शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

ईल आय & फिंगर अटॅक

By सचिन जवळकोटे | Updated: April 19, 2018 02:55 IST

वैद्यक शास्त्राच्या इतिहासात प्रथमच असा बाका प्रसंग उभा ठाकला होता. जगातले अनेक नामवंत डॉक्टर भारतात एकत्र जमले होते. एका मोठ्या हॉस्पिटलच्या आॅपरेशन थिएटरमध्ये हे सारे गोल करून उभे होते. या डॉक्टरांसमोर इरसालवाडीचा एक तरुण रुग्ण गंभीर अवस्थेत ठेवण्यात आला होता. साऱ्यांचं लक्ष त्याच्यावरच !गेल्या काही दिवसांपासून म्हणे या रुग्णाला असाध्य ...

वैद्यक शास्त्राच्या इतिहासात प्रथमच असा बाका प्रसंग उभा ठाकला होता. जगातले अनेक नामवंत डॉक्टर भारतात एकत्र जमले होते. एका मोठ्या हॉस्पिटलच्या आॅपरेशन थिएटरमध्ये हे सारे गोल करून उभे होते. या डॉक्टरांसमोर इरसालवाडीचा एक तरुण रुग्ण गंभीर अवस्थेत ठेवण्यात आला होता. साऱ्यांचं लक्ष त्याच्यावरच !गेल्या काही दिवसांपासून म्हणे या रुग्णाला असाध्य अन् अज्ञात अशा दुर्मीळ रोगानं झपाटलं होतं. भल्या-भल्या डॉक्टरांनीही आजपावेतो या तरुणाच्या वेगवेगळ्या तपासण्या केलेल्या. परंतु शेवटपर्यंत त्यांना याच्या विचित्र रोगाचा शोध काही लागलाच नव्हता. नामवंत डॉक्टरांनीही अखेर थकून त्याच्यासमोर हात टेकले होते.... म्हणूनच की काय, आधुनिक वैद्यक शास्त्राला चॅलेंज देणाºया या रुग्णाची पाहणी करण्यासाठी जगभरातली काही विख्यात तज्ज्ञ मंडळी इथं जमलेली.. मात्र या रुग्णाला जगाशी काहीच देणं-घेणं नसावं. सोयरसुतक नसावं. बोटांचे विचित्र चाळे करत तो छताकडं स्थिर नजरेनं बघत राहिलेला. पापण्यांच्या केसाइतकीही बुब्बुळांची हालचाल न झालेली. अमेरिकेचा डॉक्टर पुटपुटला, ‘इटस् अ‍ॅमेझिंगऽऽ अशा ईल आय रुग्णाचा मी प्रथमच आय विटनेस ठरतोय.’एवढ्यात हा रुग्ण स्वत:च्याच तंद्रीत अकस्मातपणे आॅपरेशन टेबलावरून उठला. लगतच्या ब्लडप्रेशर मॉनिटरवर उजव्या हाताच्या तर्जनीचं बोट गराऽऽगराऽऽ फिरवू लागला. डान्सबारमध्ये नोटा उडवितात तसं... ‘ओह माय गॉडऽऽ ईटस् व्हेरी डेंजरस. याला फिंगर अटॅक नावाचा नवीन रोग जडलाय बहुधा..’ जर्मनीच्या डॉक्टरनं डोकं खाजवत वेगळीच शंका व्यक्त केली.शेजारीच उभारलेल्या रुग्णाच्या आई- वडिलांना जपानच्या डॉक्टरनं हेल काढत विचारलं, ‘याची हालचाल अशीऽऽ कशीऽऽ?’ तेव्हा हतबल आईनं भेदरलेल्या आवाजात त्याच्या रोगाची कर्म कहाणी उलगडून सांगितली, ‘चार-पाच वरसागुदर आमचं पोरगं लईऽऽ चांगलं हुतं. गपगुमानं भाजी-भाकर खाऊनशान रात्तीच्याला डाराडूर झोपत हुतं. मातुर आता त्याला येळ-काळ म्हैत न्हाय. रात्तंंदिस जागा राहतुया. आमच्यासंगं काय बोलत न्हाय. आमच्याकडं बगतबी न्हाय. येकटाच हसत बसतुया. एकटाच हातवारं करत राहतुया.’हे ऐकून काही डॉक्टराचं म्हणणं पडलं, ‘हा फिजिकल आणि टोटल मेन्टल प्रॉब्लेम आहे,’ ..तर काही डॉक्टरांनी ठामपणे मत मांडलं की, ‘याच्या शरीरात अज्ञात विषाणू घुसल्यानं महाभयंकर दुर्मीळ रोग जडलाय.’ एका आयुर्वेदिक डॉक्टरानं मात्र, त्याला देशी गायींचा उताराच फायदेशीर असल्याचा दावा केला, ‘विषाणू शरीरम्... बुद्धीम् भ्रष्टम्..ऽऽ गोमूत्रम् फायदम्ऽऽ’ असंच काहीतरी पुरातन भाषेत सांगितलं.एवढ्यात या रुग्णाचे आजोबा काठी टेकवत आॅपरेशन थिएटरमध्ये आले. त्यांच्याभोवती डॉक्टरांनी घेराव घातला. ‘तुमच्या नातवाला काय झालंय, हे तुम्हाला माहीत आहे काय?’ असं एका डॉक्टरानं विचारलं. तेव्हा कपाळावर आठ्या घालत आजोबा उत्तरले, ‘माज्या लेकराला कसला डोंबल्याचा रोग झालाया? फकस्त इंटरनेट का फिंटरनेटचा मोबाईल हातामंदी आल्यापासनं तो असा वागतूया.’(तिरकस)

टॅग्स :doctorडॉक्टर