शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी संघटनांचा धाक संपला

By यदू जोशी | Updated: January 15, 2018 02:17 IST

राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले आणि सातव्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळत नसल्याचे आणि वारंवार मागणी करूनही पाच दिवसांचा आठवडा लागू होत

राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले आणि सातव्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळत नसल्याचे आणि वारंवार मागणी करूनही पाच दिवसांचा आठवडा लागू होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा असे लक्षात आले की सातवा वेतन आयोग देण्यासाठी राज्य सरकारने वर्षदीडवर्षांपूर्वी नेमलेल्या के.पी.बक्षी समितीने अद्याप आपले कामकाजच सुरू केलेले नाही. निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यासाठी नेमलेल्या खटुआ समितीने अहवाल तर तयार केला पण तो राज्य सरकारला सादर केलेला नाही. कर्मचारी, अधिकाºयांच्या संघटनांना सरकार किती गांभीर्याने घेते त्याचे हे लक्षण आहे.सातवा वेतन आयोग एप्रिल २०१७ पासून द्या, निवृत्तीचे वय ६० वर्षे करा, पाच दिवसांचा आठवडा करा, महिला कर्मचाºयांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा द्या आणि प्रशासनातील रिक्त १ लाख ९० हजार पदे भरा, अशा प्रमुख मागण्या आहेत. त्यांना आतापर्यंत सध्याच्या राज्य सरकारने वाटाण्याचा अक्षदा लावल्या आहेत. सरकारवर दडपण आणून मागण्या पदरी पाडून घेण्यासाठी आवश्यक असलेला धाक कमी झाल्याचे हे प्रतीक आहे. रिक्त पदे भरणे तर सोडाच उलट ३० टक्के पदे कमी करून नवा आकृतिबंध तयार करण्याचे आदेश प्रत्येक विभागाला देण्यात आले आहेत. राज्य शासनाची पावले कर्मचारी कपातीकडे पडत आहेत. साडेचार लाख कोटी रुपयांच्या कर्जाखाली दबलेल्या शासनाला त्यांच्या तिजोरीवर भार पडेल अशी कोणतीही मागणी मान्य करायची नाही. संघटनांची संघर्षाची धार बोथट होत झाली आहे. त्यामुळे आहेत ते प्रश्न तसेच राहत आहेत. खरेतर कोणत्याही राजकीय विचारांच्या खुंटीला न बांधून घेता महाराष्ट्रातील कर्मचारी,अधिकारी संघटनांनी आपले वेगळेपण आजवर जपले आहे. त्याबद्दल त्या प्रशंसेस पात्रच आहेत पण या संघटनांमध्ये आपसात एकवाक्यतेचा अभाव दिसतो. काही प्रमुख मागण्यांबाबतही त्यांच्यात मतभिन्नता आहे. ‘अधिकारी महासंघ स्वत:चे घोडे दामटतो. आपल्याला सोबत घेणे त्यांना कमीपणाचे वाटते’, अशी कर्मचारी संघटनांची अनेकदा भावना असते. ‘कर्मचारी संघटनांसारखी आततायी भूमिका अधिकाºयांच्या संघटनेला घेता येत नाही त्यामुळे बरेचदा भूमिकेवरून मतभेद होतात’, अशी अधिकारी महासंघाची भावना असते. संघटनांचा एकत्रित दबाव सरकारला घाबरवू शकेल पण तसे होत नाही. ‘पगारात भागवा’ अभियानाने नोकरशाहीतील भ्रष्टाचार कमी झाला वा संपला हे म्हणणे विनोदाचे ठरेल.नोकरशाहीचा भ्रष्टाचार आणि सामान्यांप्रतीची अनास्था यामुळे नोकरशाहीबद्दलची आस्था लोप पावतेय याचे आत्मचिंतन व्हावे. र.ग.कर्णिक हे राज्यातील कर्मचाºयांचे तर ग.दि.कुलथे हे अधिकाºयांचे आजही सर्वात मोठे नेते आहेत आणि त्या दोघांचेही योगदान नि:संशय मोठे आहे पण, दोघांनीही वयाची ऐंशी गाठली आहे. त्या तोडीचे नेतृत्व पुढे येताना दिसत नाही. आपल्यानंतरची नेतृत्वाची पिढी आपल्या हयातीत घडविण्याची जबाबदारी ही ज्येष्ठ नेत्यांची असते आणि त्यातून त्यांच्या नेतृत्वाला मोठेपणही प्राप्त होत असते. या मोठेपणाची दोघांकडून अपेक्षा आहे. इतर संघटनांमधील त्याच त्या नेत्यांनीही याचा विचार करायला हरकत नसावी. - यदु जोशी