलेल्या ट्विटवरूनच त्यांच्या देशातील भूकंपाचे वर्तमान कळले, अशी जाहीर बढाई मारून नरेन्द्र मोदी यांनी या कार्याला बट्टा लावला. (त्यांचे कथन खरे असले तरी, सभ्यता आणि राजनैतिक हितसंबंध याचा विचार करता, त्यांनी ही बाब खासगीतच ठेवायला हवी होती.)पण याहूनही वाईट होते, भारतातील हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे मती कुंठित करून सोडणारे व दृश्यातिरेकी वार्तांकन. काठमांडूतील संपादक कनकमणी दीक्षित यांनी तर बीबीसीला चक्क सांगूनच टाकले की, ‘कर्कशपणा, कथित राष्ट्रभक्ती, अतिशयोक्ती, उद्धटपणा आणि काही वेळा चुकीच्या वृत्तांकनामुळे इथली जनता प्रचंड चिडली आहे’. दुसऱ्या एका टीकाकाराने तर असे मत नोंदवले की, सुदैवाने सलमान खान प्रकरणाने भारतीय माध्यमांना त्यांचे लक्ष इथून हटविणे भाग पाडले आहे. अर्थात भारताची नेपाळविषयक अरेरावी जुनीच आहे. त्या देशातील लोकशाहीवादी नेते बी.पी.कोईराला यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख सापडतो. कोईराला यांनी तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन नंतर स्वत:च्या देशात हुकुमशाहीविरुद्ध लढा उभारला होता. महात्मा गांधी त्यांच्यासाठी सदैव वंद्य राहिले, तर जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया आणि जवाहरलाल नेहरू त्यांचे जवळचे मित्र होते. १९४७ साली हद्दपारी झालेली असतानाही त्यांनी नेपाळ नॅशनल कॉँग्रेसची स्थापना केली. या पक्षाचे साधर्म्य भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसशी होते. अथक प्रयत्नानंतर १९५९ साली कोईराला आणि त्यांच्या पक्षाने तिथल्या राजाला देशातली पहिली लोकशाही तत्त्वावरची सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी भाग पाडले. या निवडणुकीत त्यांचा पक्ष बहुमताने जिंकला आणि पंतप्रधानपदाची धुरा कोईराला यांच्या हाती आली. व्यक्तिगत आणि राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता, त्यांचा कल भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याकडे होता. पण भारताने त्याला कधीच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आपल्या ‘आत्मब्रितांत’ या आत्मवृत्तात कोईराला यांनी असे लिहून ठेवले आहे की, त्यांच्या विरोधात तेव्हा तीन घटक कार्यरत होते. त्यातील दोन घटक म्हणजे, नेपाळातील राजघराणे आणि तेथील अभिजनवर्ग. तिसरा घटक म्हणजे भारतीय संघराज्य व त्याचे प्रतिनिधी.१९४० साली नेहरू आणि कोईराला यांनी ब्रिटिशांविरुद्ध एकत्र लढा दिला होता व ते एकत्रच तुरुंगात गेले होते. पण पंधरा वर्षांनंतर नेहरू सरकारची अशी इच्छा होती की, नेपाळने आपणहून कोणतेही निर्णय न घेता भारताच्या सूचनांचे पालन करावे. भारतीय राजदूत तेव्हा स्वत:ला तिथले राजकीय पूर्णाधिकारी मानीत व आपण नेपाळच्या राजापेक्षाही श्रेष्ठ आहोत असा त्यांचा समज होता. एक राजदूत तर इतका उद्दाम आणि अरेरावीने वागणारा होता की, त्याची जाहीर तक्रार करताना कोईराला यांनी असे म्हटले होते की, भारतीय राजदूताला आमचा देश म्हणजे जिल्हा बोर्ड वाटते व तो स्वत:ला या बोर्डाचा अध्यक्ष मानतो.भारताचे दोन अवघड शेजारी आहेत, चीन आणि पाकिस्तान. दोघांसोबत भारताचे संबंध तणावाचेच राहिले आहेत. चीनला मॅकमोहन सीमारेषा अमान्य, कारण त्यांच्या मते ती ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी लादलेली आहे. काश्मीरवर भारत आणि पाकिस्तान दोघांचाही दावा आहे. चीनची भारतासोबतची स्पर्धा आशिया आणि जगभरात आपला प्र्रभाव वाढवण्याच्या संदर्भात आहे तर पाकिस्तानला १९७१ साली झालेल्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. श्रीलंकेत इंदिरा गांधी आणि एम.जी.रामचंद्रन यांनी गुप्तपणे लिबरेशन टायगर आॅफ तामिळ इलमला सामरिक सहाय्य दिले आणि त्यानंतर राजीव गांधी यांनी हेकटपणा दाखवत तामीळ वाघांना शांत करण्यासाठी भारतीय लष्कर पाठवले. भारताच्या या कृतीने सिंहली आणि तामीळ दोघे समुदाय त्याच्या विरोधात गेले व याचमुळे सिंहली लोक चीनकडून साह्याचा शोध घेत होते आणि तामीळ वाघांच्या मनात संताप धुमसत होता. नेपाळप्रमाणेच श्रीलंकेतही आपल्या राजदूतांनी (सगळ्याच नाही) त्यांचे वागणे व्हाईसरॉय असल्याप्रमाणे ठेवले आहे.बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्रच भारताच्या मदतीने आणि हस्तक्षेपाने निर्माण झाले. १९७० साली भारताने ९० लक्ष बांगलादेशी निर्वासितांना अभय दिले. त्याच्या नंतरच्या वर्षी भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला. असे असूनही भारताने ही पत जास्त दिवस सांभाळली नाही, कारण अल्पावधीतच पश्चिम बंगालच्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने बांगलादेशसमोर पाण्याचा वाद उभा केला. भारताने तेव्हा अवामी लीगला पाठबळ देऊन बांगलादेशातल्या इतर महत्त्वाच्या राजकीय घटकांचा राग ओढवून घेतला.कोईराला आपल्या आत्मचरित्रात लिहितात, ‘ते (भारतीय) विशुद्ध मुत्सद्देगिरी समजू शकले नाहीत’ तर जगत मेहता लिहितात, ‘भारताचे त्याच्या छोट्या शेजारी राष्ट्रांसोबतचे संबंध हे त्याच्या विदेश धोरणाचे मोठे अपयश आहे’. या दोन मतांमधील एक भारताच्या जुन्या मित्राचे तर दुसरे भारतीय राजदूत म्हणून सेवा निभावलेल्या व माजी विदेश सचिव म्हणून काम पाहिलेल्या व्यक्तीचे. दोन्ही सत्यच आहेत. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी, पंतप्रधानांचे ट्विट, खाद्यपदार्थ आणि घरउभारणी साहित्याने भरलेली विमाने, यापेक्षा ही मतेच महत्त्वाची ठरणार आहेत.