शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

निवडणूक, युद्ध आणि..

By admin | Updated: October 29, 2014 23:36 IST

ताज्या विधानसभा निवडणुकीचं! शिवाय एकूणच खेळ किंवा स्पर्धात्मक क्रीडाप्रकारांचा विचार तर खूप पूर्वी एकदा थोडा कागदावरही उतरवला होता.

एक विचार बरेच दिवस मनात घोळत होता. तो अधिक स्पष्ट होण्यासाठी निमित्त झालं एका राष्ट्रीय पातळीवरच्या बुद्धिबळ स्पर्धेचं! त्यातही लागोपाठ झालेल्या लोकसभा आणि ताज्या विधानसभा निवडणुकीचं! शिवाय एकूणच खेळ किंवा स्पर्धात्मक क्रीडाप्रकारांचा विचार तर खूप पूर्वी एकदा थोडा कागदावरही उतरवला होता.
म्हणजे एकूण मास्तरकीचं (शिक्षकी पेशाचं) प्रशिक्षण घेण्याच्या काळात विद्याथ्र्याच्या मानसशास्त्रसंदर्भात तेव्हाच्या प्राध्यापकांनी सांगितलेला एक मुद्दा पुन्हा पुन्हा आठवावा असे अनुभव शिक्षणोतर राजकारणात (दुरूनच) अनुभवावे लागले. हल्ली तर एकूणच सामान्य माणूस राजकारणाविषयी (बोलण्यात तरी) अधिक सजग झालेला दिसतो. तर आधी विद्याथ्र्याच्या मानसशास्त्रसंदर्भातला मानसशास्त्रीय विचार असा, जे विद्यार्थी-विद्याíथनी 
अधिक बंडखोर, मारामा:या करणारे वगैरे उपद्रवकारक उद्योग करणारे असतील, त्यांना  क्रीडाशिक्षकांनी भरपूूर शारीरिक ऊर्जा खर्च होते अशा, कबड्डी, खो-खो, धावणो, क्रिकेट आदी खेळांत प्रोत्साहन द्यावे. शिवाय त्यातही बंडखोरी करणा:याकडे वर्गाचे-गटाचे नेतृत्व द्यावे. त्यामुळे होते काय की, त्याच्या ऊर्जेचा उपयोग मारामा:या करून उपद्रव देण्यात खर्च होणार नाही. उलट वर्गाला शिस्त लावण्यासारख्या विधायक कामाकडे त्याचा उपयोग होईल. आता अशी काही मंडळी अधिक दंगेखोर का असतात? तर त्याचे मानसशास्त्रीय कारण म्हणजे, त्यांची युद्धप्रवृत्ती अधिक प्रबळ असते.
माणसाच्या काही उपजत प्रवृत्ती असतात. त्या बहुधा शरीरधारणोशी संबंधित असतात. उदा. भूक, निद्रा, लैंगिकता, क्रीडा, तशी युद्ध ही एक उपजत प्रवृत्ती! अधिक असलेली शारीरिक ऊर्जा खर्च करणारी म्हणून शक्यतो सामूहिक, मैदानी क्रीडाप्रकारांकडे त्या वृत्तीचा विनियोग करण्यासाठी संधी द्यावी. म्हणजे उपद्रवकारक युद्धप्रवृत्तीची खुमखुमी विधायक कामाकडे वळते. ती उदात्तीकृत होते. ही उदात्तीकरणाची प्रवृत्ती प्रकृतीला संस्कृतीकडे नेऊ शकते; अन्यथा नुसत्याच मारामा:या केल्या तर ती विकृती होते.
मग युद्ध, मारामा:या, शारीरिक हिंसा या क्षेत्रतली परिभाषा अशा क्रीडाप्रकारात सर्रास वापरलेली दिसते. हुतुतू, कबड्डी, खो-खो अशा मैदानी देशी खेळांत ‘गडी मेला!’ (आऊट झाला.) प्रतिपक्षाचा ‘गडी मारला’ की आपल्या पक्षाचा गडी (खेळात तरी) ‘जिवंत’ होतो. संजीवनी मंत्रसारखा! धरणो, मारणो, बुकलणो, चितपट करणो ही भाषाच किती हिंसक आहे!
राजकारणात तरी दुसरे काय असते! निवडणूक काळातली वक्त्यांची भाषणो, नंतरच्या किंवा समांतर चालणा:या वृत्तपत्रीय टीका-टिपणीत तर ‘अमक्याने गड राखला, तमक्याचा धुव्वा उडाला, धूळदाण झाली, तोफा डागल्या, मुलुखमैदान (तोफ) उडाली, बालेकिल्ला राखला (किंवा पडला) ही परिभाषा तटस्थ वाचकांची करमणूकही करते आणि नेमके चित्रही उभे करते. व्यूहरचना (पक्षांची) ‘रणनीती’ ही तर चालतेच. आता असेच बुद्धिबळाच्या पटाकडे जाऊ. तेथे तर शह, मात, कोट करणो, आधी ‘प्यादी’ (पायदळ) मारण्यासाठी आणि राजाच्या रक्षणासाठी पुढे करणो. मग क्रमाने सगळे चौरंगी दळ (सैन्य) घोडदळ, उंटदळ, हत्तीदळ त्यांच्या त्यांच्या चालीने (अडीच घर, तिरके, सरळ) राजाच्या रक्षणार्थ झुंजवणो, मग वजीर, प्रधान आहेतच. त्यातही ही ‘व्यूहरचना’, ‘रणनीती’ भविष्याचा अंदाज घेत करीत राहणो, त्यासाठी बुद्धिबळ (पुन्हा बळ) खर्च करणो. प्रतिपक्षाची ही सगळी प्यादी, दळे ‘मारणो’ महत्त्वाचे! मग उरेल तो ‘जितम् मया’ म्हणून विजयी होतो. प्रतिपक्षाला खेळात काय, युद्धात काय, की राजकारणात काय, शह देणो, त्याच्यावर मात करणो ही ‘रणनीती’ खेळणाराच विजयी होतो.
मग युद्ध खेळले जाते आणि खेळाचे युद्ध होते. राजकारणात तर दोन्हींचा समसमासंयोग होतो असे वाटते.
पण.. पण हे सगळे जर उदात्तीकृत संस्कृतीकरणाच्या दिशेने गेले, तरच ती क्रीडा! राजकारणही! अन्यथा विनाशक, हिंसक विकृतीतून अटळपणो विनाशाचीच वाट प्रशस्त होणार!
 
तारा भवाळकर