शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

इलेक्शन वर्ष आहे, निघून ये...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 3:04 AM

प्रिय विजय मल्ल्या ,स.न.वि.वि.त्या दिवशी पेपरात बातमी वाचली, तू मायदेशी परतण्यास इच्छुक आहे. ‘सुबह का भुला शाम को घर आया’ म्हणून ऊर अभिमानाने भरून आला. छाती ५६ इंचाच्या वर गेली. अगदी राहवलं नाही म्हणून लगेच पत्र लिहायला घेतलं. आधी मोबाईलवरूनच काँग्रॅज्युलेशन करायचे होते पण, तुझा फोन सारखा नॉट रिचेबल येत ...

प्रिय विजय मल्ल्या,स.न.वि.वि.त्या दिवशी पेपरात बातमी वाचली, तू मायदेशी परतण्यास इच्छुक आहे. ‘सुबह का भुला शाम को घर आया’ म्हणून ऊर अभिमानाने भरून आला. छाती ५६ इंचाच्या वर गेली. अगदी राहवलं नाही म्हणून लगेच पत्र लिहायला घेतलं. आधी मोबाईलवरूनच काँग्रॅज्युलेशन करायचे होते पण, तुझा फोन सारखा नॉट रिचेबल येत होता. म्हटलं अख्ख्या भारत सरकारला तू नॉट रिचेबल असताना म्या पामराला कसा उपलब्ध होशील. मग पत्रच लिहायला घेतले.आता तू येणार म्हटल्यावर आमच्या समस्त बँकवाल्यांचा जीव कसा भांड्यात पडला बघ! पडणार का नाही...! साधी रक्कम नव्हे तर ९००० कोटी डावावर लागले आहेत त्यांचे. मोदी साहेबांचे तर विचारूच नका...! कितीतरी दिवसांनी त्यांना अशी आनंदाची बातमी वाचायला मिळाली. २०१९ चे निवडणूक वर्ष तोंडावर आहे. काळा पैसा बाहेर काढू, पळून गेलेल्यांच्या मुसक्या बांधून हजर करू अशा घोषणा गेल्या चार वर्षांपासून करत होते, पण हाती काहीच आले नाही. भारतात पब्लिकमध्ये तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती. (लोकं मात्र उगाच त्यांच्या वारंवार विदेशात जाण्याला नावे ठेवतात.) आता तू येणार म्हटल्यावर त्यांना अर्धी निवडणूक आत्ताच जिंकल्यासारखे वाटत आहे. या ‘पोस्टर बॉय’ ला कुठे ठेवू, कुठे नको असे झाले आहे बघ! देवेंद्रभाऊंना लगेच सूचना देऊन त्यांनी आर्थर रोड जेलमधील बराक नंबर १२ सर्व सोर्इंनी सज्ज ठेवायला सांगितली. खोलीत भरपूर सूर्यप्रकाश येईल, फ्रेश हवा खेळत राहील, मऊ बिछाना, पाश्चात्त्य पद्धतीचे टॉयलेट अशा सर्व सोई त्यांनी करून घेतल्या आहेत. मोदी साहेबांचे स्वच्छता मिशन कितीतरी दिवस त्यासाठी राबत होते म्हणे... या व्यवस्थेचे खास शुटिंग करून (यासाठी बॉलिवूडमधील काही चित्रपट निर्मात्यांची मदत घेतल्याचीही चर्चा आहे.) त्याचे फोटोग्राफ्स तुला आणि लंडनमधील तुझ्या त्या वकिलालाही पाठविले आहेत. तू मात्र विनाकारण या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावलेस. म्हणे फोटोग्राफ्स बनावट आहेत. आर्थरमधले वातावरण हायजिनिक नाही. आम्ही भारतीय येथे कोणत्या कचराकुंडीत राहतो याची तुला कल्पना नाही. आमची अनेक शहरे नुसती डम्पिंग यार्ड झाली आहेत.बरं ते जाऊ दे. तुला या व्यवस्थेत आणखी काय काय सुधारणा पाहिजेत हे कळव म्हणजे त्या करून घेता येतील. आधी तू भारतात येणे महत्त्वाचे आहे. ‘बघा मी कसा मल्ल्याला भारतात खेचून आणला’ किमान एवढे तरी मोदी साहेबांना आपल्या प्रचार सभेत सांगता येईल. बाकी मुद्दे तर घासूनघासून गुळगुळीत झाले आहेत.आणि हो...एक सांगायचे राहूनच गेले... तू आणि तुझ्यासाखेच ललित, नीरव (हेही मोदीच बरं का!) यांना भारतात आणण्यासाठी सरकारने मोठी शक्कल लढविली आहे. इलेक्शन फंडासाठी तुमच्यासारख्यापुढे हात पसरविण्यापेक्षा त्यांनी निवडणूक रोखे योजनाच आणली. यात तुम्ही वेगवेगळ्या पक्षाच्या नावाने बॉण्ड घ्यायचे म्हणजेच त्यांना दक्षिणा द्यायची आणि आपला उल्लू सिधा करून घ्यायचा. बघ पटतं का...? सरळ भारतात ये...बीजेपीच्या नावाने हजार बाराशे कोटींचे बॉण्ड घेऊन टाक म्हणजे पुढचे काम सोप्पे. तर निघ लवकर, ‘बराक नंबर 12’ इज वेटिंग 4 यू...!

(तिरकस)

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या