शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

समाजमाध्यमांवरील सुशिक्षित अंगठेबहाद्दर...

By किरण अग्रवाल | Updated: July 16, 2020 11:23 IST

व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमाचा वापर करताना त्यात स्वत:च्या संदेशाची भर न घालता केवळ फॉरवर्डिंगवर विसंबून राहणाऱ्यांच्या बाबतीत अनेक गमती घडतात, पण आलेल्या संदेशांना पोच देताना जेव्हा प्रतीकांचा वापर केला जातो तेव्हा अधिक करामती घडतात.

- किरण अग्रवालमनुष्याचे वर्तन वा व्यवहार त्याच्या शिक्षणानुसार असतेच असे नाही, किंबहुना बऱ्याचदा सामाजिक व्यवहारात अनेकजण अशिक्षितच राहिल्याचे प्रत्ययास येते. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारज्ञान महत्त्वाचे असते ते याच संदर्भाने. अर्थात काळ बदलतो तसे संदर्भही बदलतात. अलीकडच्या काळात शिक्षित व अशिक्षिततेचा विचार न करता संप्रेषणाला महत्त्व देण्याची भूमिका त्यामुळेच बळावली आहे. बोलण्यावर किंवा शब्दांवर जाऊ नका, भावना लक्षात घ्या असे याबाबत म्हटले जाते. हे बोलणे वा लिहिणेही कमी करण्यासाठी काही रेडिमेट पर्याय उपलब्ध असले तर अधिकच सोयीचे होते. भौतिक प्रगतीचे टप्पे ओलांडताना मनुष्याचे श्रम कमी करण्याकडेही लक्ष पुरविले जात असतेच, त्यामुळे शब्दांऐवजी भावनांची प्रतीके वापरण्याकडे कल वाढला आहे. सध्याच्या अपरिहार्य व अविभाज्य ठरलेल्या आणि विशेषत: तरुण पिढी ज्यावर पडीक असते त्या समाजमाध्यमात तेच होताना दिसत आहे.कोरोनापासून बचावण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व त्यानंतरच्या घराबाहेर पडण्यावरील निर्बंधांमुळे अनेकांच्या हाताला जे काम लाभले आहे, त्यात सोशलमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण पिढी तर यात माहीर आहेच व दिवसभर ती त्यात गुंतलेली असतेच, परंतु घरातील ज्येष्ठ मंडळीही आता सक्तीने लाभलेल्या रिकामपणातून समाजमाध्यमांकडे वळलेले दिसत आहेत. एरव्ही बागेत किंवा जॉगिंग ट्रॅकवर फिरायला जाण्यात त्यांची सकाळ-संध्याकाळ आनंदात जात असे; पण आता बाहेर पडणे धोक्याचे असल्याने तेदेखील घरात मोबाइल गेमिंग व त्यातील समाजमाध्यमांमध्ये लक्ष पुरवू लागले आहेत. आधुनिक वा प्रगत तंत्राची कास धरणे जे काही म्हटले जाते, तेच या माध्यमातून घराघरात आढळत आहे. स्वाभाविकच या तंत्रासोबत येणा-या संवाद, संप्रेषणाच्या नवीन पद्धतीही सर्वांना आत्मसात कराव्या लागत आहेत. यात शब्दांचे लघु किंवा संक्षिप्त रूप वापरण्याचे म्हणजे, गुड मॉर्निंग असा पूर्ण शब्द वापरण्याऐवजी इंग्रजीतील अवघा ‘जीएम’ (Gm) एव्हढेच किंवा काळजी घ्या असे म्हणताना संपूर्ण टेक केअर म्हणण्याऐवजी ‘टीसी’ (Tc) म्हटले की काम भागते; पण काही बाबतीत तेव्हढेही करायचे नसेल तर प्रतीकांचा वापर केला जातो, आणि असे होताना कधी कधी जे प्रत्ययास येते ते पाहता संबंधितांच्या साक्षरतेबाबतचा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरून जाते.व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमाचा वापर करताना त्यात स्वत:च्या संदेशाची भर न घालता केवळ फॉरवर्डिंगवर विसंबून राहणाऱ्यांच्या बाबतीत अनेक गमती घडतात, पण आलेल्या संदेशांना पोच देताना जेव्हा प्रतीकांचा वापर केला जातो तेव्हा अधिक करामती घडतात. यात संदेशाचे गांभीर्य जाणणा-यांकडून काळजी घेतली जाते; परंतु ब-याचदा विपरीत अनुभव येतो तेव्हा संबंधितांच्या सुशिक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाल्याखेरीज राहात नाही. उदाहरणार्थ, अपघाताची अगर निधनाची वार्ता देणा-या संदेशाला प्रतिसाद दर्शवताना हात जोडलेले प्रतीक टाकण्याऐवजी अंगठा दर्शविणारी किंवा हास्यमुद्रा (सिम्बॉल) टाकली जाते तेव्हा आश्चर्य वाटते. कार्यालयीन पातळीवरील सहका-यांमध्ये संदेशांचे जे आदान-प्रदान होते त्यात आणखीच वेगळ्या गमती घडून येतात. ज्यांच्याकडून कामाची अपेक्षा असते त्या काम करणा-या सहका-यांकडून प्रतिसाद लाभण्याऐवजी रजा घेऊन घरीच कॉरण्टाइन असलेले सहकारी जेव्हा अंगठे दर्शवित तात्काळ प्रतिसाद देताना दिसून येतात तेव्हा त्यातून वेगळे अर्थ काढले जाणे क्रमप्राप्त ठरते. इतकेच नव्हे तर नाकळतेपणातून मुका घेणारी प्रतीके भलत्यास पाठविली गेल्यावर होणारी फजितीही अनेकांच्या वाट्यास येते.लॉकडाऊनमुळे घरी बसून नव्यानेच सोशलमाध्यमांकडे वळलेल्या नवशिक्यांकडून असे घडले तर त्याचे फारसे आश्चर्य वाटून घेता येऊ नये; परंतु या माध्यमाला व त्याद्वारे होणा-या संप्रेषणाला सरावलेले शिक्षितही नको तिथे अंगठेबाजी करताना आढळून येतात तेव्हा अशा अंगठेबहाद्दरांचे वर्तमान कोणत्या भविष्याकडे नेणार याची चिंता वाटून गेल्याशिवाय राहात नाही. समाजमाध्यमांवरील प्रतीकांचे वापर व त्याची उपयोगिता तपासणारी काही व्यवस्था आकारास आणता आली असती तर किती बरे झाले असते, असे या संदर्भाने कुणास वाटेलही; परंतु ते शक्य नाही, कारण भाषा जगवणारी व अक्षर चळवळीतील व्याकरण तपासणारी जमातही हळूहळू कालबाह्य होत चाललेली असताना व त्याबाबत कुणास हळहळ वाटत नसताना, इकडे कुणाचा कुणाला पायपोस नसलेल्या समाजमाध्यमांच्या चावडीकडे कोण लक्ष देणार?  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल