शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

...कारण, सन्मानाने मरण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 04:49 IST

आपल्या देशात लोक मृत्यूचा विचार करण्यास धजावत नाहीत. कशाला हवा अशुभ विचार, हा नकारात्मक दृष्टिकोन बदलून आपण ‘लिव्हिंग विल’कडे वळले पाहिजे.

डॉ. गौरी करंदीकर, स्त्रीरोगतज्ज्ञ

मी केईएममध्ये शिकत असताना हाॅस्पिटलमधील एका वाॅर्डमध्ये अरुणा शानबाग होत्या. १९८३ मध्ये त्यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर त्या कोमामध्ये गेल्या. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत कित्येक वर्षं त्यांना ‘थिजलेल्या’ स्थितीत राहावं लागलं. अलीकडे ‘लिव्हिंग विल’ची (आपल्यावर वैद्यकीय उपचार कसे, कधीपर्यंत केले जावेत, ते कधी थांबवावेत याबाबतचं इच्छापत्र) चर्चा सुरू झाल्यावर मला त्या ‘थिजलेल्या आयुष्या’ची सतत आठवण येते आहे. २०१८ मध्ये आपल्या देशात या इच्छापत्राला मान्यता मिळाली असून, २०२३ मध्ये त्यात महत्त्वाचे बदल घडवून ती प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार होतो, जगण्याची शक्यता खूपच कमी किंबहुना नसते, अशा परिस्थितीत  पुढचे उपचार सीमित करून अगदी माफक प्रमाणात वापरण्याची संमती देणं, त्याबाबतच्या सूचना आपल्या जिवंतपणीच देऊन ठेवणं, म्हणजे ‘लिव्हिंग विल’. 

१८ वर्षांच्या वरील व्यक्तीला लिव्हिंग विल करता येतं. हे करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला आपण कशाला संमती देतोय,  पुढे याचं काय होणार आहे हे समजण्याची क्षमता असणं अपेक्षित आणि आवश्यक आहे. आजारी, शुद्ध हरपलेली व्यक्ती ‘लिव्हिंग विल’ करू शकत नाही. सुदृढ, शुद्धीत असलेल्या, भावनेच्या भरात न येता निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीने केलेलं ‘लिव्हिंग विल’ अधिकृत मानलं जातं. एकप्रकारे ही आपल्या विश्वासातल्या व्यक्तीला दिलेली ‘पॉवर ऑफ अटर्नी’च असते.  

माणसांना मृत्यूची भीती नसते. खरी धास्ती असते ती आपला शेवट कसा होईल, आपल्याला काय त्रास होईल, यातल्या अनिश्चिततेची. गंभीर आजारातून जाताना, जगण्याची शक्यता नसताना, उपचार कुठवर करत राहावे, याचा निर्णय घेण्याची जबाबदारी येऊन पडलेले आप्तेष्टही हतबल, असहाय्य होतात. अशा अवस्थेत जगणं त्या व्यक्तीला चाललं असतं की, आवडलं नसतं हे ठरवण्याबाबत त्यांच्यात संभ्रम असतो. ‘लिव्हिंग विल’मुळे नातेवाईकांवरचाही भावनिक ताण दूर होतो. शिवाय डाॅक्टरांनाही त्याची मदत होते.  व्यक्तीला  शारीरिकरित्या असाध्य आजार आहे, यात मृत्यू ओढवणं निश्चितच आहे, जगण्याची शक्यता शून्य आहे, अशा परिस्थितीत ‘लिव्हिंग विल’ अमलात येतं. पूर्ण उपचार लगेच थांबवले जात नाहीत. सक्रिय उपचार कमी केले जातात. ‘लिव्हिंग विल’ करणाऱ्या व्यक्तीला उपचार निवडीचं स्वातंत्र्य असतं. खूप त्रास होत असल्यास वेदनाशमन करणारी औषधं द्या,  ऑक्सिजन हवा असल्यास द्या, अशी निवड व्यक्ती करू शकते. 

‘युथनेशिया’ म्हणजे दयामरण. आपल्या देशात ‘ॲक्टिव्ह युथनेशिया’ला म्हणजे औषधं देऊन मृत्यू देण्याला मान्यता नाही. पण ‘पॅसिव्ह युथनेशिया’द्वारे रुग्णाचे सक्रिय उपचार बंद करून जगणं सुसह्य होईल एवढेच औषधोपचार दिले जातात. दयामरण आणि आत्महत्या या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ‘राइट टू डाय’ म्हणजे आत्महत्या नाही. आत्महत्या जगण्याला कंटाळून केली जाते. त्यामागे मानसिक, भावनिक समस्या असतात. ‘लिव्हिंग विल’ म्हणजे आत्महत्या नसून तो सन्मानाने मरण्याचा हक्क आहे. अर्थात, आपल्याला हवं तसं मरण याला मात्र ‘लिव्हिंग विल’मध्ये मान्यता नाही. डाॅक्टरांनाही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन यात काही करता येत नाही. व्यक्तीच्या जगण्याची शक्यता स्पष्ट दिसत असताना डाॅक्टरांना त्या व्यक्तीचे सक्रिय उपचार बंद करता येत नाहीत. सक्रिय उपचार थांबवण्याची स्थिती प्रमाणित होणंही गरजेचं असतं. यात व्यक्तीला उपचार नाकारले जात नाहीत. आजार अंतिम टप्प्यात आहे आणि जगण्याची कोणतीच आशा शिल्लक नाही, तेव्हाच ‘लिव्हिंग विल’ अमलात आणलं जातं. ‘लिव्हिंग विल’ प्रत्येकानेच करावं, कारण  सन्मानाने  मरण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. 

आपल्यासाठी निर्णय घेऊ शकतील अशा एक किंवा दोन व्यक्तींची नावं ‘लिव्हिंग विल’ करणाऱ्या व्यक्तीला द्यायची असतात. ही प्रक्रिया करताना दोन साक्षीदार लागतात. व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहे, हे सिद्ध करणारं डाॅक्टरांचं प्रमाणपत्र लागतं.  २०२३ नंतर या प्रक्रियेतील  सर्वोच्च न्यायालयाने याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘लिव्हिंग विल’ नोटरी करावं लागतं. प्रत्येक शहरात, जिल्ह्यात नेमलेले ‘कस्टोडियन’ आपली नोंद करून घेतात. नव्याने एक पोर्टल सुरू होणार आहे. ‘लिव्हिंग विल’ केलेल्या व्यक्तीने त्यावर ते अपलोड करायचं आहे. 

आपल्या देशात लोक मृत्यूचा विचार करण्यास धजावत नाहीत. कशाला करायचा असा अशुभ विचार, काय गरज आहे? - हा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी जनजागृतीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.  यासंदर्भात समुपदेशनासाठीचं पहिलं केंद्र मुंबईतील हिंदुजा हाॅस्पिटलमध्ये नुकतंच सुरू झालं आहे. आजारपणात रुग्णालयात दाखल होताना रुग्णाचा मेडिक्लेम आहे का? हे विचारलं जातं, तसं रुग्णाने ‘लिव्हिंग विल’ केलं आहे का? त्याचा नोंदणी क्रमांक काय? हेही विचारलं जाईल - अर्थात आपल्या देशात ही स्थिती यायला अजून बराचवेळ लागेल. त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.    khrc@hotmail.com

 

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीय