शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे ईव्हीएमच दगाबाज !

By सचिन जवळकोटे | Updated: May 17, 2018 09:44 IST

​​​​​​​जगापासून संपर्क तुटलेली दुर्गम वस्ती म्हणजे डोंगरकपारीतली इरसालवाडी. अशा या वाडीत भलतंंच आक्रित घडलेलं. वस्तीमागच्या दाट जंगलात एक विचित्र वस्तू भावड्याला सापडलेली. छोट्याशा सुटकेसच्या आकाराचं कसलं तरी यंत्र घेऊन भावड्या पाराजवळ आला, तेव्हा तिथल्या रिकामटेकड्या कंपूला नवा विषय मिळाला.

- सचिन जवळकोटजगापासून संपर्क तुटलेली दुर्गम वस्ती म्हणजे डोंगरकपारीतली इरसालवाडी. अशा या वाडीत भलतंंच आक्रित घडलेलं. वस्तीमागच्या दाट जंगलात एक विचित्र वस्तू भावड्याला सापडलेली. छोट्याशा सुटकेसच्या आकाराचं कसलं तरी यंत्र घेऊन भावड्या पाराजवळ आला, तेव्हा तिथल्या रिकामटेकड्या कंपूला नवा विषय मिळाला.‘आरं ये भावड्या ऽऽ कुठून उचलुनशान आन्लास रं हे डबडं?’ नाकातलं बोट गराऽऽ गरा फिरवत नाम्यानं विचारलं. तेव्हा भावड्या खेकसला, ‘जंगलातल्या चिखलामंदी गावली तसं घिवुनशान इकडं आलूया.’‘पन ही कोन्ची मशीन म्हनायची रं? रेडू तर नाय वाटत लगाऽऽ,’ कानातला मळ काढत ग्यानबानं अक्कल पाजळली. ‘पन बटणं-बिटणं हायती की हिला. छोटा टीवी तर नाय ना?’ गण्याही नवनवे शोध लावू लागला.एवढ्यात एकानं वरचं बटण दाबलं तसं यंत्रावर फुलाचं चित्र दिसू लागलं. दोघंजण घाबरून मागं सरकले... तर तिघंजण उत्सुकतेनं पुढे सरसावले. ‘आरं ऽऽ ह्यो तर कॅमेरा हाय वाटतं. बटण दाबलं की, समोरच्या धोतऱ्याच्या झाडावरचं फूल दिसतंया याच्यामंदी.’ भावड्याच्या डोक्यात नवा प्रकाश पडला. मात्र, किसन्याच्या डोक्यात वेगळीच वीज चमकली. ‘आरं खुळ्यांनुऽऽ ह्ये धोतºयाचं नाय.. कमळाचं फूल हाय कमळाचं.’कधीतरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आलेल्या अर्धशिक्षित सुभ्यानं मात्र पटकन ही वस्तू ओळखली. ‘ह्याला इलिक्शानचं होटिंग मशीन म्हंत्याती भावाऽऽ. इकडं बटण दाबलं की, तिकडं पीयेम् फिक्स. सीयेएमचं नावबी फायनल.’ तेव्हा भावड्याची छाती उगीचंच फुलून आली. ‘तरुणांनोऽऽ, देशाचं भवितव्य आता तुमच्याच हाती!’ असं कुणीतरी कधीतरी म्हटल्याचं त्याला आठवलं. त्यानं खाडकन दोन नंबरचं बटण दाबलं. मात्र, पुन्हा फुलाचंच चित्र झळकू लागलं.‘ह्ये कसलं इक्रित म्हणायचं गड्याऽऽ? पैलं बटण दाबलं, कमळ आलं. दुसरं बटण दाबलं, पुनांदा कमळच आलं.’ गण्या चित्कारताच नाम्यानं धडाऽऽधडा सर्व बटण दाबली..पण काय सांगावं? प्रत्येकवेळी कमळाचंच चिन्ह. हे पाहून चाँदचे डोळे विस्फारले, तर चंद्याचे डोळे लकाकले. सुभ्यानं खिशातला भजीचा पुडा उघडला. त्यातल्या कागदावरची बातमी त्यानं जोरात वाचून दाखविली. ‘कमळवाल्यांचा ईव्हीएम् घोटाळा. उद्धोंचा शोध. राजचा आरोप.’... ‘म्हंजी ह्ये मशीन गद्दार हाय तर?’ गण्यानं शंका व्यक्त केली, तेव्हा सुभ्यानं डोकं खाजवत अजून एक पिल्लू सोडलं, ‘काय सांगता येत नाय रं त्या कमळवाल्यांचं.. पन लगाऽऽ मशीनमंदी त्यांनी घोळ करूनशान ठिवला आसलं तर मग कर्नाटकामंदी त्यांना आठ आमदार का कमी पडल्याती? म्हंजी या मशीननं त्यांच्यासंगंबी गद्दारी केली म्हनायची की तिथं !’या प्रश्नावर सारेच डोके खाजवू लागले. कुणालाच उत्तर सापडलं नाही. असो, दोन दिवसांपासून या प्रश्नानं बंगलोर अन् दिल्लीतही अनेकांचं डोकं खाल्लंय. नेत्यांचा भेजा पार आऊट झालाय. कुणाकडं असेल याचं उत्तर.. तर त्यानं जाहीर करावं.( टीप : इरसालवाडीत सापडलेली हीवस्तू म्हणजे ‘लोटस’ कंपनीचं लहानमुलांचं खेळणं होतं. उगाच निवडणूक यंत्रणेचा तिसरा डोळा आम्हा पामरावर नको.)