शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शिवजयंती राष्ट्रोत्सव होण्याच्या दिशेने पहिले पाऊल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 03:57 IST

शिवजयंती राष्टÑोत्सव बनविण्याचे शिवधनुष्य कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा प्रथमच राजधानी नवी दिल्लीत शिवजयंती भव्य प्रमाणात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली

शिवजयंती राष्टÑोत्सव बनविण्याचे शिवधनुष्य कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा प्रथमच राजधानी नवी दिल्लीत शिवजयंती भव्य प्रमाणात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. शिवरायांच्या विचारांचा जागर यानिमित्ताने घालण्यात आला.तमाम महाराष्ट्राचे दैवत आणि स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी नवी दिल्लीत प्रथमच भव्य प्रमाणात साजरी झालीे. ‘जय जिजाऊ, जय शिवाजी’च्या गजराने आसमंत दुमदुमला. या शिवजयंती सोहळ्यात महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानसह देशभरातून हजारो शिवभक्त उपस्थित राहिले. राज्यसभा सदस्य कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्या पुढाकाराने झालेला हा शिवजयंती सोहळा म्हणजे शिवजयंतीला राष्ट्रोत्सव बनविण्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नाचाच हा एक भाग होता.शिवराज्याभिषेक समितीच्या माध्यमातून रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला खासदार संभाजीराजे यांनी लोकोत्सवाचे स्वरूप दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच भाजपाकडून त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर घेण्यात आले. याशिवाय महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि विकास करण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. शिवरायांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार देशभरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावा,यासाठी संभाजीराजे प्रयत्नशील आहेत. यंदाची शिवजयंती दिल्लीत भव्य प्रमाणात साजरी करण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले होते. त्यासाठी त्यांनी सर्व पातळ्यांवर नियोजन केले होते. या सोहळ्यासाठी कोल्हापुरातील शिवभक्त विशेष रेल्वेने नवी दिल्लीला गेले आहेत. महाराष्टÑ सदनातील शिवजन्मकाळ आणि शाहिरी कार्यक्रमाने या सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर राजपथावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत पुण्याचे ३०० कलाकारांचे ढोल पथक, ६० कलाकारांचे ध्वज पथक, १२ कलाकारांचे तुतारी पथक, २०० जणांची वारकरी दिंडी, ७० कलाकारांचे लेझीम पथक, १२ जणांचे हलगी पथक, २० जणांचे शाहिरी पथक, ८० जणांचे मर्दानी खेळ, २५ जणांचे मल्लखांब पथक, ५० जणांचे धनगरी ढोल पथक सहभागी झाले होते. याशिवाय पूर्वोत्तर राज्यांतील लोककलाकार पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. या सर्व पथकांतील कलाकार आणि खेळाडूंनी सादर केलेला कलाविष्कार आणि कसरतींनी दिल्लीकरांना महाराष्टÑातील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविले.सायंकाळी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर आधारित ‘शिवगर्जना’ या महानाट्याचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग सादर झाला. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत लिखित या महानाट्याचे प्रयोग जम्मू-काश्मीर, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्रात झालेले आहेत. हाच प्रयोग आज, मंगळवारी पुन्हा एकदा सादर केला जाणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची छायाचित्रे व ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन, माहितीपटाचे सादरीकरण, रक्तदान शिबिर यासारख्या कार्यक्रमांना दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला चार चॉँद लागले.शिवजयंती महाराष्ट्रासह काही राज्यांत मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. शिवरायांच्या विचारांचा जागर यानिमित्ताने केला जातो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील एक राजे असे चित्र देशभर आहे. खरे तर त्यांचे विचार आणि कर्तृत्व भारतानेच नव्हे, तर जगानेही आचरणात आणावे असे आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आता ते राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात पोहोचले आहे. हळूहळू ते देशभर पोहोचावेत आणि शिवजयंती राष्ट्रोत्सव म्हणून केंद्र सरकारने जाहीर करावा.- चंद्रकांत कित्तुरे

chandrakant.kitture@lokmat.comX 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज