शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

सुरक्षा नको, विलंब टाळा !

By किरण अग्रवाल | Published: January 10, 2019 8:52 AM

रेल्वे प्रवासी व सोबतच रेल्वेस्थानकांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने एक आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार विमानतळाप्रमाणे देशातील २०२ रेल्वेस्थानकांवर हायटेक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

किरण अग्रवालडोक्याला जखम झाली असताना गुडघ्यावर उपचार करण्याचे प्रकार आपल्याकडे पूर्वापार चालत आले आहेत. यातही उपचाराच्या निमित्ताने ‘होऊ द्या खर्च’ची भूमिका असेल तर विचारूच नका. काही काही सरकारी योजनांच्या बाबतीत असेच होताना दिसते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेस्थानकांवर आता विमानतळांच्या धर्तीवर हायटेक सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्याकडेही याचसंदर्भाने बघता यावे.कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी प्रवाशांची सुरक्षितता हा प्राथमिक प्राधान्याचा विषय असतो. याचदृष्टीने रेल्वे प्रवासी व सोबतच रेल्वेस्थानकांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने एक आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार विमानतळाप्रमाणे देशातील २०२ रेल्वेस्थानकांवर हायटेक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्याकरिता प्रवाशाला त्याच्या रेल्वेच्या वेळेपेक्षा सुमारे वीस मिनिटे अगोदर येऊन सुरक्षा यंत्रणेच्या तपासणीतून रेल्वे फलाटावर प्रवेश करावा लागणार आहे. निश्चित वेळेनंतर ही प्रवेश व्यवस्था बंद केली जाणार आहे. त्यामुळे धावत पळत रेल्वे पकडण्याची सोय राहणार नाही. सध्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील अलाहाबाद व कर्नाटकातील हुबळी रेल्वेस्थानकांवर या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याकरिता ३८५ कोटी रुपये खर्च गृहीत धरला आहे. यात वर वर प्रवासी सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा वाटणारा असला तरी, विमानतळासारखी चारही दिशांनी बंद अगर संरक्षित नसलेली रेल्वेस्थानके व त्यावरील प्रवाशांच्या गर्दीचे प्रमाण पाहता ही योजना कितपत लाभदायी ठरावी याबद्दल शंका बाळगता येणारी आहे.मुळात, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा उभारली जात असली तरी केवळ प्रवेशद्वारांवर त्यासंबंधी काळजी घेऊन अन्य मार्गाने होऊ शकणारा धोका कसा टाळला जाईल, हा खरा प्रश्न आहे. रेल्वेस्थानके, त्यावरील फलाट व रेल्वे मार्ग अप आणि डाउन या दोन्ही बाजूंनी कशी बंद करणार हा तर मुद्दा आहेच; पण अशी यंत्रणा कार्यान्वित असलेल्या रेल्वेस्थानकाशेजारील तुलनेने लहान असलेले अन्य स्थानक की जेथे सदररची व्यवस्था नसेल, तेथून प्रवेश मिळवून व प्रवासी म्हणून येऊन मोठ्या शहराच्या फलाटावर उतरणाऱ्या व्यक्तीकडून होऊ शकणारा धोका कसा नियंत्रित केला जाईल, हे समजणे आकलनापलीकडचे आहे. विमानतळावरील प्रवाशांची संख्या मर्यादित असते. तिथे अशी हायटेक सुरक्षा शक्य असते. रेल्वेस्थानकांवरील प्रवासी संख्येशी तिची तुलनाच करता येऊ नये. प्रत्येक विमानतळ अशा सुरक्षेने जसे कडेकोट आहे, तसे प्रत्येक रेल्वे स्टेशनबाबत करणे अशक्यच आहे. शिवाय, मुंबईसारख्या ठिकाणी नोकरदार प्रवाशांचा मिनिटा-मिनिटांसाठी चालणारा आटापिटा लक्षात घेता तिथे लोकलच्या वीस मिनिटे आधी येण्याची अपेक्षा केली गेली तर ते स्वीकारले जाणे अवघड ठरेल. म्हणजे, सुरक्षा निश्चित होणे तर दूर, विलंब होण्याची आफत त्यातून ओढवण्याचीच मोठी शक्यता आहे. जखम डोक्याला व मलम गुडघ्याला, असे याबाबत म्हणता यावे ते त्यामुळेच.दुसरे असे की, रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमध्ये प्रवाशांना देण्यात येणाऱ्या चादरी, उशा (तक्के), रुमाल्स चोरीस जातात म्हणून प्रवाशाला उतरायचे ठिकाण येण्याच्या अर्ध्या तास अगोदरच या वस्तू काढून घेण्यात येणार आहेत. म्हणजे, अमृतसरपासून पुढे काश्मीरकडे प्रवास करणाऱ्यांना अर्धा तास थंडीत कुडकुडणे भाग पडेल. हा प्रकारही चोरी रोखण्यासाठी प्रामाणिक प्रवाशांना दिली जाणारी शिक्षा ठरावा. रेल्वे मंत्रालयाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार २०१७-१८ मध्ये सुमारे १४ कोटींचे असे साहित्य चोरीस गेले. यातील चोरी खरी असेलही; पण ते प्रवाशीच करतात असे समजून अर्धा तास अगोदर सदर वस्तू काढून घेतल्या जाणे योग्य कसे ठरावे? रेल्वे यंत्रणेतील शुक्राचार्य यात गोलमाल करीत नसतील कशावरून? पण, रेल्वे प्रशासन प्रवाशांना अर्धा तास या सुविधेपासून वंचित करायला निघाले आहे. तेव्हा प्रवासी सुररक्षेच्या नावाखाली विमानतळाप्रमाणे रेल्वेस्थानकांवर सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा विषय असो, की वातानुकूलित डब्यांमधून प्रवासादरम्यान दिल्या जाणाºया सामानाची चोरी रोखण्यासाठी ते साहित्य प्रवासी उतरण्याच्या अर्धा तास अगोदरच जमा करून घेण्याची बाब; यासंदर्भात संबंधितांनी फेरविचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :railwayरेल्वे