शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

भारताने गप्प राहण्याचे दिवस आता संपले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 08:32 IST

पश्चिमेकडील मुत्सद्दी आणि माध्यमांशी भारताचा संवाद असला पाहिजे. गप्प राहिलो तर अपप्रचार करणाऱ्यांचे फावते, बोलत राहिलो तर हा प्रचार रोखला जातो.

शशी थरूर, ज्येष्ठ काँग्रेस नेते, खासदार

पहेलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने त्याला दिलेले उत्तर याच्या नंतरच्या कवित्वाने देशाच्या परराष्ट्र धोरणाला सटिक वळणावर आणून ठेवले आहे. तत्काळ झालेली लष्करी कारवाई निर्णायक होतीच; त्याचप्रमाणे नंतरची कूटनीतीही तितकीच महत्त्वाची होती. आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळविणे आणि जगाचा या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार करणे आवश्यक होते. गयाना, पनामा, कोलंबिया, ब्राझील आणि अमेरिका या पश्चिमेकडच्या पाच देशांत सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना मला खूप काही शिकता आले. विविध राजकीय पक्षांचे, विविध राज्यांतून आलेले, भिन्नधर्मीय खासदार आमच्या शिष्टमंडळात होते. दहशतवादाशी लढा आणि राष्ट्रीय ऐक्याचा प्रश्न असेल तर भारत एका आवाजात बोलतो, हे त्यातून अधोरेखित झाले.

देशातील राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन भारताचा सामूहिक निर्धार एकमुखाने व्यक्त झाला.  ‘ऑपरेशन सिंदूर’मागचे प्रमुख उद्दिष्ट, दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यामागील भूमिका, ते करताना पाळलेला संयम, नागरिकांना त्रास होणार नाही, इतकेच नव्हे तर पाकिस्तानी सैन्याच्या यंत्रणेला कुठे धक्का लागणार नाही याची घेतली गेलेली काळजी हे सगळे आम्हाला जगाच्या  निदर्शनास आणून द्यावयाचे होते. सीमेपलीकडून सातत्याने होत असलेल्या दहशतवादाविरुद्ध भारताने वैध अशी कृती कशी केली हे आम्ही विशद केले. अनेक देशांच्या भारताकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात त्यातून बदल झाला. वस्तुस्थिती शांतपणे आणि नेटाने मांडली तर गैरसमज दूर होतात; सहेतुकपणे केलेला अपप्रचार पुसला जातो हेच यातून दिसले.  पाकिस्तान दहशतवादाला कायम पाठिंबा देत आलेला आहे याकडे या शिष्टमंडळांनी लक्ष वेधले. वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या भेटीगाठी यासंदर्भात महत्त्वाच्या ठरल्या. पाकिस्तानचे शिष्टमंडळही त्यावेळी तेथे होते. त्यांना भेटलेले अमेरिकेचे अधिकारी तसेच अमेरिकेचे अन्य प्रतिनिधी आम्ही व्यक्त केलेल्या चिंतेशी सहमत होते असे आम्हाला आढळले.

 ट्रॅडिशन, टेक्नाॅलॉजी आणि ट्रेड अशा तीन ‘टीं’चा मी पुरस्कार करतो. नवा भारत जगासमोर न्यायचा असेल तर या तीन गोष्टी एकत्र आणायला हव्यात. माहिती तंत्रज्ञानातील भारताची कुशलता मान्यता पावली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात  भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा वापर आपल्या राजनैतिक स्वरूपाच्या प्रयत्नात झाला पाहिजे. हा मुद्दा केवळ आर्थिक वाढीशी निगडित नसून भारत प्रतिभावंतांचा, प्रश्नांची उत्तरे शोधून देणारा, जगाच्या प्रगतीला हातभार लावणारा देश आहे हे आपण दाखविले पाहिजे. राजनैतिक पातळीवरील प्रयत्नात  आर्थिक संधींची सांगड सुरक्षिततेविषयी वाटणाऱ्या चिंतेशी घातली गेली पाहिजे. भारत आपल्या विकासावर आणि वाढीवर लक्ष केंद्रित करतो. दहशतवाद तसेच युद्ध हे त्यात अडथळा आणणारे पण टाळता येणारे घटक आहेत असे आम्ही मानतो. पाकिस्तानने आम्हाला आमच्या लोकांचे भले करू द्यावे एवढेच आम्हाला हवे आहे. मात्र त्यांनी खोडी काढली तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. प्रत्येक हल्ल्याची किंमत मोजायला लावू, हाच आपला संदेश असला पाहिजे.

स्वतःहून पुढाकार घेऊन साधलेल्या राजनीतीचे महत्त्व या दौऱ्यातून समोर आले. ज्या ज्या देशांमध्ये आम्ही गेलो तेथे आमचे स्वागत झाले आणि अधून- मधून खासदारांची शिष्टमंडळे अशीच पाठवत जा अशी विनंतीही केली गेली. कायदा करणारे आणि सरकारचे प्रतिनिधी या नात्याने आम्ही विचारवंत, धोरणांवर प्रभाव टाकणारे लोक आणि राष्ट्रीय माध्यमांशी बोललो. माध्यमातून मिळालेली चांगली प्रसिद्धी, विदेशी प्रतिनिधींशी संवादाचा दर्जा यातून जगाला भारत समजून घेण्याची इच्छा आहे दिसले. पश्चिमेकडील आणि महत्त्वाच्या माध्यमांशी आपला खोलवर आणि सतत संवाद असण्याची गरज त्यातून अधोरेखित झाली. आपण गप्प राहिलो तर अपप्रचार करणाऱ्यांचे फावते आणि बोलत राहिलो तर हा प्रचार रोखला जातो. आपले म्हणणे नेमकेपणाने मांडता येते.

या अनुभवातून काही शिफारशी कराव्याशा वाटतात. दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आपण राजनैतिक संबंध वाढवले पाहिजेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी, भाषेतील अडसर दूर करून तेथील वकिलाती अधिक बळकट करायला हव्यात. बहुराष्ट्रीय पातळीवर आपल्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि आमसभेचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे;  विशेषत: दहशतवादाच्या मुद्द्यावर संदिग्ध भूमिका असणाऱ्या माध्यमांशीही बोलले पाहिजे. ब्रिक्सच्या आगामी शिखर बैठकीत आपले पंतप्रधान ब्राझीलच्या पंतप्रधानांना भेटणार आहेत. उभयपक्षी नाते दृढ करण्यासाठी या भेटीचा उपयोग करून घेतला पाहिजे. पायाभूत क्षेत्राचा विकास आणि तेलसाठे नव्याने सापडल्याच्या पार्श्वभूमीवर गयानाशीही भारताने संबंध दृढ केले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्साह दाखवतात; संवाद साधतात. जागतिक व्यासपीठावर भारतासाठी ही फार मोठी जमेची बाजू आहे.

त्याला अधिक बळ मिळाले पाहिजे. आधी उल्लेखलेल्या तीन ‘टीं’चा  उपयोग करून घेऊन सुयोग्य, सुरक्षित आणि प्रगत अशा जगासाठी प्रयत्न केले पाहिजेत.