शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

चाचपडणारी शेती

By admin | Updated: August 17, 2016 00:03 IST

औरंगाबाद वगळता मराठवाड्यात नाव घ्यावी अशी औद्योगिक वसाहत नाही. दोन कोटी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे आणि इकडे सततच्या दुष्काळाने शेती मोडून पडली.

औरंगाबाद वगळता मराठवाड्यात नाव घ्यावी अशी औद्योगिक वसाहत नाही. दोन कोटी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे आणि इकडे सततच्या दुष्काळाने शेती मोडून पडली. याच शेतीला उभारी देण्यासाठी परवा औरंगाबादेत शेतीसमोरील आव्हानांवर सांगोपांग चर्चा करण्यासाठी एक परिषद झाली. राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी उद्घाटन केले. अधिकारी, तज्ज्ञ, शेतकरी असा सर्वांचा सहभाग त्यात होता आणि त्यातून शेतीला मार्ग दाखविता येईल का, कृषी अर्थव्यवस्था मोडकळीस येण्याची कारणे कोणती, यावर सांगोपांग ऊहापोह झाला. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी यासाठी पुढाकार घेतला. शेती विषयातील तज्ज्ञ, कृषी आयुक्त म्हणून गाठीस असलेला अनुभव आणि मराठवाड्याचे रहिवासी त्यामुळे या प्रश्नाकडे पोटतिडकीने लक्ष देणे साहजिक होते. या परिषदेच्या आयोजनातील हेतूबद्दल अनेक तर्कवितर्क होत असले तरी, महत्त्वाचा विषय त्यांनी योग्य वेळी ऐरणीवर घेतला, हे महत्त्वाचे. मराठवाड्यातील शेतीसमोरील आव्हाने यांचा विचार करताना आपण भूतकाळात कोणत्या चुका केल्या, वर्तमान काळाशी जुळवून घेण्यात का कमी पडलो, की मार्गदर्शनाचा अभाव या सर्व गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. मराठवाड्यातील एकूण जमीन ६० लाख एकरात वन, पडीक जमिनींचाही समावेश. दोन कोटी लोकांचे जीवनमान या क्षेत्रावर अवलंबून आहे. या जमिनीचे ४० लाख खातेदार. म्हणजे सरासरी साडेतीन एकर जमीन प्रत्येकाच्या नावावर. याचा अर्थ अल्प भूधारकांची संख्या मोठी. जमिनीची वाटणी होत जमीन धारणा कमी झाली, याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला. कारण कमी जमीन कसायला परवडत नाही. दुसरी गोष्ट शेतीला मारक ठरली ती पशुधन. मराठवाड्यातील पशुधन २५ वर्षांत १५ लाखांनी घटले. याची वेगवेगळी कारणे असली तरी त्याचा परिणाम शेतीवर झाला. कारण कमी जमिनीत जनावरे सांभाळणे शक्य नसल्याने त्यांना बाजाराचा रस्ता दाखवला गेला आणि त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला. मराठवाड्यात गेल्या २० वर्षांत बदललेली पीक पद्धती हेसुद्धा नुकसानीतील शेतीचे कारण आहे. मराठवाड्याचे पर्जन्यमान साधारण, त्यामुळे बहुतांश क्षेत्र कोरडवाहू, त्यानुसार ज्वारी, बाजरी, करडईसारख्या कोरडवाहू पिकांचे क्षेत्र; पण काही वर्षांत पीक पद्धती बदलली. कापसाचे क्षेत्र वाढले. सोयाबीन, मक्याचा प्रसार झाला आणि पारंपरिक पिके बाजूला पडली. फळबागांच्या क्षेत्रात आंबा, मोसंबी वाढली म्हणजे पाण्याची गरज वाढली. ऊसामुळे साखर कारखाने वाढले. एकूणच पाण्याचा वापर वाढला आणि पाणी कमी पडत चालले. याचाही परिणाम शेतीवर झाला. फळबागांना प्राधान्य देताना आंबा, बिबा, बोर, कवठ, चारोळी ही कमी पाण्याची झाडे बाजूला पडली. कढीपाला, शेवगा यासारख्या पाण्याची गरज असलेल्या पिकांना प्रोत्साहन मिळाले नाही. चक्रधर स्वामींनी औरंगाबाद जिल्ह्यात आमराया उभ्या केल्या. पुढे मोगलांनी ही परंपरा चालू ठेवली. ही फळबागच कोरडवाहू. ७०० वर्षांपूर्वी येथे रेशीम उद्योग होता. ते येथून निर्यात व्हायचे. रेशमासाठी लागणाऱ्या तुतीलाही कमी पाणी लागते. ऊसाव्यतिरिक्त एकाही शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग मराठवाड्यात नाही. मका, सोयाबीनचे उत्पादन वाढले; पण प्रक्रिया उद्योग सुरू केले नाही, त्यामुळेही शेती आणि शेतकरी दोघांचेही नुकसान होत आहे. परभणीचे कृषी विद्यापीठ ७२ च्या विकास आंदोलनानंतर मिळाले; पण ३५ वर्षांत या विद्यापीठाने मराठवाड्यासाठी शेतीचे मॉडेल तयार केले नाही. विद्यापीठाजवळ थोडीथोडकी नव्हे, तर १० हजार एकर जमीन आहे. त्याचा उपयोग केला नाही. आकडेवारी, स्लाईडस्, शोधनिबंधातच विद्यापीठ अडकले, हे सुद्धा शेतीच्या पीछेहाटीचे कारण आहे. - सुधीर महाजन