शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

कसं असेल कोरोनानंतरचं जग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 08:15 IST

ही नवी व्यवस्था मानवी समाजाचा संपूर्ण चेहराच बदलणारी असेल. आरोग्य व्यवस्था, उपभोग आकृतिबंध, अर्थव्यवस्था, एवढेच नव्हे तर प्रचलित राजकीय व्यवस्थांवरही दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

भारतीयांना आता टाळेबंदी उठण्याचे वेध लागले आहेत. सरकार ३ मेनंतर टाळेबंदी वाढविणार नाही, किमानपक्षी कोविड-१९ आजाराचा फार कहर नसलेल्या भागांमधील टाळेबंदी तरी निश्चित हटविण्यात येईल, अशी आशा नागरिकांना वाटत आहे. एकदा का टाळेबंदी हटली की, आयुष्य पूर्ववत होईल, असेही अनेकांना वाटत असेल. दुर्दैवाने त्यांना वस्तुस्थितीची जाणीवच नाही. इतिहासात बीसी आणि एडी या दोन कालदर्शक संज्ञांचा नेहमीच वापर होतो. बीसी म्हणजे बिफोर ख्राईस्ट किंवा ख्रिस्त जन्मापूर्वी आणि एडी म्हणजे अ‍ॅनो डोमिनी किंवा ख्रिस्त जन्मानंतर! यापुढे बीसी (कोविडपूर्व) आणि पीसी (कोविडोत्तर) अशा दोन नव्या संज्ञा प्रचलित झाल्यास आश्चर्य वाटता कामा नये! त्यामागचे कारण हे आहे की, भविष्यातील जग डिसेंबर २०१९ पूर्वीच्या जगासारखे अजिबात नसेल.

कोविड-१९ आजाराला आळा घालण्यासाठी बहुतांश देशांनी टाळेबंदी या उपाययोजनेचा सहारा घेतला आहे; मात्र, ही स्थिती कायमस्वरूपी ठेवली जाऊ शकत नाही. जीव वाचविण्याकरिता टाळेबंदी अनिश्चित काळासाठी जारी ठेवल्यास, आजाराने मरणार नाहीत एवढे लोक उपासमारीने मरण्याची दाट शक्यता आहे; त्यामुळे आज ना उद्या टाळेबंदी उठवावीच लागणार आहे. मात्र, तसे करताना एक नवी व्यवस्था जन्माला येणार आहे आणि त्या नव्या व्यवस्थेमुळेच उद्याचे जग कालच्या जगापेक्षा खूप वेगळे असू शकते. कोविड-१९ आजारास कारणीभूत नॉव्हेल कोरोना विषाणूला अटकाव करणारी लस शोधण्यात वैज्ञानिकांना अद्याप यश आलेले नाही आणि काही वैज्ञानिकांच्या मते, कदाचित तशी लस कधीच निर्माण होणार नाही. जीवघेण्या एचआयव्ही विषाणूला प्रतिबंध करणारी लस तरी कुठे अजून तयार करता आली आहे? कोरोना विषाणूच्या यापूर्वी सापडलेल्या प्रजातींसाठी तरी कुठे लस शोधता आली आहे? जर कोरोना प्रतिबंधक लस शोधता आली नाही, तर ‘कोविड-१९’चा प्रकोप अधूनमधून होतच राहील व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शारीरिक अंतर पाळणे, स्वत:ला वेळोवेळी निर्जंतुक करून घेणे, वारंवार हात धुणे याला पर्यायच नसेल.शारीरिक अंतर पाळावे लागण्याची मजबुरीच पुढील काळात नव्या व्यवस्थेला जन्म देणार आहे. ही व्यवस्था मानवी समाजाचा संपूर्ण चेहराच बदलणारी असेल. आरोग्य व्यवस्था, उपभोग आकृतिबंध, अर्थव्यवस्था, एवढेच नव्हे तर प्रचलित राजकीय व्यवस्थांवरही त्याचे दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शारीरिक अंतर पाळण्याच्या मजबुरीपोटी टाळेबंदी उठल्यानंतरही चित्रपटगृहे अथवा नाट्यगृहांमध्ये जाऊन चित्रपट, नाटकांचा आस्वाद घेणे शक्य होणार नाही. चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करायची झाल्यास किमान दोन आसने आणि दोन रांगांचे अंतर पाळावे लागेल; त्यामुळे तिकिटांचे दर एवढे महागतील की ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतील. परिणामी, भविष्यात मनोरंजनाची साधने सामूहिकऐवजी वैयक्तिक असतील. चित्रपटगृहे, नाट्यगृहांमध्ये जाऊन चित्रपट, नाटके बघण्याचे दिवस कदाचित भूतकाळात जमा होतील. शारीरिक अंतर पाळायचे झाल्यास सार्वजनिक वाहतूक एवढी महागेल की, ती सर्वसामान्यांना परवडणार नाही आणि त्यामुळे लोकांना कमीत कमी प्रवास करावा लागेल, अशी नवीच व्यवस्था कदाचित जन्माला घालावी लागेल; त्यामुळे घरूनच काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) टाळेबंदीतील तात्पुरती व्यवस्थाच कदाचित उद्याच्या जगातील कायमस्वरुपी व्यवस्था असू शकेल.
निकट भविष्यात क्रीडा क्षेत्रही खूप बदललेले दिसू शकते. विना प्रेक्षकांच्या मैदानात सामने हेच कदाचित क्रीडा क्षेत्राचे भविष्य असू शकते. आजवर विकसित पाश्चात्य राष्ट्रांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या वर्चस्वाच्या जोरावर जगावर मजबूत पकड बनवून ठेवली होती. मात्र, कोरोना आपत्तीसमोर त्यांनी सपशेल हार पत्करल्याचे चित्र दिसत आहे, तर तुलनेत भारतासारख्या विकसनशील देशांनी या आपत्तीला खूप चांगल्या प्रकारे तोंड दिले आहे; त्यामुळे भविष्यात पाश्चात्य देशांची जगावरील पकड चांगलीच ढिली होऊन नवी जागतिक व्यवस्था अस्तित्वात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कदाचित प्रत्यक्षात या सगळ्याच गोष्टी घडणारही नाहीत. कदाचित काही घडतील, काही घडणार नाहीत किंवा काहीतरी वेगळेही घडेल; पण एक मात्र निश्चित, की कोविडोत्तर जग हे कोविडपूर्व जगासारखे असणार नाही!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या