शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

ज्येष्ठता महत्त्वाची की योग्यता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 00:11 IST

शाळेतून आल्यापासून मोरू गप्प-गप्प होता. कोणाशी बोलला नाही, की ग्राउंडवर खेळायला गेला नाही.

- नंदकिशोर पाटीलशाळेतून आल्यापासून मोरू गप्प-गप्प होता. कोणाशी बोलला नाही, की ग्राउंडवर खेळायला गेला नाही. बेडरुमचं दार बंद करून बसला होता. आईनं हाका मारल्या तरी त्यानं प्रतिसाद दिला नाही. मोरूचं आज कोणाशी तरी बिनसलं असावं, म्हणून नेहमीप्रमाणे ती कामाला लागली. दिवेलागणीची वेळ होताच शाखेत गेलेले आजोबा आणि आॅफिसात गेलेले मोरूचे बाबा घरी परतले. नेहमीप्रमाणे सर्वजण संध्या करायला एकत्र बसले. मोरू दिसत नाही, म्हणून आजोबांनी चौकशी केली. मोरुची आई म्हणाली, ‘शाळेतून आल्यापासून तो दार बंद करून बसलाय.’ आजोबांनी दाराला थापा मारून मोरुला आवाज दिला. आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. सगळेच काळजीत पडले. मोरुच्या बाबानं युक्ती काढली. ‘तुला नवीन मोबाईला आणला आहे, बाहेर ये’ असा मेसेज पाठविला आहे. युक्ती फळाला आली. मोरू तात्काळ बाहेर आला. ‘कुठंय मोबाईल?’ मोरुनं विचारलं तसं सगळे हसू लागले. मोरू चिडला. ‘बेटा, आमिषाला बळी पडू नये हा धडा आज तुला मिळाला’ बाबांनी त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. आजोबांनी त्याला जवळ घेत विचारलं, ‘बेटा तू नाराज दिसतोयंस. शाळेत काही झालंय का?’ त्यावर तो म्हणाला, ‘माझा हक्क डावलण्यात आलाय. मी वर्गात सर्वांत सिनिअर असताना क्लास टिचरनी मला मॉनिटर केलं नाही!’ मोरुच्या नाराजीचं कारण कळल्यानंतर पुन्हा सगळ्यांना हसू आवरेना. आजोबा म्हणाले, ‘अरे मोरू, वर्गात तर सगळे विद्यार्थी एकसमान असतात. मग तू एकटाच कसा सिनिअर?’ त्यावर मोरुनं खुलासा केला. ‘आजोबा, दहावीचं हे माझं तिसरं वर्ष आहे. या अर्थी मी नुसता सिनिअरच नाही तर अनुभवी देखील आहे!’. मोरुचा तर्क भन्नाटच होता. ‘मॉनिटर होण्यासाठी ही सिनिअ‍ॅरिटी काही कामाची नसते’ आईनं मध्येच वाक्य फेकलं. ‘हो, अगदी बरोबर. मॉनिटर होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. हुशार विद्यार्थ्यालाच हल्ली तो मान मिळतो. तुझ्यासारख्या रिपीटरला नाही!’ बाबांनी संधी साधली. पण मॉनिटर या विषयावर मोरुचं होमवर्क पक्कं होतं.तो म्हणाला, ‘मग बाबा तुमच्या या नियमानं अनुभवी लोकांना कुणीच विचारणार नाही. नोकरीसाठी अनुभव प्रमाणपत्र का मागतात? ज्येष्ठांचा मान राखला पाहिजे असे का म्हटले जाते? आपल्या घरात आजोबांना आपण का मान देतो?’ मोरुची प्रश्नावली मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबतच गेली. मग आजोबांनी त्याला ‘ज्येष्ठता’ आणि ‘योग्यता’ यातील फरक समजून सांगितला. ते म्हणाले, ‘अरे बाळ, मॉनिटर होणं म्हणजे, वर्गाचं नेतृत्व करणं होय. नेतृत्वासाठी अनुभवापेक्षाही योग्यता महत्त्वाची असते.’ पण आजोबांचे हे स्पष्टीकरण मोरुच्या डोक्यावरून गेले. मोरुनं विचारलं ‘उदाहरणार्थ?’ त्यावर आजोबा म्हणाले, ‘हे बघ. आडवाणी अंकल, सुषमा आँटी हे वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असताना त्यांना डावलून नरेंद्र अंकल पीएम बनले की नाही!’ आजोबांचे हे सोदाहरण स्पष्टीकरण ऐकल्यानंतर मोरुनं टेबलावर पडलेलं वर्तमानपत्र उघडलं आणि आतील पानावर छापून आलेली ‘मी अनुभवाने आणि वयाने ज्येष्ठ असताना मला सीएम पदासाठी डावलण्यात आलं’-खडसेंची नाराजी!’ ही बातमी मोठ्यानं वाचली. त्यावर आजोबांनी पुन्हा तोच खुलासा केला. ‘नेतृत्वासाठी ज्येष्ठत्वापेक्षा कर्तृत्व महत्वाचं असतं!

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे